Maharashtra Marathi News Live : मनोज जरांगे पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यात चर्चा, जरांगे यांची समजून काढण्याचा प्रयत्न

| Updated on: Sep 07, 2023 | 7:09 AM

Maharashtra Breaking news LIVE Updates | महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर. मराठा आंदोलकांवर जालना येथे लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे अजूनही राज्यभर पडसाद उमटत आहेत.

Maharashtra Marathi News Live : मनोज जरांगे पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यात चर्चा, जरांगे यांची समजून काढण्याचा प्रयत्न
Follow us on

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच. आरक्षणावर तोडगा न निघाल्याने आंदोलक आक्रमक. आजही राज्यभरात आजही मराठा आरक्षणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांच्या सोडतीतील 3515 हून अधिक विजेत्यांना सोमवारी मुंबई मंडळाकडून तात्पुरते देकारपत्र ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून परदेश दौऱ्यावर. पाच दिवसांचा परदेश दौरा. नाशिकमध्ये गणपती मंडळांना मिळणार घरगुती दराने वीज. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Sep 2023 09:58 PM (IST)

    मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाच्या आरक्षण काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्या, असा संभ्रम काही लोकांकडून पसरवला जात आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं.

  • 06 Sep 2023 09:38 PM (IST)

    लाठीमाराच्या निषेधार्थ करमाळ्यात निषेध मोर्चा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज करमाळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी करमाळा शहर बंद ठेवण्यात आले. जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.


  • 06 Sep 2023 09:14 PM (IST)

    मनोज जरांगे यांची समजून काढण्याचा प्रयत्न

    मनोज पाटील जरांगे आणि केंद्रीय रावसाहेब पाटील दानवे यांच्यामध्ये जवळपास एक तासापासून चर्चा सुरू आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडून मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  • 06 Sep 2023 08:49 PM (IST)

    Mangesh Kadam Join Shinde Shiv Sena | मंगेश कदम यांचा काँग्रेसला जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश

    मुंबई | महाराष्ट्रात राजकीय भूंकपानंतर मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरु आहे. आता काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष, तसेच माजी पंचायत समितीचे सदस्य मंगेश कदम, नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका ज्योती कदम आणि नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव ऍड.धम्मपाल कदम यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्वांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रवेश केला.

  • 06 Sep 2023 08:39 PM (IST)

    Maharashtra MLA Fund Distribution | शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारकडून आमदार निधीबाबत मोठा निर्णय, प्रत्येक सदस्याला किती फंड?

    मुंबई | मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारकडून आमदार निधीवाटपाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. आता सर्व आमदारांना समान निधी दिला जाणार आहे. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील एकूण 345 आमदारांना प्रत्येकी 70 लाख रुपये निधी देण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने निधी वाटपसाठी तब्बल 241 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या आधी आमदारांना 40 लाखाचा टप्पा मंजूर करण्यात आला होता. मात्र आता 70 लाखाचा टप्पा आमदारांना देण्यात आलाय.

  • 06 Sep 2023 08:16 PM (IST)

    Cyber Crime | राज्य सरकारचा सायबर क्राईम रोखण्यासाठी मोठा निर्णय

    मुंबई | राज्य सरकारने सायबर क्राईम रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यातसायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला गेलाय. राज्य सरकारची 6 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत याबाबत निर्णय झाला. या प्रकल्पासाची किंमत तब्बल 837 कोटी रुपये इतकी असल्याचं माहिती देण्यात आली आहे. नागरिकांना या प्रकल्पामुळे एका फोनवर तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार निवारण केंद्र हे 24 तास सुरु असणार आहे.

    मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

  • 06 Sep 2023 08:01 PM (IST)

    ज्यांच्या वंशावळीमध्ये कुणबी प्रमाणपत्र त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल-राजेश टोपे

    ज्यांच्या वंशावळीमध्ये कुणबी प्रमाणपत्र त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे भाष्य राजेश टोपे यांनी केले आहे. राजेश टोपे म्हणाले की, मी मनोज पाटील जरांगे यांच्या आंदोलनाचा मी साक्षीदार आहे असेही राजेश टोपे म्हणाले आहेत.

  • 06 Sep 2023 07:47 PM (IST)

    Jalna News : राजेश टोपे यांनी केले अत्यंत मोठे भाष्य

    ज्या सवलती ओबीसींना मिळत असतील त्याच स्वरूपाच्या सवलती आता मराठा समाजाला मिळतील असे मोठे विधान राजेश टोपे यांनी केले आहे.

  • 06 Sep 2023 07:45 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये संवाद

    अर्जुन खोतकर यांच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली आहे. यावेळी महत्वाची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

  • 06 Sep 2023 07:33 PM (IST)

    ज्या नोंदी कुणबीच्या आहेत आता तो आदेश काढला जाईल- अर्जुन खोतकर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, ज्या नोंदी कुणबीच्या आहेत आता तो आदेश काढला आहे. गुन्हे वापस घेण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये विषय घेतल्या जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी प्रेसमध्ये केलीये. 

  • 06 Sep 2023 07:30 PM (IST)

    Jalna News : अर्जुन खोतकर यांचे मोठे भाष्य

    मी आणि राजेश टोपे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होतो. मनोज पाटील यांच्या मागण्या बऱ्याच प्रमाणात मान्य झाल्या आहेत, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे. 

  • 06 Sep 2023 07:15 PM (IST)

    Jalna News : मनोज जरांगे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या मोठा निरोप

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे हे दोघे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे निघाले आहेत. रामदास आठवले हे देखील मनोज जरांगे पाटील यांना भेटण्याठी निघाले आहेत.

     

  • 06 Sep 2023 07:10 PM (IST)

    Mumbai News : मुंबई बाजारपेठ रंगीबेरंगी मटक्यांनी सजली

    दहीहंडीनिमित्त नवी मुंबईतील बाजारपेठ रंगीबेरंगी मटक्यांनी सजली आहे. विविध प्रकारचे रंगीबेरंगी लहान मोठे मटके सध्या बाजारात उपलब्ध असल्याचे बघायला मिळतंय. सध्या बाजारात मटक्यांची किंमत 200 रुपयांपासून सुरू आहे.

  • 06 Sep 2023 06:45 PM (IST)

    भारत आणि इंडिया वाद: सरकारकडे घटनादुरुस्तीचा कोणताही प्रस्ताव नाही

    भारत आणि इंडिया या नावावरून सध्या वाद सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बाबत सध्या सरकारकडे कोणत्याही घटनादुरुस्तीचा प्रस्ताव नाही. कारण कोणत्याही घटनादुरुस्तीची गरज नाही. संविधानात भारत आणि इंडिया या दोन्ही नावांचा उल्लेख आहे, त्यामुळे कोणताही शब्द कुठेही वापरता येतो.

  • 06 Sep 2023 06:30 PM (IST)

    संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोनिया गांधीं यांना लिहिलं पत्र

    संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. परंपरेचे पालन करून विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याचे पत्रात लिहिले आहे.

  • 06 Sep 2023 06:13 PM (IST)

    सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येईल ही अपेक्षा सोडून दिली- जरांगे पाटील

    मराठा आरक्षणासाठी सरकारचं शिष्टमंडळ आमच्या भेटीला येईल ही अपेक्षा आम्ही सोडून दिली आहे. आम्ही सरकारला नाही तर सरकारच आम्हाला वेठीस धरत आहे. ओबीसी आणि मराठ्यांनी समन्वयाने वागावं. आपण एकदिलानं राहू, एकमेकांवर चिखलफेक करायला नको.

  • 06 Sep 2023 06:03 PM (IST)

    आम्ही पुरावे देऊ, जीआर काढा- मनोज जरांगे पाटील

    एका दिवसात अध्यादेश काढता येईल एवढे पुरावे आम्ही देतो. सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं. हैदराबादपासूनचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. रिक्षा डंपर भरून पुरावे माझ्याकडे आहेत. चार दिवसांचा वेळ दिला होता त्यात कॅबिनेट बैठकही झाली. सरकारचा वेळ वाचवण्यासाठी एका दिवसात पुरावे देऊ. राज्यपालांचा परवानगी घेऊन सरकारने अध्यादेश काढावा. आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठीही तज्ज्ञ देण्याची तयारी आहे.

  • 06 Sep 2023 05:51 PM (IST)

    मराठा आरक्षणावर सर्वात मोठी बातमी

    मुंबई | मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रांची चाचपणी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती स्थापन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 06 Sep 2023 05:18 PM (IST)

    मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखला

    सोलापूर : मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखलाय. आंदोलनकर्त्यांनी बाळे येथील पुलाजवळ टायर जाळून रास्तारोको केला.  सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यावेळी पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास दोन किलोमीटर पर्यंत खोळंबल्याचे पाहायला मिळाले.

    “सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. 58 मोर्चे शांततेत काढलेत. मात्र यापुढे आरक्षण मिळाले नाही तर उग्र आंदोलन पहायला मिळतील. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून 50% च्या आत आरक्षण द्यावे. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. राज्यातील सर्व वस्तीगृह तात्काळ सुरू करून ते जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत ठेवावेत”, अशी मागणी आंदोलकांनी केली.

  • 06 Sep 2023 04:58 PM (IST)

    चिपळूणमध्ये चिमुकल्यांची दहीहंडी उत्साहात

    चिपळूण | चिपळूणमधील युनायटेड हायस्कूलच्या प्रांगणात चिमुकल्यांची दहीहंडी उत्साहात पार पडत आहे. पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्साहात साजरी केलीय. दहीहंडी फोडताना चिमुकल्यांचा उत्साह पाहायला मिळाला. चिमुकल्यांनी चिखलात नाचत, मौज मस्ती करत दहीहंडी फोडली.

  • 06 Sep 2023 04:27 PM (IST)

    दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल

    पुणे | दहीहंडी हा सण उद्या पुण्यासह राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. ही दहीहंडी पाहण्यासाठी पुण्यातील रस्त्यांवर हजारोंची गर्दी उसळणार असल्याची शक्यता आहे. उद्या पुण्यातील काही रस्ते ठराविक काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 06 Sep 2023 04:21 PM (IST)

    Cabinet Meeting News : पुन्हा मनोज जरांगे यांची मनधरणी

    राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील उपोषणावर चर्चा झाली. मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी पुन्हा शिष्टमंडळ उपोषणस्थळी जाण्याची शक्यता आहे.

  • 06 Sep 2023 04:13 PM (IST)

    India Alliance : सहभागी व्हायला तयार, पण निमंत्रण नाही

    इंडिया आघाडीत सहभागी व्हायचे की नाही यासंबंधी येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे वंचित बहुजनचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तर AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी, इंडिया आघाडीत जाण्याची इच्छा बोलून दाखवली, पण या आघाडीकडून निमंत्रणच मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

  • 06 Sep 2023 04:09 PM (IST)

    Prakash Ambedkar News : आरक्षणप्रश्नी मराठा पुढाऱ्यांनी तोडगा काढावा -प्रकाश आंबेडकर

    आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा पुढाऱ्यांनी तोडगा काढावा असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तर मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. ओबीसी प्रवर्गावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे बाळासाहेब थोरात यांनी मागणी केली.

  • 06 Sep 2023 03:48 PM (IST)

    जालना येथील लाठीचार्ज राज्य सरकारने जाणून बुजून केलेलं पाप – नाना पटोले यांची टीका

    जालना येथील उपोषण हे मुख्यमंत्र्यांनी करायला लावलेलं होतं. तर आंदोलकांवर सौम्य लाठीचार्जचे आदेश गृहमंत्री यांचे होते. मात्र, सौम्य लाठीचार्ज मोठे झाले. मुंबईमध्ये इंडिया अलायन्सची बैठक सुरू होती. या बैठकीतील मुद्द्यांकडे मुंबईसह साऱ्या देशाचे लक्ष होते. त्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी जालना येथील लाठीचार्जचे पाप राज्य सरकारने केल असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात पहिल्यांदाच जाहीर माफी मागितली. गुन्हा केला म्हणून त्यांनी माफी मागितली. जाणून बुजून केलेलं हे प्रकरण होतं, असेही ते म्हणाले.

  • 06 Sep 2023 03:36 PM (IST)

    आंदोलन चिघळले तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? आदित्य ठाकरे

    मुंबई : जालना येथे जे आंदोलन सुरु आहे. ते सध्या शांततेत सुरु आहे. पण जे आंदोलन जर चिघळले तर त्याची जबाबदारी कोण घेणार> कारण राज्य सरकारची कोणतीही हालचाल दिसत नाही. जे तिकडे गेले ते आमदार, नगरसेवक यांना निधी मिळाला. पण महाविकास आघाडी मध्ये जे आहेत त्यांना निधी मिळाला नाही. त्याबाबत लवकरच सर्विस्तर बोलणार आहेच असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

  • 06 Sep 2023 03:33 PM (IST)

    Aaditya Thakckrey : असं वाटत होतं की शत्रूंवर लाठीचार्ज होतोय- आदित्य ठाकरे

    जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर गंभीर आरोप देखील केले. केंद्र सरकार देशाला धक्का लावून पावलं उचलत असल्याचेही ते म्हणाले. जालन्याच्या लाठीचार्ज घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले की, असं वाटत होतं की शत्रूंवर लाठीचार्ज होतोय.

  • 06 Sep 2023 03:23 PM (IST)

    प्रशासन, राज्य कसं चालवायचं ? हे जरा त्यांना शिकवा – आदित्य ठाकरे

    मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत त्यांना बोलावून जरा समज द्यावी. प्रशासन चालतं कसं आणि राज्य चालवायचं कसं? हे जरा त्यांना शिकवा. कारण सगळीकडेच अशी अंदाधुंदी दिसत आहे. आज राज्यामध्ये एक मुख्यमंत्री घटनाबाह्य गद्दार आणि दोन उपमुख्यमंत्री या तिघांमध्ये खरे जनरल डायर कोण आहेत ते समजले पाहिजे. मी चौकशी समिती बसवली जाईल, पण, खारघरमध्ये तशी समिती बसवली आहे. त्याच्यावर अजून काही कारवाई झाली नाही. त्याचा रिपोर्ट आला नाही. रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला दोषी ठरवून कारवाई केली जाईल. पण, यामागचे खरे सूत्रधार समोर आलेच पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 06 Sep 2023 03:22 PM (IST)

    Maratha Aandolan : लाठीचार्जचा आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत? – आदित्य ठाकरे

    जालन्यातील लाठीजार्जच्या घटनेवरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला प्रश्न केला आहे. लाठीचार्चचा आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत राज्यपालांची भेट घेतली. अशा संवेदनशील आंदोलनात परवानगी शिवाय लाठीचार्ज होणे शक्य नसल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 06 Sep 2023 03:12 PM (IST)

    उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट   

    उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, आमदार सचिन अहिर आदि नेते यावेळी उपस्थित होते.

     

  • 06 Sep 2023 03:03 PM (IST)

    सोलापूर-पुणे मार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची धार दिवसेंदिवस तेज होत असताना आता सोलापूर – पुणे मार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेत या महामार्गावरील वाहतूक काही वेळाने पूर्ववत सुरु करण्यात आली आहे.

  • 06 Sep 2023 02:35 PM (IST)

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता मिळणार

    कांदा उत्पादत शेतकऱ्यांना सानुग्रहाचा पहिला अनुदानाचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

  • 06 Sep 2023 02:20 PM (IST)

    हिंगोली – मराठा आरक्षणासाठी गावकऱ्यांचे टॉवरवर चढून आंदोलन

    सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे मराठा समाजाचे टॉवरवर चढून आंदोलन. जरांगे पाटील यांना आम्ही एकटं सोडणार नाही असे सांगत गावकऱ्यांची राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला आहे.

     

  • 06 Sep 2023 01:51 PM (IST)

    इंडीयातील सहभागाविषयी दोन दिवसात भूमिका स्पष्ट करणार – प्रकाश आंबेडकर

    इंडीया विरुध्द भारत वादात विरोधी पक्ष हा भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकत चालला आहे. भारत आणि इंडीया एकमेकांच्या विरोधात नाही. आपल्या इंडीयातील सहभागाविषयी आपण दोन दिवसात भूमिका स्पष्ट करु असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. राज्यात ओबीसी – मराठा आणि मराठा वंजारी वाद लावायचं सध्या काम सुरू आहे, मराठा आरक्षणात काँग्रेस तेल ओतत आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे.

     

  • 06 Sep 2023 12:33 PM (IST)

    नवं विधेयक आणण्याबाबत चर्चा

    मराठा आरक्षणासंदर्भात विधेयक आणण्यासाठी एकमत झाल्यास एक दिवसाचं अधिवेशन बोलावलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. नवं विधेयक आणण्याबाबत चर्चा होणार आहे.

  • 06 Sep 2023 12:18 PM (IST)

    विरारमध्ये एका 16 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

    तुषार सचिन उंबाळकर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून मंगळवारी रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास तुषार आणी त्याचे दोन मित्र पोहण्यासाठी विरार पश्चिमेच्या चिकल डोंगरी तलावावर गेले होते. तुषारला पोहायला येत नव्हते त्याचे दोन मित्र पाण्यात पोहत असताना तो किनाऱ्यावर बसून बघत असताना त्याचा तोल जाऊन तो पाण्यात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • 06 Sep 2023 12:10 PM (IST)

    नवी मुंबईतील खारघरमध्ये बसला भीषण आग

    आग लागलेल्या बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र आगीमध्ये बस जळून पूर्णपणे खाक झालीये. आता आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. धूर येऊ लागताच सर्व प्रवासी बाहेर पडले मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली याचं कारण अस्पष्ट आहे.

  • 06 Sep 2023 11:55 AM (IST)

    LIVE UPDATE | ‘आरक्षण मिळाल्याशिवाय बाबा माघार घेऊ नका’, मनोज जरंगे यांची मुलगी

    ‘आरक्षण मिळाल्याशिवाय बाबा माघार घेऊ नका’ असं वक्तव्य मनोज जरंगे यांच्या मुलीने केलं आहे. माझे पप्पा हट्टी आहेत, ते असे उठणार नाहीत. बाबांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार असेल. लाठीचार्ज झाला त्यात पोलिसांचा दोष नाही. वरून ऑर्डर आल्यामुळे लाठीचार्ज केला असणार.. असं देखील मनोज जरंगे यांची मुलगी म्हणाली.

  • 06 Sep 2023 11:35 AM (IST)

    LIVE UPDATE | पंतप्रधान मोदी यांच्या नावापुढे ‘पीएम ऑफ भारत’ असा उल्लेख

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापुढे ‘पीएम ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. इंडोनेशिया दौऱ्यावरील सरकारी पुस्तिकेत ‘पीएम ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्याकडून पुस्तिकेचा फोटो ट्विट करण्यात आला आहे.

     

  • 06 Sep 2023 11:22 AM (IST)

    LIVE UPDATE | पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक

    पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आईचं निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी गुलाबराव पाटील यांच्या आईने अखेरचा श्वास घेतला आहे.

     

  • 06 Sep 2023 11:12 AM (IST)

    LIVE UPDATE | शरद पवार यांच्या सभेनंतर अजित पवारांची कोल्हापूर आणि जळगावात उत्तरसभा

    शरद पवार यांच्या सभेनंतर अजित पवारांची कोल्हापूर आणि जळगावात उत्तरसभा होणार आहे. १० तारखेला कोल्हापुरात तर गणेशोत्सवानंतर जळगावात सभा होणार आहे.

  • 06 Sep 2023 11:03 AM (IST)

    उद्धव ठाकरेंची 10 सप्टेंबरला जळगावमध्ये जाहीर सभा

    उद्धव ठाकरे यांची 10 सप्टेंबर रोजी जळगावात जाहीर सभा होणार आहे. नगरमधील दुष्काळी दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आता जळगावचा दौरा देखील करणार आहेत.

  • 06 Sep 2023 10:45 AM (IST)

    मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांची आंदोलनाची हाक

    मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये आंदोलन होणार आहे.

    मुंबईतील संयुक्त किसान मोर्चाच्या 27 संघटनांच्या बैठकीत या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

  • 06 Sep 2023 10:33 AM (IST)

    ठाकरे गटाचे आमदार, खासदार राज्यपालांना भेटणार

    जालन्यात झालेल्या लाठीचार्जप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार आज राज्यपालांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्यातर्फे करण्यात येणार आहे.

    आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज दुपारी २ वाजता घेणार राज्यपालांची भेट.

  • 06 Sep 2023 10:19 AM (IST)

    मराठा समाजाच्या वतीने सोलापूर-बार्शी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु

    सोलापूरमध्ये मराठा समाजाच्या वतीने सोलापूर – बार्शी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. बाळे येथील टोल नाक्याजवळ आंदोलन सुरू आहे.

    या रास्ता रोको आंदोलनात उत्तर सोलापूर तालुक्यातील समस्त मराठा आंदोलक सहभागी झाले आहेत.

  • 06 Sep 2023 10:15 AM (IST)

    अमित शाह १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर

    १६ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला ते संभाजी नगरमध्ये येणार आहेत.

  • 06 Sep 2023 10:12 AM (IST)

    यापुढे इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्याच बैठका होणार – सूत्रांची माहिती

    यापुढे इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्याच बैठका होणार आहेत. पटना, बंगळुरू, मुंबई प्रमाणे मोठ्या बैठका होणार नाहीत. समन्वय समितीच निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 06 Sep 2023 09:58 AM (IST)

    धुळे सोलापूर हायवेवर रस्ता रोको आंदोलन

    मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी धुळे सोलापूर हायवेवर रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. धुळे सोलापूर हायवेवरील देवगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले आहेत.

  • 06 Sep 2023 09:32 AM (IST)

    राजकीय पराभवाच्या भीतीमुळं सरकार देशाचं नाव बदलतंय, राऊतांचा गंभीर आरोप

    देशाच्या नावाची सुध्दा केंद्र सरकारला भीती वाटू लागली आहे. इंडिया आघाडी यांना घाबरणार नाही सत्तेत येणार आहे. १० वर्षात देश एक इंच देखील पुढं गेला नाही अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली. सध्याचा सरकारकडे कोणत्याही विषयात तोडगा नाही. तुम्हाला नाव बदलण्याचा अधिकार कुणी दिला असा राऊतांनी सवाल उपस्थित केला आहे. देशाचं शासन देशाच्या नावाला घाबरतंय.

  • 06 Sep 2023 09:07 AM (IST)

    १८ कुटुंबातील तरुण सरकारी नोकरी मिळविण्यासाठी पात्र

    बारवी धरण प्रकल्पात जमीन गेल्यानंतर बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या १८ कुटुंबातील तरुण सरकारी नोकरी मिळविण्यासाठी पात्र ठरले आहेत. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी घेतलेल्या बैठकीत तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून १८ तरुणांना पात्र ठरविण्याचे निर्देश दिले.

  • 06 Sep 2023 09:01 AM (IST)

    Lampi Virus : कोल्हापुरात लम्पीमुळे किती हजार जनावर बाधित?

    कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला. जिल्ह्यात 2 हजार पेक्षा जास्त लम्पीबाधित जनावरं. करवीर तालुक्यात सर्वाधिक फैलाव. भुदरगड राधानगरी तालुक्यातील प्रादुर्भाव रोखण्यात काही अंशी यश. आतापर्यंत जिल्ह्यात लम्पीने 752 जनावरांचा मृत्यू. आजार नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला करावी लागतेय धडपड.

  • 06 Sep 2023 08:48 AM (IST)

    Maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

    मराठा आरक्षण आंदोलनासाठी जालना येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर सलाईन लावून उपचार सुरु आहेत.

  • 06 Sep 2023 08:40 AM (IST)

    India vs Bharat वादावर अभिनेते जॅकी श्रॉफ म्हणतात…

    G20 परिषदेच्या डिनर कार्यक्रमाच राष्ट्रपती भवनाकडून निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्यावर प्रेसिडंट ऑफ भारत म्हटलं आहे. अभिनेता जॅकी श्रॉफ म्हणतो की, “भारताला भारत म्हटलं, तर त्यात काही चुकीच नाहीय. नाव बदललं म्हणून आपण बदलणार नाही”

  • 06 Sep 2023 08:18 AM (IST)

    Rain update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे आजपासून पुणे परिसरात व राज्यातही पावसाची शक्यता आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शिवाय हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यमी यांची माहिती.

  • 06 Sep 2023 08:00 AM (IST)

    Rahul Gandhi : राहुल गांधी आजपासून परदेश दौऱ्यावर, पॅरिसमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

    राहुल गांधी आजपासून परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. राहुल गांधी यांचा हा पाच दिवसांचा परदेश दौरा आहे. 7 सप्टेंबरला ब्रुसेल्समधील युरोपियन खासदारांसोबत राहुल गांधी यांची बैठक होणार आहे. पॅरिसमधील विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशीही राहुल गांधी संवाद साधणार आहेत.

  • 06 Sep 2023 07:45 AM (IST)

    Rain : पुण्यासह राज्यात आजपासून मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे आजपासून पुणे परिसरात व राज्यातही पावसाची शक्यता आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, शिवाय हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याची माहिती पुणे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यमी यांनी दिली आहे.

  • 06 Sep 2023 07:31 AM (IST)

    Manoj Jarange | मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच, आज नववा दिवस

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला चार दिवसांची मुदत दिली आहे. या काळात राज्य सरकारने निर्णय नाही घेतल्यास मराठा आंदोलकांचा उद्रेक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

  • 06 Sep 2023 07:18 AM (IST)

    shiromani akali dal : शिरोमणी अकाली दल इंडिया आघाडीत सामील होणार; दिल्लीत मोठ्या घडामोडी

    शिरोमणी अकाली दल इंडिया आघाडीत सामील होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी या संदर्भात बैठक होणार असून त्यात शिरोमणी अकाली दलाच्या इंडिया आघाडीच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे.