मुंबई | 8 ऑक्टोबर 2023 : रत्नागिरीतील मंडणनगड न्यायालयाचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रकृती खालावली. मुलुंड टोलनाक्याच्या विरोधात उपोषण सुरू असताना जाधव यांची प्रकृती बिघडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुलुंड येथील उपोषणकर्त्यांना भेटणार. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध सुरूच. रात्रभर रॉकेटचा हल्ला. इस्रायलमधील 250 आणि गाजातील 230 लोक ठार. यासह राज्य, देश आणि विदेशातील घडामोडी जाणून घ्या.
नवी दिल्ली | राजकीय विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्ष-चिन्ह लढाईवर 11 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती पार्डी वाला आणि मनोज मिश्रा यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण लढाई आहे. या सुनावणीकडे आता साऱ्या देशाचं लक्ष असणार आहे.
डोंबिवली | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डोंबिवलीमध्ये मुक आणि मशाल मोर्चा काढण्यात आला आहे. ‘ होऊ दे चर्चा’ या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली. त्यामुळे निषेधात ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्यात आला. डोंबिवली स्टेशन परिसरातील ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालय ते स्टेशन रोड डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढला. यावेळेस ठाकरे गटातील डोंबिवलीतील पदाधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी : मी जी घोषणा केली होती त्यानुसार राज्यातील छोट्या गाड्यांना आम्ही टोल मुक्ती दिली आहे. मात्र. कमर्शियल व्हेईकलवर आपण महाराष्ट्रात टोल घेतो. ते पैसे आपण राज्य सरकारच्या माध्यमातून देतो असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
चाळीसगाव : शहरातील नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव विधानसभेचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी समोर आणला आहे. या शासकीय निवासी शाळेत मुलांना किड लागलेला भाजीपाला खाऊ घातला जात होता. महत्त्वाची गंभीर बाब म्हणजे शाळेतील शैक्षणिक दर्जा अतिशय खालावलेला दिसून आला. आमदार मंगेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले असता त्यांना वाचता आणि लिहिताही आले नाही.
पंढरपुर : शरद पवार जर माढ्यातून लढणार असते तर मला खूप आनंद झाला असता. परंतु पवार माढ्यातुन लढणार नाहीत अशी घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यामुळे भविष्यात मला माढा लोकसभा वन वे आहे, असा दावा खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी केलाय. सध्या माढा लोकसभेतुन मला कोणीही प्रतिस्पर्धी दिसत नाही असेही ते म्हणाले.
पुणे : 2015 मध्ये राज्यात फडणवीस यांचे सरकार असताना काही टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली. ही वस्तुस्थिती आहे. मात्र ठराविक टोल नाक्यावर हि टोलमुक्ती आहे. राज्यात इतर टोलनाक्यावर सर्वच वाहनांकडून टोल वसूल केला जातो. त्यामुळे टोलवर केलेला खर्च आणि झालेली वसुली प्रशासनाने जाहीर केली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली आहे.
अजितदादा गट ते नेते चालवत नाहीत, दिल्लीतील अदृश्य शक्ती तो गट चालवते. त्यामुळे त्यांची रिएक्शन बीलेटेड असते. आम्ही करतो ते लगेच अदृश्य शक्तींना कळतं. दिल्लीतील अदृश्य शक्तीने महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करून ठेवला आहे, असे सुप्रिया सुळे यांनी थेट म्हटले.
दोन अडीच वर्षे झाले येथील कामगार काम करत आहेत. कामगार मंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे यांच्यावर ही वेळ आली. त्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहणे गरजेचे आहे. सरकार उभे राहताना दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांना पत्र आहे या कामगारांना घेतले पाहिजे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.
आम्ही सत्तेत आल्यावर प्रत्येक पालकमंत्र्यांना फिरावे लागेल. आपल्या राज्यात कोणीही आमदार बीके गां नाही. आमच्या सरकारमध्ये एकालाही औषध कमी पाडणार नाही. शेतकऱ्यांना हमीभाव देणार. मात्र या ट्रिपल इंजिन खोके सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय दिला, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
आमदार बच्चू कडू यांनी केले मंत्रीपदाबद्दल मोठे विधान. म्हणाले, मला मंत्री व्हायचे नाही केले तर होणार नाही जास्तच आग्रह केला तर राजकुमार पटेलला देऊ प्रहार तर्फे.
मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोची ट्रायल चाचणी घेण्यात आली. एमआयडीसी ते विद्यानगरी स्थानकादरम्यान ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती MMRDA ने दिली आहे. मुंबई मेट्रो-3 मार्ग संपूर्णपणे भूमिगत असल्याने स्थानकातील तिकीट खिडकी पण जमिनीखालीच असेल. हे प्लॅटफॉर्म जमिनीच्या खाली 18-20 मीटर खोल असतील.
राष्ट्रवादीत कुठलीही फूट नसल्याचा दावा करता करता शरद पवार गट केंद्रीय निवडणूक आयोगानंतर सुप्रीम कोर्टात पोहचला. त्यांनी अजित पवार गटाचे आमदार अपात्र ठरविण्यासाठी याचिका दाखल केली. आता अजित पवार गटाने तोच कित्ता गिरवला आहे. त्यांनी शरद पवार गटातील आमदारांना अपात्र करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी कॅव्हेट सुद्धा करण्यात आले आहे.
छगन भुजबळ हे सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करत आहे. मी त्यांना उत्तर दिले असते, पण ते माझ्या वयाचे नाहीत. ते वयाने मोठे आहेत, त्यामुळे वयाचा आदर राखत आहे. ते माझ्या वयाचे असते तर त्यांना करार जबाब दिला असता, असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावले.
जिल्ह्यातील जत तालुक्यावर वरूण राजा रुसल्याने दुष्काळ पडला आहे. येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी द्राक्ष छाटण्या रखडल्या आहेत. मागील वर्षी अधिकच्या पावसाने तर चालू वर्षे पावसा अभावी छाटण्या खोळंबल्या आहेत.
हे सरकार इंग्रजांपेक्षा बत्तर आहे, इंग्रज तरी बरे होते. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यासंदर्भात काँग्रेसचा कुणाचाही विरोध नाही, मात्र प्रॉपर प्रस्ताव येत नाही तोपर्यंत चर्चा कशी करायची. काँग्रेस सत्तेवर आल्यावर जातीनिहाय जनगणना करणार. काँग्रेसमध्ये कुठलीही गटबाजी नाही, गटबाजी राहिली असती तर कसबा कसा जिंकलो – नाना पटोले
येलो मोझॅक, खोडकूज आणि मुळकुज या रोगांमुळे जिल्ह्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे आणि त्यामुळे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रभावित शेतांची पाहणी केली. चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन हे मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणारं नगदी पीक आहे. जिल्ह्यातील 67 हजार हेक्टर भागावर सोयाबीनची लागवड केली जाते आणि यातील जवळजवळ 52 हजार हेक्टर सोयाबीन हे खराब झालंय. चिमूर मतदार संघाचे आमदार बंटी भांगडीया यांच्या सोबत त्यांनी प्रभावित भागांचा दौरा केला आहे.
बारामती-मोरगाव रस्त्यावर लोणी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन. मनोज जरांगे यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाचं आंदोलन. बारामती-मोरगाव रस्ता रोखत केलं आंदोलन.शासनानं मराठा समाजाला न्याय देण्याची आग्रही मागणी.
भुजबळांच्या याचिकेचं पुढे काय झालं असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे. सरकार या संदर्भात फेर विचार याचिका कधी दाखल करणार असल्याचेही दमानिया यांनी विचारले. मंत्री छगण भूजबळ यांच्या विरोधात अंजली दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
टोल बाबतची याचीका शिंदेंनी मागे का घेतली असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. ही याचीका मागे घेण्यास कुणी सांगितलं का असेही म्हणाले. टोल दरवाढी विरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. निवडणूका जवळ आल्यानं शिंदेंना जनतेचा आक्रोश परवडणार नाही, असेही ते म्हणाले. टोल दर वाढी विरोधात दोन तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.
अहमदनगरच्या राहूरीमध्ये मनोज जरांगे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी आणि जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली. अहमदनगर शहरातील निंबळक रस्त्यावरील रेणुकामाता मंगल कार्यालयात जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
सोलापूरच्या कुर्डूवाडीत आज राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यावेळी संबोधित करतील. त्यानंतर पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आलेले आहे.
वर्धेत बँक खाते तयार करण्याच्या नावाखाली एका तरूणाची दोन लाख रूपयांनी फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मनसेचे अविनाश जाधव यांनी टोल दरवाढीवरून उपोषण सुरू केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाधव यांची भेट घेतल्यानंतर ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. उपोषण वैगरे आपलं काम नाही असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा झेंडा उत्तर पुणे जिल्ह्यातील गावोगावी घेऊन जाणारे शिवसैनिकांचे लाडके व्यक्तिमत्त्व, मंचर मध्ये सर्वांना बरोबर घेऊन चालणारे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक एड. अविनाश रहाणे यांचे 57 व्या वर्षी आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण आंबेगाव तालुक्यावर शोककळा पसरली.
येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुद्दा मांडेन. अविनाश जाधव यांना उपोषण मागे घ्यायला लावलं आहे. कारण माणूस मेला तरी सरकारला काही फरक पडत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
गेल्या ४ दिवसांपासून अविना जाधव यांचं उपोषन सुरु आहे. रस्ते नीट बांधले जाणार असतील तर टोल का वसुल करता. टोलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखल केलेली याचिका का मागे घेतली असा सवाल राज ठाकरे यांनी केला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सकाळी 11 वाजता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेचा क्रमांक 13 आहे. विधासभा अध्यक्षांनी 9 मंत्र्यावर अपात्रतेची करावी आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टानx निर्देश द्यावेत अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी सुरु होणार आहे.
डीएसके प्रकरणात आतापर्यंत 100 हुन अधिक ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे. डीएसके यांनी 35 हजार गुंतवणूकदार आणि बॅंकांची सुमारे 3 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका आहे. तब्बल 35 हजार गुंतवणूकदारांची 1163 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. गुंतवणूकदारांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. काही ठेवीदारांकडे आता आजारपणाला देखील पैसे नाहीत. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची भेट घेऊन लवकरात लवकर प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढण्याची विनंती करण्यात येणार आहे.
काँग्रेस पक्षाकडून पुण्यात आज पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे हे उपस्थित आहेत. बैठकीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आढावा घेण्यात येणार आहे. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे.
ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या ठिकाणी मनसेचं आमरण उपोषण सुरू आहे, टोल दरवाढ मागे घ्यावी यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत. याच उपोषणाच्या चौथ्या दिवशी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे अविनाश जाधव आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे शिवतीर्थावरुन ठाण्यासाठी रवाना झाले आहेत.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचे काय झाले? यासाठी अंजली दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. विधिमंडळात दिलेल्या आश्वासनांनुसार या संदर्भातील फेरविचार याचिका महाराष्ट्र सरकार कधी दाखल करणार? अशी विचारणा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सकाळी ११ वाजता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. विधासभा अध्यक्षांनी ९ मंत्र्यावर अपात्रतेची करावी आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टान निर्दीश द्यावेत, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे
रेडिओ कंट्रोलने उडणाऱ्या विमानांचा एरोमॉडेलिंग शो पुणे शहरात होणार आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने या शोचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उडणारा गरुड, उडता मासा, उडती तबकडी, दोन पंखी बायप्लून, बॅनरसह हवाई पुष्पवृष्टी करणारे सेस्ना विमान असणार आहे.
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर, घोडेगाव परिसरात डोळ्यांची साथ पुन्हा आली. या गावांमध्ये डोळे आल्याने रुग्णालयात रुग्णाची संख्या वाढली आहे. गणेश विसर्जनानंतर रुग्णाच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे.
किंग सर्कल रेल्वे ब्रिज खाली ट्रक अडकला आहे. जवळपास अर्ध्यतासच्या प्रयत्नानंतर हा ट्रक बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. काचच्या साहित्य घेऊन हा ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. परंतु ट्रक ब्रीज खाली अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झाली.
उल्हासनगरमधील ठाकरे गटाच्या चौक सभांच्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. ठाकरे गटातील २७ पदाधिकारी आणि कर्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे आज कोकणातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार घेणार आहेत. आज उद्धव ठाकरे रत्नागिरी – सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा आहेत.
अविनाश जाधवांचं ४ दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. टोल दरवाढीविरोधात अविनाश जाधव यांचं उपोषण सुरु आहे. राज ठाकरे उपोषणस्थळी भेट देणार आहेत.
किंग सर्कल रेल्वे ब्रिज खाली ट्रक अडकला आहे. अनेक प्रकारचेच्या साहित्य घेऊन ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक बाजू करण्याचे काम सुरू
शुक्रवारी रात्री पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने इस्त्रायलवर हल्ला (Israel Palestine Crisis) चढवला. शनिवारी सकाळी पॅलेस्टाईनच्या हमास गटाने गाझा पट्टीत हल्ला तीव्र केला. युद्धादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे….वाचा सविस्तर
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. या हल्ल्यात दोन्ही देशाचे सुमारे 480 नागरिक ठार झाले आहेत. मारले गेलेल्यांमध्ये नेपाळमधील 9 नागरिकांचाही समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा ही हायफा आंतरराष्ट्रीय महोत्सवात भाग घेण्यासाठी इस्रायलला गेली होती. पण युद्ध सुरू झाल्यापासून तिचा काहीच संपर्क होत नसल्याने खळबळ उडाली आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मुलुंड चेकनाका येथे टोल दरवाढीविरोधात उपोषण सुरू केलं आहे. गेल्या चार दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. उपोषण सुरू असताना अविनाश जाधव यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे जाधव यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे उपोषणस्थळी येणार आहेत. आज सकाळी 10 वाजता राज ठाकरे मुलुंड चेकनाका येथे येणार आहेत.
पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाटात नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात खासगी बस दरीत कोसळली. बस 50 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने बसमधील 13 ही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. बस दरीत कोसळताना झाडाझुडपात अडकल्याने मोठा अनर्थ टळला.
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरूच आहे. हमासने इस्रायलवर रात्रभर रॉकेटचा मारा केला. या हल्ल्यात आतापर्यंत इस्रायलमधील 250 नागरिकांचा तर गाजामधील 230 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासातील या युद्धात इस्रायलचं मोठं नुकसान झालं आहे.