दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक झाली. त्यानंतर ते राजीनामा देणार नाही. ते तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचे आपकडून म्हटले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री दोन तास बैठक झाली. या चर्चेत सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जागावर चर्चा झाली. महायुतीमधील जागावाटप अजून निश्चित झाले नाही. यासाठी पुन्हा एक बैठक होणार आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील बॅनर, होर्डिंग्ज हटवण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यालयांना नोटिसा बजावण्यात शहरातील विविध पक्षांचे बॅनर काढत भिंतीवर असलेले पक्षचिन्ह देखील हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
भूतानला पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि भूतान एक समान वारशाचा भाग आहेत. भारत ही भगवान बुद्धांची भूमी आहे, त्यांचे तपश्चर्येचे निवासस्थान आहे. भारत ही भूमी आहे जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. भूतानने भगवान बुद्धांच्या शिकवणी आत्मसात केल्या आणि त्यांचे जतन केले.
यूपीमध्ये सर्व सरकारी मदरसे बंद होतील. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने यूपी मदरसा शिक्षण मंडळ कायदा असंवैधानिक घोषित केला आहे. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने सांगितले की, हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. न्यायालयाने मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकवण्यास सांगितले आहे.
मुंबईच्या एलटीटी कुर्ल्याहून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसला आग लागली. ट्रेनच्या शेवटच्या बोगीमध्ये आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग कशी लागली हे स्पष्ट झालेले नाही. ट्रेन तातडीने थांबवून आग आटोक्यात आणण्यात आली.
नागपूरच्या विकासासाठी आपले मत मांडा आपले विचार पाठवा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या जनतेला केले आहे.
ईडीने अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात हजर करुन दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याचे ईडीने म्हटले आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोपरी गावाजवळ एका महिलेला 60 ग्रॅम एमडी पावडर सह ताब्यात घेण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे राणा दांपत्य मेळघाटमध्ये पाच दिवसांच्या दौऱ्यावर आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी जात आहे.
नवी मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून कैलाश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांची देखील बदली झाली आहे.
चित्रा वाघ या नुकताच सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची असल्याचेही सांगितले जातंय.
आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी उपमहापौर आबा बागुल आक्रमक. मी कोणाच्याही चपला उचलणार नाही, आबा बागुल झाले भावूक, डोळ्यात अश्रू आणि…
अभिजित बांगर यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार सौरभ राव यांनी स्वीकारला. अभिजित बांगर हे मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा भार स्वीकारला आहे. स्मार्ट सिटीमध्ये आणखीन नवीन भर पडण्याचा नव्या आयुक्तांचा संकल्प…
मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार सगळं बापट कुटुंब करणार यात कोणतीही शंका नाही. बापट साहेबांच्या निधनंतर पहिली निवडणूक आहे. त्यांचा आशीर्वाद आहे आम्ही निवडणूक जिंकू मुरलीधर मोहोळ हे खासदार होतील
सोमवारी दुपारी टॅक्सीतून आलेल्या मुंबईतील महिलेनं अटलसेतूवरून उडी मारली होती. मात्र या घटनेनंतर चौथ्या दिवशीही महिलेचा शोध सुरू आहे. यासाठी पोलिसांनी मुंबई, नवी मुंबई तसंच रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना आणि स्थानिक प्रशासनाला याची माहिती घेण्यासाठी कळवलंय.
नवी दिल्ली- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगात आयुक्तांची भेट घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या संदर्भात अजूनही निर्णय झाला नसताना प्रकाश आंबेडकर यांच्या दिल्ली वारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात येत्या 28 एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024’ तसंच 19 मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षांचा समावेश आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली- उदयनराजे भोसले यांची भेट पुन्हा लांबणीवर गेली आहे. उदयनराजे अमित शहा यांना उद्या भेटण्याची शक्यता आहे. कारण आज ही भेट होणार नाही. गेल्या दोन दिवसांपासून उदयनराजे भोसले दिल्लीत आहेत.
सांगली- शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांची जाहीर झालेली उमेदवारी अद्याप अंतिम नसल्याची भूमिका काँग्रेसने मांडली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना वेट अँड वॉचच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीची लोकसभेची जागा वाटप अद्याप अंतिम झाली नाही. लोकसभेच्या अंतिम जागा वाटपानंतर सांगली जिल्ह्यातील काँग्रेस अंतिम निर्णय घेणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आम आदमी पार्टी, काँग्रेसतर्फे निदर्शन करण्यात येणार… पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना आंदोलन करण्यास विरोध… मात्र आम आदमी पार्टी कडून निदर्शने सुरु…
दिल्लीचे सीएम केजरीवालांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार असल्याची माहिती मिळत आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना ईडीकडून गुरुवारी अटक करण्यात आली आहे.
हायवे बांधकाम करणारी अग्रवाल ग्लोबल कंपनीची मुजोरी कायम…अवैध रूपाने ब्लास्टिंग करत असल्याचे शिरपूर गावामध्ये दिसून आले…. ग्रामपंचायतने सांगूनही अद्याप ब्लास्टिंग बंद न केल्यामुळे परिसरातील पेट्रोल पंप आणि हॉटेल यामध्ये मोठी दुर्घटना होण्याची चिन्ह…अग्रवाल कंपनीवर जिल्हा प्रशासन आता कारवाई करणार का या कडे सर्वांचं लक्ष….
आश्रम शाळेत दूध पुरवण्याच्या कामात घोटाळा… दूध कंत्राटासाठी 80 कोटींची दलाली देण्यात आली… अंबेगावामधील एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आलं… रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कार्यकर्त्यांनी पाच लाखांचा धनादेश दिला.लोकसभा निवडणूक खर्चासाठी पाच लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील हे सर्व कार्यकर्ते आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. आम्ही शिवसेना म्हणून केजरीवाल यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोन्याचा भाव एक हजार रुपयांनी वधारला तर चांदीने पण षटकार हाणला. सोने गुरुवारी अचानक हजार रुपयांनी वधारले. अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणामुळे हा बदल दिसून आला. तर व्याजदर कपातीचे संकेत मिळाल्याने दोन्ही धातूंनी टॉपगिअर टाकला.
आमदार राजन साळवी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीला आले आहेत. दोन दिवसापूर्वी राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश साळवी यांची ५ तास कथित मालमत्ता प्रकरणात ACB नी चौकशी केली होती. त्यावेळी राजन साळवी त्यांचा सोबत उपस्थतीत होते.दुर्गेश साळवीं आणि कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता त्यामुळे संजय राऊत यांच्या भेटीला आले आहेत.
मी माझ्या पक्षाच्या विचारधारेशी बांधील आहे आणि ठाम पणे आमचा उमेदवार निवडून आणणार असे शरद पवार गट महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले. रक्षा खडसे ह्या वेगळ्या पक्षात आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रचार केला आहे आणि आमच्या पक्षाचा प्रचार केल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. जनतेच्या आग्रहास्तव निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात पोलीस दलाकडून वेगवेगळ्या कारवाईमध्ये एका महिन्यात 27 गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस अँक्शन मोडवर आहेत. अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी जळगाव पोलीस दलाच्या सीमावर्ती भागातील इतर राज्यातील पोलीस विभागांसोबत बैठका सुरु आहेत.
महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा ; भाजप कार्यालयाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. आम आदमी पक्षाकडून भाजप कार्यालयासमोर निदर्शने होण्याची शक्यता आहे. दंगल नियंत्रण पथकासह राज्य राखीव पोलीस दल आणि मुंबई पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळेच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे. देशात कोणत्याही पक्षावर अशी कारवाई झाली नव्हती. राज्याच्या प्रमुख नेत्यांविरोधात ईडीच्या कारवाया सुरू आहेत, अशा शब्दांत शरद पवार यांनी टीका केली.
मफलरवाला गेला आत.. आता पट्टेवाला पण जाईल.. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. क्रोनोलॉजी समझो भय्या, असंही नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश सोहळा झाला. कांबळे यांनी 2019 ला काँग्रेस कडून लोकसभेची निवडणूक लढवली होती . पराभव झाल्यावर ठाकरे गटात प्रवेश करत रामपूर विधानसभा निवडणूक लढवली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
भाऊसाहेब कांबळे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे लढत होण्याची शक्यता वाढली.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात महाविकस आघाडीचा उमेदवारीचा पेच वाढला. निलेश लंके आपल्या पत्नी राणीताई लंके यांच्या साठी आग्रही. तांत्रिक अडचणीमुळे आमदार निलेश लंके निवडणुकीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात. आमदार निलेश लंके यांनाच उमेदवारी देण्यावर शरद पवार आग्रही. त्यामुळे अहमदनगर दक्षिण मतदार संघात पुन्हा महाविकास आघाडी समोर उमेदवारीचा पेच कायम.
पुण्यातील कुख्यात गुंड नाना गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई. यापूर्वी नाना गायकवाड टोळीवर दोन वेळा पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करत टोळीची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. अलीकडेच औंधमधील एनएसजी आय.टी. पार्क येथे नवीन इमारत नाना गायकवाड याच्या मालकीची आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पूर्णत्वाचे दाखल्यासह भोगवटापत्र मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात पुणे महानगरपालिकेकडे अर्ज करणे आवश्यक होते.
काँग्रेसचे नेते आणि सात टर्म नगरसेवक असलेले आबा बागुल यांचं व्हॉटस अप स्टेटस समोर. ‘पुण्यात निष्ठेची हत्या ‘ म्हणत व्यक्त केली तीव्र नाराजी. पुण्यात काँग्रेस कडून आबा बागुल होते निवडणूक लढवण्यास इच्छुक. पण आमदार असलेले रवींद्र धंगेकर याना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेस मधील धुसफूस बाहेर.
भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट. पुण्यातून लोकसभेसाठी मुळीक होते इच्छुक. मात्र मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुळीक होते नाराज. वडगाव शेरी येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीला ही मुळीक होते गैरहजर. त्याचमुळे नाराज असलेल्या मुळीक यांनी फडणवीस यांची घेतली भेट. मात्र ही भेट सदीच्छा असल्याचं सांगण्यात आले आहे.
आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान दोघांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रचारादरम्यान रोहित पवार आणि युगेंद्र पवारांना दडपशाहीचा सामना करावा लागत असल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप आहे.
रब्बी हंगामाच्या कांदा काढलेला सुरुवात झाली आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यात रब्बी हंगामात सर्वाधिक कांद्याची लागवड केली जात असते, त्यामुळे शेतकऱ्याचा कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होत आहे. मात्र कांद्याला अवघ्या दहा रुपये किलोच्या भाव मिळत आहे.
शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची आज त्यांच्या जळगावातील निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरेशदादा जैन यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.
महायुतीतील जागा वाटपेच्या तिढावर तोडगा काढण्यासाठ मुख्यमंत्री एकनाथ यांच्या वर्षां निवासस्थानी काल रात्री दोन तास बैठक झाली. परंतु या बैठकीत ठोस तोडगा निघाला नाही. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते.