मुंबई | 1 डिसेंबर 2023 : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला. आता ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे दौऱ्यावर आहेत. त्या आज एएफएमसीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. पुण्यात मागसवर्गीय आयोगाची आज बैठक होत आहे. सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा चौथा टप्पा आजपासून सुरु होत आहे. जालन्यात त्यांची सभा होणार आहे. परंतु पावसामुळे सभास्थळावर सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. नागरिकांना बसण्याच्या ठिकाणीच साचले पाणी आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तीन कॅप्टन निवडले गेले आहे. राजकीय, प्रत्येक जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…
दुबईतील COP28 उच्च-स्तरीय बैठखीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2028 मध्ये भारतात COP33 चे आयोजन करण्याचा प्रस्ताव दिला.
शिवसेना आमदार अपात्रेबाबतची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु आहे. यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला. ठाकरे गट शिवसेनेचं प्रतिनिधित्व करू शकत नाही असं महेश जेठमलानी यांनी युक्तिवादात सांगितलं.
प्रकाश सोळंके यांना अध्यक्षपदाचा शब्द देऊन जयंत पाटलांनी फिरवला असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. तर जयंत पाटली यांनी सांगितलं की, मला सांगितलं असतं तर मी राजीनामा दिला असता.
शरद पवार यांना संपण्याची सुपारी अजितदादा गटाने घेतली आहे. तुम्ही कोणीही झालात तरी तुमचा निर्माता शरद पवार साहेब आहेत हे विसरू नका. शरद पवारांवर आरोप करण्याइतके अजित पवार मोठे झालेले नाहीत.
मुंबई | राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षणासाठी आज प्रश्नावली ठरवली आहे. राज्य शासनाला निधीसाठी पत्र पाठवण्यात आलं आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अंतिम निकष ठरवण्यात आले आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई | नुकसानग्रस्त भागात युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश मी दिले होते. त्यानुसार पंचनामे होत आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा झाली. 2 ऐवजी 3 हेक्टरवर नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला. एकत्रित पंचनामे सर्व अहवाल आल्यानंतर शेतऱ्याला नुकसान भरपाई दिली जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
मुंबई | मी असताना गाडी तोडली असती तर दोघांना लोळवलं असतं, असं दत्ता दळवी यांनी म्हटलंय.तसेच तोडफोड करण्याआधी कुणाला भेटले नंतर समोर येईल, असं दळवी यांनी म्हटलं. तर मी देखील गाड्या तोडल्या असत्या, हा भ्याड हल्ला होता, असं दळवी म्हणाले.
दिंडोरी | जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. एक म्हणतो राजीनामा घ्या तर दुसरा काय म्हणतो. एक मुखी सरकार असले पाहिजे. सगळ्यांनी एकत्र बसून सांगा मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका सांगितली पाहिजे. आरक्षण कुणाचं घेणार आणि कुणाला देणार?, असा प्रश्ननही जयंत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच सरकारने आरक्षणाबाबत सपष्टता दिली पाहिजे. सरकार काय निर्णय घेतंय याची आम्ही वाट पाहतोय, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातून आज विमान सेवेला प्रारंभ झाला आहे. विमानसेवेला राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल यांनी हिरवा झेंडा दाखवला. प्रवासी विमाना सेवा बरोबरच पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रात विमानसेवेचा लाभ होणार आहे. गोंदिया इथून हैदराबाद आणि तिरुपती करिता थेट विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. स्वतः प्रफुल पटेल विमानाने गोंदियाला आले.
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेसाठी मालवणात प्रशासन सज्ज झालं आहे. मालवणला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी मधील पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. मोदींचा ताफा जाणाऱ्या रस्त्यावरील स्पीड ब्रेकर हटविण्यात आले आहेत. रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. मोदींचा ताफा जाणार त्या मार्गावरील नागरिकांना प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहे. रस्त्यावर गुरे, कोंबडी, कुत्रे येऊ न देण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . अत्यावश्यक कामाशिवाय चार तारखेला संध्याकाळी घरा बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मार्गावरील अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडून इतर दुकाने त्या दिवशी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जालना : जालन्यात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा. जालन्यातील पंजरापोळ मैदानावर ही सभा पार पडणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर जरांगे पाटील यांची सभा पार पडत आहे. रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानासमोरूनच जरांगे पाटील यांची बाईक रॅली जाणार आहे. त्या अनुषंगाने दानवे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
मागासवर्ग आयोगाचे सदस्य बी एल किल्लारीकर यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. जातिनिहाय जातगणना तसंच जातींचे सामाजिक मागासलेपण तपासावे, अशी किल्लारीकरांची मागणी होती. पण त्यावर एकमत न झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. सोनवणे यांनी यापूर्वी दिला होता राजीनामा. त्यांच्यापाठोपाठ आज किल्लारीकरांनाही दिला राजीनामा.
सातारा : पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून खंडाळा येथे मागील दोन तासापासून रास्ता रोको सुरू आहे. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने आणि साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर खंडाळा येथे वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांचा आंदोलन स्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर.
शरद पवारांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतं. पवार साहेबांना संपवण्याची सुपारी घेतली आहे. सत्ता हवी ही तुमचीच भूमिका होती. काकांच्या पाठीत सुरा कुणी खुपसला. असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.
पालकमंत्री यांच्या निर्देशानंतर परभणीत शेती नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. महसूलचे कर्मचारी शेत बांधावरती जाऊन घेत आहेत नुकसानीचा आढावा. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे अवकाळी मुळे नुकसान,
हे सरकार सगळं विकतंय, असे थेट उद्धव ठाकरे यांनी म्हणत सरकारवर जोरदार टीका केल्याचे बघायला मिळतंय.
मनोज जरांगे पाटील जालनातील मोतीबागेत दाखल झाले आहेत. मोतीबागेतील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निघणार ब
चार दिवसांपासून आम्ही उपाशी, माझा जीव गेला तरीही आम्ही मुंबई सोडणार नाहीत, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
हिंगोलीतील शेतकरी थेट उद्धव ठाकरे यांचा भेटीला पोहचले आहेत. यावेळी शेतकरी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे.
राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलने करा हे पवारांनीच सांगितले असा मोठा खुलासा, अजित पवार यांनी केला आहे.
केसेस होत्या म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो असा आरोप होतो पण आरोप सिद्ध व्हावे लागतात. विकासकामांची गती रेंगाळल्याने भाजपसोबत गेल्याचं अजित पवार म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांचे जालना शहरात आगमन, इंदेवाडी येथे फटाके पुष्पहार घालत जरांगे पाटील यांचे स्वागत होत आहे. येथून जरांगे पाटील हे मोती बाग समोरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून त्यांची जालना शहरातून रॅली काढण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागेल. सातारा, शिरूर, बारामती, रायगड जागा लढवायच्या आहेत. जागावाटपाबाबत लवकरच निर्णय घेणार आहोत.
मी 32 वर्ष राजकारणात काम करीत आहे. आम्ही बोललो तसं वागतो आणि करतो. डीपीडिसी संदर्भात माझ्यावर कुणीही आरोप करू शकत नाही. मंत्री,खासदार आणि आमदार आणि आता जिल्ह्याध्यक्षांना आता माझ्याकडे कामाची संधी दिली जाणार आहे
देशाची लोकसंख्या इतकी वाढत आहे की एक किंवा दोन अपत्यावरच थांबलं पाहीजे. अन्यथा पुढे अन्न आणि पाणी मिळणार नाही. त्यामुळे याबाबतीत समान नागरी कायदा असावा. समान नागरी कायदा म्हणजे आरक्षण नष्ट होणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील शिबिरात म्हटले आहे.
बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. सध्या या जागा आपल्याकडे आहे. परंतु इतर काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यात मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे. दुकानांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक आहे. महापालिकेने तसा आदेश काढत विक्रेत्यांना मराठी पाट्या लावण्याचे सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील मनसेचे पदाधिकारी जंगली महाराज रस्त्यावर आंदोलन करत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, फक्त दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. कोणी ही पेटवापेटवी केली? आमच्या आमदारांची घरं जाळली. हे सगळं का केलं? याचा तपास करावाच लागेल, असं भुजबळ म्हणाले.
गोंदियात अवकाळी पावसामुळे भात पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आठ तालुक्यात 2775 हेक्टर क्षेत्र प्रभावित झालं आहे. जिल्ह्यात जवळपास 5 हजार 933 शेतकऱ्यांचं अवकाळी पावसाने नुकसान झालं आहे.
“मी शांततेचं आवाहन करतोय. झोपेतून उठून हा महापुरुषांच्या जाती काढतो हे मी सहन करणार नाही. आभाळ आलं की तो फिरतो, जाती- धर्मात तो तेढ निर्माण करतो. आभाळ आलं की जरा शांततेत घेत जा,” अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली.
राजकारणाच्या वेळी राजकारण करा. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नात राजकारण करू नका. प्रफुल्ल पटेलांनी काल अनेक गोष्टींचा खुलासा केला. 2004 पासून काहीतरी सुरूच आहे ना?, असं वक्तव्य भुजबळांनी केलं.
“नाशिकमध्ये गारांच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकरी माझ्यासमोर अक्षरश: रडत होते. त्यांचे अश्रू पुसायला जाणं माझं कर्तव्य होतं. पण काहीजण चले जाओ चले जाओ करत होते. गावबंदी असल्याचं सांगून मला प्रवेश दिला जात नव्हता. पण राजकारण कोण करतंय हे आम्हाला माहीत आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. जयंत पाटील यांच्या इस्लामपूर साखर कारखान्यासनोर आज काटा बंद आंदोलन करण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आज जालन्यात होणाऱ्या जाहीर सभेसाठी पोलिस दल सज्ज झालं आहे. दीड हजाराहून अधिक पोलिसांसह 8 ड्रोन आणि 13 वॉच टॉवर द्वारे पोलिस रॅली आणि सभेवर बारीक लक्ष ठेवणार आहेत. सभेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी हा तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
कर्जतमध्ये छगन भुजबळांना मराठा आंदोलकांचा विरोध, आंदोलकांकडून ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा दिल्या जात आहेत.
काँग्रेसमुक्त भारत म्हणणाऱ्यांना घाम फुटला आहे. 2024 मध्ये भाजपमुक्त भारत होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
सरकारचा पोलीस, न्यायालयावर दबाव आहे. 2024 नंतर उलटं चक्र सुरू होईल, 2024मध्ये केंद्रात सत्ता परिवर्तन होणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.
आमदार अपात्रताप्रकरणी शिंदे गटातील ९ जणांची उलटतपासणी होणार आहे. शिंदे गटाचे ७ आमदार आणि दोन खासदार यांची साक्ष नोंदवली जाईल.
भरत गोगावले, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि दादा भुसे यांची उलटतपासणी होईल. तसेच गुलाबराव पाटील, संजय राठोड, योगेश कदम आणि राहूल शेवाळे यांचीही उलटतपासणी करण्यात येणार आहे.
पुण्यात इंदापूरमध्ये ९ डिसेंबरला ओबीसी समाजाची एल्गार सभा होणार आहे. छगन भुजबळ या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. जालना आणि हिंगोलीनंतर आता इंदापूरमध्ये होणार सभा.
देशात एलपीजी सिलेंडरच्या भावात वाढ झाली आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने बजेट वाढणार आहे. पाच राज्यातील निवडणुकांची सर्वच रणधुमाळी थंडावली आहे. आता निकालाची प्रतिक्षा आहे. त्यापूर्वीच दरवाढ झाली. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आजपासून ही दरवाढ लागू केली आहे. कर्मशियल गॅसमध्ये 21 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. आज 1 डिसेंबर 2023 रोजी देशाची राजधानी दिल्लीत कमर्शियल गॅस सिलेंडर 1796.50 रुपये तर गेल्या महिन्यात एलपीजी गॅसचे भाव 1775.50 रुपये प्रति सिलेंडर असा झाले.
मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी झाल्याने लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या महामार्गावरुन वाहनांची धीम्या गतीने वाटचाल सुरु आहे. अचानकपणे मार्गावर वाहनांची संख्या वाढल्यानं ही परिस्थिती उद्भवलेली आहे. मध्यरात्री अवजड वाहतुकीमुळं बोरघाटात वाहतूक कासवगतीनं सुरू होती. अशातच सकाळची वाहतूक वाढली त्यामुळं वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या आहेत. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलीस दहा-दहा मिनिटांचे ब्लॉक घेऊन, पुण्याकडे येणारी वाहतूक दोन्ही मार्गावरून सोडत आहेत. पुढील काहीवेळात ही कोंडी फुटेल अशी पोलिसांना खात्री आहे.
मंत्री छगन भुजबळ यांना सलग 12 मॅसेज पाठवून धमकी देण्यात आली आहे. भुजबळ अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उपस्थित असताना त्यांना कॉल करण्यात आला होता. त्यांनी कॉल न घेतल्यामुळे धमक्यांचे मॅसेज पाठवण्यात आले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सौदागर सातनाक नामक व्यक्तीच्या क्रमांकावरून धमकी आल्याचा तक्रारदार घोडके यांनी दावा केला आहे. शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना काळात केलेल्या कामाचे बिल न दिल्याने कोल्हापुरातील ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. महापालिकेत अचानक घडलेल्या या प्रकाराने तणाव होता. ठेकेदाराचे बिल परस्पर समंती शिवाय नगरसेवकाला दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. ठेकेदार अरुण जगधने यांचा आत्मदहनचा प्रयत्न केला.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये देखील हवेच्या गुणवत्ता पातळीमध्ये वाढ होताना दिसत आहे. पण जे नियमांचे उल्लंघन करतात, त्यांच्यावर पालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला आहे. बांधकाम साइटवर नियमाचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे .अशा 242 साईटला पालिका प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत ,तर दुसरीकडे डेब्रिज घेऊन जाणाऱ्या आणि प्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याकडून चार लाख 98 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
सोने-चांदीने गेल्या दोन दिवसांत इतिहास रचला. किंमती गगनाला भिडल्या. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्याने मुसंडी मारली. सोने आणि चांदी सर्वकालीन उच्चांकावर पोहचले. मंगळवारी आणि बुधवारी या मौल्यवान धातूंनी नवीन रेकॉर्ड केला. जुने सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले. गळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,913 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. बुधवारी सोन्याचा भाव 62,629 रुपयांवर पोहचला होता.या किंमतीत किंचित घसरण झाली.
अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे जिह्यातील अनेक गावात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कुसुंबा चौगाव परिसरात सुमारे 200 ते 250 हेक्टरवर शेवगा पिकाची शेती आहे. पण पावसामुळे मोठे नुकसान झाले. शेवग्याला चार महिन्यानंतर फुलरा येतो मात्र पाऊस पडल्याने फुलोरा गळाला आहे. कृषी विभागाने पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आज होणाऱ्या जाहीर सभेत फुलांची उधळण होणार आहे. त्यासाठी शेकडो किलो फुले आणण्यात आली आहे. फुलांपासून पाकळ्या बनवण्याचे काम सुरू आहे. जेसीबीच्या माध्यमातून शेकडो किलो फुले उधळल्या जातील.
मनोज जरंगे यांच्यावर उधळण्यासाठी शेकडो किलो फुले मैदानात दाखल… फुलांपासून पाकळ्या बनवण्याचे काम सुरू… जेसीबीच्या माध्यमातून उधळली जाणार शेकडो किलो फुले… फुलांच्या पाकळ्या बनवण्याचं समाज बांधवांचे काम सुरू
वातावरणातील बदल झाल्याने खेड तालुक्यात रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. सर्दी , ताप , खोकल्याच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. पुण्याच्या राजगुरुनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र औषधांचा तुटवडा भासत आहे. औषधाच्या बाटल्या उपलब्ध नसल्याने प्लॅस्टिकच्या पिशवीत पातळ औषध देण्याची रुग्णालयावर वेळ आली आहे. तर काही रुग्णांना मोकळी बाटली घेवून येण्याची वेळ आली आहे.
धुळे याठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. शेवगाव उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. शेवग्याला चार महिन्यानंतर फुलरा येतो मात्र पाऊस पडल्याने फुलोरा गळला. ज्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे. कृषी विभागाकडून पंचनामे करण्याची मागणी…..
ऊस दरासाठी शेतकरी संघटना पुन्हा ऍक्शन मोडवर… जयंत पाटील यांच्या साखर कारखान्यावर आज आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे..
ललित पाटीलने ससून रुग्णालयातून पळून जाण्याचा कट तीन महिन्यापूर्वी रचला होता. त्यासाठी तो चालक सचिन वाघ याला ३ वेळा भेटला होता. ललित पाटीलच्या पोलीस तपासात माहिती समोर आली आहे. ललित पाटील आणि सचिन वाघ याला अटक करण्यात आली… या गुन्हात ललित पाटील याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे..
दिवाळीच्या सुट्टीत एसटीचा पुणे विभाग मालामाल झाला आहे. पुणे विभागाला मिळाल तब्बल २३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुणे विभागातून १९ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. पुणे विभागात एसटी फेऱ्याही वाढवल्या होत्या त्याचा फायदा महामंडळाला झाला आहे.
कोल्हापुरातील केएमटी बस चालकांचा आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना कायम करणे आणि रिक्त पदे भरण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. केएमटी बस चालकांच्या बेमुदत संपामुळे कोल्हापुरातील वाहतुक सेवेवर परिणाम होणार आहे.
मराठा आरक्षणसंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाची आज सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. मराठा समाजाच सर्वेक्षण करण्यासाठी लागणारी प्रश्नावली बैठकीत करण्यात येणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून लवकर सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.
मनोज जरंगे पाटील यांच्या दौऱ्याचा चौथा टप्पा आजपासून सुरु होत आहे. त्यांची जालना येथे सभा होणार आहे. या सभास्थळावर जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे जरंगे यांच्या सभेवर पावसाचे सावट आहे.