मुंबई : “मराठा समाजाला डावलून जाणारी माझी औलाद नाही. जे करायचे ते करा, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. आता खोट्या केसेस करत आहेत, पण आरक्षण भेटले की गाठ आमच्याशी आहे. बीड जिल्ह्यात खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना बोललो आहे, ज्यांनी गुन्हे केले असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा पण निष्पाप लोकांवर गुन्हे दाखल करु नका” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. रात्री उशिरा धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे त्यांची सभा झाली. दरम्यान धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आज बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. काल भारताने वनडे वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. अद्वय हिरे यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. अद्वय हिरे यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस गाडीला अडवण्याचा प्रयत्न झाला. काल अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली. आज त्यांना मालेगाव कोर्टात हजर करण्यात येईल.
मुंबई | मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मोठा राडा झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिवस आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जावून बाळासाहेबांना अभिवादन केलं. एकनाथ शिंदे बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहून निघून गेल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर मोठा राडा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आमनेसामने आले.
अहमदनगर | काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून रोहित पवारांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं आहे. आपण ज्या संस्कारात वाढलो की आपल्याकडे येणारे लोकांची आपण कधी जात, धर्म विचारत नाही. विकासकामे धडपड करून केले जातात. मात्र हे दुर्दैव आहे की ती काम अडवली जातात. रोहित पवार तुमच्या कामाला जे आडवे येतील त्यांना निवडणुकीत 420 चा करंट द्या. जे तुमची लाईट तोडतात त्यांना धडा शिकवा. जशी राहुल गांधींनी संघर्ष यात्रा काढली तशी रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेने राज्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असं विश्वजीत कदम म्हणाले.
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी, नेते शिवाजी पार्क येथे दाखल झाले आहेत.
ठाणे | मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होणार मनोज जरांगे याची बैठक होणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये ही सभा होणार आहे. सकल मराठा मोर्च्याच्या समन्वयकांकडून या सभेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली. सभेआधी नवपाडा पोलीस ठाण्यात बैठक पार पडली.
कोल्हापूर | ऊस दराबाबतची बैठक निष्फळ ठरली आहे. 19 तारखेला चक्काजाम आंदोलन होणारच, राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडून समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. राजू शेट्टी यांनी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे आता ऊस दर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
मुंबई | शहर आणि उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेत. वर्षा निवासस्थानी याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. इतकंच नाही, तर मुंबईतील प्रमुख रस्ते, पदपथ, चौक याठिकाणी नियमित स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी अधिकचे मनुष्यबळ लावण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेल्या जिशान हैदर, दाऊद नसीर, जावेद इमाम सिद्दीकी यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांचीही ईडीची कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबाबाबत चर्चा झाल्याचे राकेश टिकैत यांनी सांगितले. घाबरण्याची गरज नाही. आंदोलक एकतर सत्तेत राहतील किंवा आंदोलन केले तर तुरुंगातच राहतील. तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, सरकारविरोधात बोलणाऱ्यांचीच चौकशी होणार का? सरकारी लोकही आहेत, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे.
मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अनुपम राजन यांनी सांगितले की, उद्या मतदान आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. तीन जिल्हे नक्षलग्रस्त असल्याने बालाघाटातील 3 मतदान केंद्र, मांडला 55 मतदान केंद्र आणि दिंडोरी येथील 40 मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत मतदान होणार आहे. मतदानापूर्वी सर्व केंद्रांवर मॉक पोलिंग घेण्यात येणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील डीएच पोरा भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल कारवाई करत आहेत. काश्मीर झोन पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
निवडणूक आयोगाने मोदी, शाहांसाठी नियम बदलले आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केला आहे. राम मंदिराच्या वक्तव्यावरून हे पत्र पाठवण्यात आलं आहे.
ठाकरे गटाचे शरद कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत हा गुन्हा दाखल झाला आहे. आपल्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही. मी माझा जीव उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर ओवाळून टाकल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. गुन्ह्यात अटक झाली तरी हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण अटकपूर्व जामीन घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांचे हित लक्षात घेत १७ नोव्हेंबरपासून मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. बेलापूर ते पेणधर मार्गावर मेट्रो सेवा सुरु होत आहे. नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयीचे निर्देश दिले. सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेणधर या मार्ग क्र. १ वर शुक्रवारपासून औपचारिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
येत्या २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी मनोज जरांगे पाटील नाशिक दौऱ्यावर येत आहेत. २१ ताखेला सायंकाळी त्र्यंबकेश्वर येथे आगमन होणार आहे. २२ तारखेला त्र्यंबकेश्वर येथून अंजनेरी, महिरावणी, सिडको, पाथर्डी गाव, देवळाली कॅम्प आणि शेणीत येथे आगमन होईल. इगतपुरी तालुक्यातील शेणीत या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एकर जागेवर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी दोन समाजात तेढ लावण्याचे काम करू नये अन्यथा मंत्री छगन भुजबळ यांच्या घरावर एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. उपनगरीय रेल्वे मधून सर्वसामान्य मुंबईकर प्रवास करीत असतात रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांचा वापरही मुंबईकरांकडून केला जातो त्यामुळे सामान्य मुंबईकरांना स्वच्छ अशी स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला यासंदर्भात पुढाकार घेण्यास सांगितले त्यानुसार त्यांनी बैठकीतच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दूरध्वनी करून मुंबई महापालिकेच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहे यांची साफसफाई करावी याबाबत चर्चा केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत गोंधळ उडाला. ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक सुरु होती. पण अचानक गोंधळ सुरु झाला. बैठकीत काही शेतकऱ्यांनी उद्याच्या उद्या ऊसतोड देण्याची मागणी केली. शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कारखानदारांनी ठरवून आपले लोक बैठकीत आणले आहेत का, असा सवाल स्वाभिमानीने याविषयी विचारला.
मुंबई : गेल्या 10 वर्षांपासून मी छठपूजेचे आयोजन करत आहे. पण, कांदिवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या दबावामुळे महापालिकेने या वर्षी छठपूजेला परवानगी दिली नाही, असा आरोप कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका अजंता यादव यांनी केला आहे. तर, काँग्रेसच्या आरोपावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भाजपवर केलेले आरोप खोटे आहेत असे म्हटले आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील सभांना सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातील मायणी येथे सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. चितळी रस्त्यावर 45 एकर क्षेत्रात ही सभा होणार आहे. सभेची तयारी पूर्ण झाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे.
दौंड : सरकारने नेमलेल्या समितीने सुरुवातीला काहीच काम केलं नाही. नुसती घरीच बसली. पण आता लै पळती. मराठ्यांनी दणका लावल्यावर समितीने बदल केला. सरकारला माहिती नव्हतं मी लै येडपट म्हणून. ते आले. म्हणले हे लै बेकारय. मी खानदानी शेतकऱ्याचा पोरगा. माझ्या वाट्याला जे कष्ट आले ते लेकराच्या नशिबी येवु नये. अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. पण, आता मराठ्यांचं कल्याण २४ डिसेंबरला होणार असे सांगत मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा कडाडले.
नगर : मनोज जरांगे यांना मिळणारा प्रतिसाद हे त्या समाजाचे दुःख आणि वेदना आहे. रात्री उशिरा लोक त्यांची वाट बघतात म्हणजे आरक्षणाची मागणी अतिशय तीव्र आहे. त्यामुळे सरकारला लवकरात लवकर निर्णय करावा लागेल. उशीर करत बसलो तर त्याचे उलटे पैलू पडत बसणार आहेत, असा इशारा भाजप आमदार सुरेश धस यांनी दिला. तसेच, मराठा समाजाची जी मागणी आहे ती मागणी आम्ही हिवाळी अधिवेशनात मांडणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
मुंबई : मुलुंडमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन करण्यात आले. संजय राऊत यांच्या अंतर्वस्त्रतला फोटो आणि त्यावर राष्ट्रवादीच्या चिन्हाचा लोगो लावण्यात आला होता. यावरून संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी मुलुंड पोलिस ठाणे गाठले. DCP पुरुषोत्तम कराड यांची भेट घेत त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
मनोज जरांगे पाटील यांची 18 तारखेची सभा सातारा शहरातील गांधी मैदानावर होणार आहे. मराठा समन्वयकांचा बैठकीत एकमुखी निर्णय. पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असणाऱ्या शिवतीर्थावर मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मराठा समाजासह खा.उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांनी केला होता विरोध…
मुंबईत रविवारी होणाऱ्या वर्ल्डकप फायनल मॅचच्या पूर्वीच मुंबईतील सर्व मोठे बार रेस्टॉरंट क्लब यांची बुकिंग हाऊसफुल झालीये. आतापासूनच सर्व बुकिंग हाऊसफुल झाल्याने रविवारचा दिवस सुपर संडे म्हणून साजरा केला जाणार आहे.
परभणीत जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा प्रश्न पेटला आहे. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून सत्याग्रह. कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या दिवसात रस्ता रोको करण्याचा इशारा.
5 टक्के व्हॅट वाढीच्या विरोधात बारसंचालकाचे आंदोलन गोंदियामध्ये सुरू आहे. व्हॅट कमी करण्याची केली मागणी. जिल्ह्यातील सर्व बार आज बंद राहणार आहेत.
उद्या राज्य सरकारची कॅबिनेट बैठक ही पार पडणार आहे. दुपारी १२ वाजता होणार कॅबिनेट बैठक, राज्यातील सर्व मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
पंडित धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्र्वर धाम सरकार यांचा पुण्यात दिव्य दरबार भरणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी भरणार दिव्य दरबार तर 22 नोव्हेंबर रोजी होणार हनुमान कथा सत्संग असणार आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. पुण्यातील संगमवाडी जवळ असणाऱ्या मैदानाजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून पोलिसांकडून कार्यक्रम ठिकाणची पाहणी करण्यात करण्यात येणार आहे.
आमच्यामागे कोण हे राज ठाकरे यांनी शोधुन काढावं. कारण याआधी अनेक जणांनी असे आरोप केलेत. जातीय तेढ कोण करतंय हे त्यांनी शोधून काढावं- मनोज जरांगे पाटील
गडचिरोलीमधये बुधवारी मुख्यमंत्र्याचा कार्यक्रमच्या दिवशी नक्षलवाद्यांनी एक पोलीस खबऱ्याची हत्या केली. पिपली बुर्गी पासून तब्बल 40 किलोमीटर अंतरावर नक्षलवाघानी ही घटना घडली. नक्षलवाघांनी ठार मारलेल्याचे नाव दिनेश गावंडे आहे.
मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी दौंडमध्ये मोठी गर्दी झाली आहे. जरांगे यांच्या वरवडमधील सभेसाठी मोठी गर्दी जमली आहे.
स्वःताची जात अनेकांना प्रिय असते मात्र दूसऱ्याच्या द्वेष निर्माण करणं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सूरू झालं असा आरोप राज ठाकरे यांनी केला. याचा धोका म्हणजे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार व्हायला वेळ लागणार नाही असंही ते म्हणाले.
भाजपला मत देणाऱ्यांना रामलल्लाचं मोफत दर्शन घडवणार असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. भाजपने टूर एन्ड ट्रॅव्हल्सचं नवं खातं उघडलं असावं असं ते म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, मराठी पाट्यांविरोधात व्यापारी कोर्टात जातात मात्र मी सुप्रिम कोर्टाचे आभार मानतो की त्यांनी ज्या ज्या राज्यातली जी भाषा आहे तीचा मान राखल्या गेला पाहिजे असं सांगितलं. मात्र सरकारकडून यासाठी कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.
पदवीधर निवडणूकीसाठी पदवीधर नसलेला उमेदवार कसा चालतो असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे.
सत्तेत असेलल्यांसाठी निवडणून आयोगाने नियम शिथील केले आहेत का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. निवडणून आयोगाने नियमात बदल केले असेल तर ते जनतेला आणि आम्हाला सांगावे म्हणजे आम्हीही तसा प्रचार करू असं ते म्हणाले. ते खुर्चीवर बसले आहेत म्हणून त्यांनी फ्री हिट आणि आम्हाला हिट विकेट हा कायदा आम्हाला मान्य नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणूकीत हिंदूत्त्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता असे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र आता अमित शाह आणि नरेंद्र मोदी हिंदूत्त्वाच्या नावावर मत मागत आहेत तर त्यांच्याबद्दल निवडणूक आयोग काही निर्णय घेईल का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
उपांत्यफेरीत विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भारतीय संघाचे कौतूक केल. भारतीय संघाला अंतीम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. विश्वचषक भारतच जिंकणार असा विश्वासही त्यांनी दर्शविला.
गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टिकास्त्र सोडले आहे. आचार संहितेतला बदल फक्त भाजपसाठी केला का? असा सवाल देखील त्यांनी निवडणून आयोगाला विचारला आहे.
सध्या सुरु असलेले राजकारण कधी पाहीलेले नाही. पंतप्रधान मोदी जेथे जातील तेथे मुख्यमंत्र्यांवर टीका करीत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अंतिम निर्णय राज्य आणि केंद्र सरकारच्या हातात आहेत. आम्ही या निर्णयाची वाट पाहत आहोत. इंडीया आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या बैठकीत लवकरच घेतला जाईल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यातील वारजे भागात असणाऱ्या रामनगर टाकी चौक परीसरात रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकींना अज्ञातांनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर एका चारचाकी वाहनाची काच फोडून नुकसान करण्यात आले. ही घटना गुरूवारी मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली असून दोन अज्ञात आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
मराठवाड्यात फिरतोय सगळ्या लोकांची प्रामाणिक इच्छा आहे की, आमची लोकसंख्या आम्हाला कळू द्या आणि त्याच प्रमाणात आरक्षण मिळू द्या. महाराष्ट्रामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे… अन्यथा नेत्यांना महाराष्ट्रात जनता फिरू देणार नाही… असं वक्तव्य संतोष शिंदे यांनी केलं आहे.
आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात पार्थ पवार यांचे स्वागताचे बॅनर झळकले आहेत. भाजप आमदार राम शिंदे यांच्या घराच्या कार्यक्रमाला पार्थ पवार हजेरी लावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनर मुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 8 डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात प्रस्ताव मांडणार आहेत. हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रितसर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. आरक्षण सुप्रिम कोर्टात टिकावं यासाठी सखोल अभ्यास करून रिपोर्ट मागवण्यात आले…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज नौपाड्यातील मनसेच्या कार्यालयाला भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधणार आहेत
बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी नेत्यांचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडले. उद्या अंबडमध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्याच्या निमित्ताने ही बॅनरबाजी करण्यात आली होती.
मात्र हे बॅनर आता फाडण्यात आले असून त्यामुळे ओबीसी समाजाकडून संताप व्यक्त होत आहे. बॅनर फाडणाऱ्यांवर कारवाी करण्याची मागणीही केली जात आहे.
कल्याण जवळील वरब गावामधील टाटा कंपनीत बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. रात्रीच्या वेळी कंपनी बंद असल्याने दुर्घटना टळली. मात्र बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.
उद्धव ठाकरेंची आज दुपारी पत्रकार परिषद होणार. अद्वय हिरेंसंदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
अद्वय हिरे यांना काल मालेगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात आज उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भुसे, राहुल कुल यांच्या घोटाळ्याचे पुरावे देऊनही कारवाई झालेली नाही, असे संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला, तेच अजितदादा भाजपसोबत जातात, ते चालतं का, अशी टीकाही राऊत यांनी केली.
राजकीय दबावतंत्रातून अद्वय हिरेंना अटक करण्यात आल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
भाजपात असतानाही हिरे यांच्यावर हे आरोप होते.
दिवाळीनिमित्त फोडण्यात येणारे फटाके, वाहनांचा धूर, बांधकामांमुळे शहरातील हवेची पातळी धोकायदाक झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी रस्त्यांची रोड वॉशर सिस्टीम असलेल्या वाहनांद्वारे साफसफाई करण्यात येत आहे.
तसेच प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास दंड आकारला जात आहे. नोटीस देऊन दंड वसूल करण्यात येत आहे. शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने 32 प्रभागांमध्ये 16 वायू प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे
गाणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी, श्री उमांगमलज जन्मोत्सवात गणपतीला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे. यामुळे ‘दगडूशेठ’ गणपतीला ११०० नारळांचा नैवेद्य दाखवण्यात आले. असंख्य भाविकांनीही गणरायाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अजमेरा कॉलनी येथील नेत्र रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी महिनाभराचे वेटिंग सुरु झाले आहे. या रुग्णालयात सर्जन आणि आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याने डोळ्याच्या मागील पडद्याच्या रेटिनाच्या शस्त्रक्रियाच होत नसल्याची माहिती समोर आली आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. यात यवतमाळ जिल्ह्यातील 16 महसूल मंडळाचा समावेश आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कर्ज पुनर्गठन, शेतकऱ्यांना वीज बिलात सूट मिळणार आहे.
मुंबईत छटपूजेचा वाद पेटला आहे. पुजेच्या आयोजनावरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. पालिका प्रशासनाने कांदिवली येथे छटपूजेला परवानगी नाकारल्याने मुंबई काँग्रेसने याप्रकरणी आक्रमक झाली आहे.
कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात कारखानदारांकडूनच उसाच्या फडांना आगी लावल्या जात आहेत, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. जळालेला ऊस कारखान्याला नेण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठीमागे लागावा यासाठी हा प्रकार सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भावाला मारहाण केली म्हणून संतप्त तरुणाची कुऱ्हाड घेऊन परिसरात दहशत दाखवण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्हीत कैद. परिसरात आपला दरारा दाखवण्यासाठी एक रिक्षा व एका मोटरसायकलची केली तोडफोड. किरण बाळू शिंगारे असे या आरोपीचे नाव असून विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यातील नौपाडा भागातील मनसे मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची भेट घेणार आहेत. दिवाळीनिमित्त सोबत फराळ देखील करणार आहेत तसेच येणाऱ्या आगामी लोकसभा आणि कोकण पदवीधर मतदारसंघात संदर्भात देखील आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे.
शासनाने परमिट रूमवर कर वाढ केल्याचा विरोधात नागपूर जिल्ह्यातील सर्व बार आज असणार बंद. संविधान चौकात धरणे प्रदर्शन करून जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा रेस्त्रोरेंत परमिट रूम असोसिएशन देणार निवेदन. शासनाने पाच टक्क्यांवरून दहा टक्के केलेली कर वाढ परमिट रूमच्या मुळावर उठणारी असल्याचा नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनचा आरोप. कर वाढीचा निर्णय रद्द करण्याची मागणी.
नागपूर कारागृहात दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उठवायला गेलेल्या जेलरक्षकावर बंदिवांनाचा हल्ला. अन्य बंदीवानांनीही मदतीसाठी आलेल्या रक्षकांना मारहाण केल्याने कारागृह प्रशासनात खळबळ. याप्रकरणी पोलिसांनी इब्राहिम युसुफ खानसह सात जणांविरुद्ध धंतोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केले
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी जिल्हा स्तरावर हालचाली गतिमान. जिल्हा प्रशासनाकडून कुंभमेळ्याच्या तयारीसाठी स्वतंत्र विशेष कक्ष स्थापन करण्याची तयारी. कक्ष स्थापन करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रशासनाचे शासनाला पत्र. कुंभमेळा कक्षाचे कामकाज बघण्यासाठी कर्मचारी देखील नियुक्त केले जाणार.
नागपूरमध्ये दिवाळीत फटाक्यांमुळे वाढला कचरा. दोन दिवसात 2768.13 मेट्रिक टन कचरा निघाला. नियमित शहरातून 1250 मेट्रिक टन कचरा निघतो. महापालिकेच्या 5 हजारावर कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला.
पुण्यातील जिल्हा रुग्णालयात विविध पदांसाठी भरती सुरू. औंध येथील जिल्हा रुग्णालयात होणार विविध पदांच्या भरत्या. ऑफलाईन पद्धतीने करता येणार अर्ज. जिल्हा रुग्णालयातील एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार. इच्छुक उमेदवारांचा अर्ज स्वीकारायला जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ते 20 नोव्हेंबर 2023.
“मरण आले तरी चालेल पण, हा तुमचा मुलगा एक इंचही मागे हटणार नाही. तुम्ही मला दुष्मन समजा, पण मागे हटणार नाही. समितीला मोडी, उर्दू वाचता येत नाही, आणि म्हणे आता अभ्यासक नेमले. आपल्याकडे भाषेचे सोळा प्रकार वाचणारे आहेत. समाजासाठी जो विडा उचलला आहे, तो खाली ठेवणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.