लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीमध्ये अजूनही बैठकांचे सत्र सुरु आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची यादी आज दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. ठाकरे गटाचा मोठा नेते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. सकाळी १० वाजता भाजपात हा प्रवेश सोहळा आहे. त्या नेत्याचे नाव अजून समोर आले नाही. नागपूर, रामटेकसह पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातल्या पाच मतदारसंघातील अंतीम लढतीचं चित्र आज स्पष्ट होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक असलेल्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
काँग्रेसने शिवसेनेच्या (यूबीटी) दबावाखाली येऊ नये, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा समिती जाहीर केली आहे. समितीमध्ये एकूण 27 सदस्यांचा समावेश असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना फेसबुक समितीचे तर पीयूष गोयल यांना सहसंयोजक बनवण्यात आले आहे.
नेदरलँड्सच्या एडे शहरात अनेक लोकांना ओलीस ठेवल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या इमारती रिकामी केल्या आहेत. पोलिस प्रवक्ते सायमन क्लोक यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, एडेमध्ये लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते, परंतु या घटनेबद्दल अधिक तपशील देण्यास किंवा किती लोक सामील होते हे सांगण्यास नकार दिला.
झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) नेते आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, दिल्लीत पोहोचलेल्या, म्हणाल्या की दोन महिन्यांपूर्वी झारखंडमध्ये घडले होते तसे दिल्लीतही घडले आहे. सुनीता केजरीवाल यांना त्यांच्या वेदना सांगण्यासाठी मी त्यांना भेटायला आलो होतो. हा लढा खूप पुढे नोयचा आहे, अशी प्रतिज्ञा आपण एकत्र घेतली आहे. संपूर्ण झारखंड अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी असेल. आज त्यांची (सोनिया गांधी) भेट होणार आहे.
अमरावती : लक्ष्मीच्या हाती कमळ असतेच असे नवनीत राणा म्हणतेय याचा अर्थ नवनीत राणा ह्या संपत्तीचा मुजोर पणा दाखवत आहे. पण जिथे सरस्वती नांदते तिथंच कमळ शोभून दिसत. नवनीत राणामध्ये मुजोरपणा आणि गर्व दिसून येतोय अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
लातूर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातुर जिल्ह्यातुन 09 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांनी लोकसभा निवडणुकीत कसलाही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सराईत गुन्हेगार असलेल्या 09 जणांना जिल्ह्याच्या हद्दी बाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत. या अगोदर सातत्याने गुन्हे करून अशांतता पसरविणाऱ्या एका गुंडाला वर्षासाठी हद्दपार केले आहे.
मुंबई : महाराष्ट्रात NDA चे उमेदवार उभे राहतील तिथे महायुतीचे कार्यकर्ते एकत्र काम करतील. रत्नागिरी – सिधुदुर्ग हा भाजपला मिळावा असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. तर शिवसेनेला देखील त्यांना मिळावा अशी भावना आहे. मात्र, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून निर्णय घेतील. निवडणुका जवळ आल्या की विरोधक अफवा पसरवत असतात त्याकडे लक्ष देणं गरजेचं नाही, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार व्यक्त करणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचं बंड अखेर शमल्याचं दिसत आहे. शिवतारे यांनी आता बारामती मतदारसंघातून माघार घेतली आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय शिवतारेंनी घेतला आहे.
भारतीय जनता पार्टीला ओळखायला रोहित पवार यांना अजून किमान 35 वर्षे लागतील, अशी टीका मंत्री अनिल पाटील यांनी केली. भारतीय जनता पार्टीचा माणूस तर भाजपला उमेदवाराला सोडणारच नाही पण भाजपाला माननारा महायुतीला सोडणार नाही. हा सुद्धा अनुभव रोहित पवार यांना या निवडणुकीत आल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमधून लढणार असल्याची चिन्हे आहेत. नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एवढेच नव्हेतर याबाबत छगन भुजबळ यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला माहिती नसताना नाशिकसाठी दिल्लीतूनच माझ्या नावाचा प्रस्ताव आला आहे, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. तसेच तिकीट मिळालं तर आपण नाशिकमधून लढायला तयार असल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी शिवेंद्राराजे यांना शुभेच्छा दिल्या.
भाजपाच्या व्यासपीठावर स्वर्गीय शंकराव चव्हाण यांचा फोटो ठेवल्याने काँग्रेसकडून खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मताचा जोगवा मागण्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांनी शंकरराव चव्हाण यांचा फोटो वापरू नये, वडील म्हणून घरी पूजा करावी, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी केली.
महायुतीत सगळं काही आलबेल आहे, तीन दिवसांत सगळं काही ठिक होईल, यादी जाहीर होईल असे संजय शिरसाट यांनी सांगितले. पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर , सिंधुदुर्ग या जागांवर चर्चा सुरू आहे, विनिंग कॅंडिडेट द्यायचाय त्यामुळे वेळ लागत असल्याचे ते म्हणाले.
महायुतीत सगळं काही आलबेल आहे, तीन दिवसांत सगळं काही ठिक होईल, यादी जाहीर होईल असं संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रावसाहेब दानवे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी बोलवले आहे. मराठवाड्यातील जागेविषयी चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठाण्यातील राजवंत ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करुन एक कोटीचे दागिने पळविल्या प्रकरणात नोकरालाच पोलिसांनी अटक केली आहे.
सकाळी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर अंबादास दानवे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीत दाखल झाले आहेत.
शिंदे गट लोकसभेच्या 16 जागा लढणार आहे. 16 पेक्षा जास्त जागा लढू पण कमी नाही, असं एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले.
वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील प्रवास सोमवार 1 एप्रिलपासून महागणार आहे. एमएसआरडीसीने पथकरवाढीचा निर्णय घेतला आहे. मोटारींच्या एकेरी प्रवासाच्या पथकरात 15 रुपयांची, मिनी बसच्या करात 30 रुपयांची तर ट्रक आणि बसच्या दरात 35 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
“अर्चना चाकूरकरांनी राजकारणात यावं, हे आम्ही गेल्या पाच-सहा वर्षांपासून सांगत होतो. मोदींच्या विकासकामातून प्रेरणा मिळाल्याने चाकूरकरांनी भाजपाच प्रवेश केला. चाकूरकरांच्या निमित्ताने मराठवाड्यात उत्तम नेतृत्त्व मिळालं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नाशिक- विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमेदवारी निश्चित नसतानाही त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. रंगपंचमीचं औचित्य साधून हनुमानाच्या मंदिरात पूजा विधी करत प्रचाराचं नारळ फोडलंय. रंगांची उधळण करत हेमंत गोडसेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बंड थंड होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या समर्थकांची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर थोड्याच वेळात निर्णय जाहीर करणार आहेत. दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते भूमिका स्पष्ट करणार आहेत.
2014 मध्ये आम्ही शिवसैनिकांनी खासदार रक्षा खडसे यांचं काम केलं घाम गाळला मात्र या खासदारांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं… राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भाजपचा उमेदवार डिक्लेअर झाल्यावर शुभेच्छांचे स्टेटस ठेवतो… एकनाथ खडसेंकडून शरद पवार साहेबांना फसवण्याचा काम रावेर लोकसभेच्या तिकिटावरून झालं… नाव न घेता आमदारांची खडसेंवर टीका
गृहमंत्री कैलास गहलोत यांना ईडीचे समन्स… दारू घोटाळ्यातील ड्राफ्ट गेहलोत यांनी बनवला होता – ईडीचा आरोप… गहलोत यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश…
शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांना फोन… फोन करुन तब्येतीची केली विचारपूस… दिलीप वळसे पाटील यांच्यावर सुरु आहेत उपचार… पाय घसरून दिलीप वळसे पाटील पडले होते…
उमेदवारी निश्चित नसताना नाशकात हेमंत गोडसेंचं शक्ती प्रदर्शन… मुख्यमंत्र्यांना 3 वेळा भेटूनही उमेदवारी निश्चित नाही… नाशिकमधून भुजबळ लोकसभेवर जाण्याच्या चर्चेनं शिंदे गटात नाराजी…
वसंत मोरे अंतरावली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार. वसंत मोरे यांनी काल वंचितते प्रकाश आंबेडकर यांना भेटून चर्चा केली होती. आज ते मनोज जरांगे यांची भेट घेऊन पाठिंबा मागणार आहेत.
अंबादास दानवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच. दानवे आणि भाजपचे विचार वेगळे नाहीत , असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
वांद्रे-वरळी सी-लिंकवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला 1 एप्रिलपासून कात्री लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरात 15 रुपयांची वाढ केल्याने आता कारचालकांना 100 रुपये मोजावे लागणार आहेत, तर वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या मिनी बस किंवा तत्सम वाहनांना आता 160 रुपये पथकर भरावा लागणार आहे, तर ट्रक आणि बसला 210 रुपये पथकर द्यावा लागेल
यापूर्वी या सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या कार आणि जीपकडून 85 रुपये, मिनी बसकडून 130 रुपये, तर ट्रक किंवा बसकडून 175 रुपये पथकर आकारला जात होता.
खासदार उदयनराजे भोसले हे आज बावधनच्या प्रसिद्ध बगाड यात्रेला भेट देणार आहेत. दरवर्षी खासदार उदयनराजे काळभैरवनाथाच्या बगाड यात्रेत दर्शनासाठी हजेरी लावत असतात. काही वेळातच बगाड मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. बगाड यात्रा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.
रोहित पवार यांच्या दौऱ्याला सुरूवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदार संघात रोहित पवार यांचा प्रचार दौरा सुरु झालाय. अनेक मतदारांच्या रोहित पवार आज गाठीभेटी घेणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात उतरलेत. आज दिवसभर रोहित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या बावधनच्या प्रसिद्ध अशा बगाड यात्रेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. यावर्षीचा बगाड्या होण्याचा मान हा शेलारवाडीतील विकास नवले यांना मिळाला आहे. सोनेश्वर मंदिराच्या ठिकाणी बगाड पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.
हिंगोलीत दोन गटात चिकन घेण्याच्या किरकोळ कारणावरून दगडफेक झाली आहे. रात्री दहाच्या सुमारास झाली दगडफेक शहरातील मच्छी मार्केट परिसरात ही घटना घडली आहे. या दगडफेकीचा व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. दोन्ही गटातील परस्परांविरोधात 8 जणांनवर शहर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक. जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार बैठक. जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देणार का याकडे सर्वांचे लक्ष. उमेदवार देताना इतर पक्षासोबत अघाडी करणार का? यावर होऊ शकते चर्चा. आम्ही निवडून नाही आलो तरी पाडू शकतो, या अगोदर बोलले आहेत जरांगे पाटील
भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला अंबादास दानवे यांनी दिला पूर्णविराम. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक. शिवसेना सोडणार नसल्याचा केला खुलासा. कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचा केला खुलासा. tv9 मराठी अंबादास दानवे यांची अधिकृत माहिती.
विजय शिवतारे आज जाहीर करणार निर्णय. विजय शिवतारे यांनी आज बोलावली महत्वाची बैठक. बारामती लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात शिवतारे आज करणार भूमिका स्पष्ट. कार्यकर्त्यांशी संवाद साधत विजय शिवतारे घेणार निर्णय. सासवड येथील निवासस्थानी विजय शिवतारे घेणार पत्रकार परिषद.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला. बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा. शेतातील काढून ठेवलेलं पीक पावसामुळे खराब होण्याची नामुष्की. एकीकडे दुष्काळ परस्थितीची सामना सुरु असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला. काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा, आंबा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
नोयडा उत्तर प्रदेश येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या राजगड तालुक्यातील पैलवान वल्लभ शिंदे यानी ब्राँझ पदक पटकवत चमकदार केलीय. अंतिम सामन्यात मातब्बर खेळाडूवर मात करत 92 किलो फ्री स्टाईल प्रकारात त्यानी हे ब्राँझ पदक पटकवलंय. ब्राँझ पदक मिळवून राजगड तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजवले.
परभणी लोकसभेसाठी महायुतीमध्ये जाणकारांच्या उमेदवारीवरून कुजबुज सुरू आहे. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी परभणी जाणकारांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. परंतु अजित दादांच्या राष्ट्रवादी मात्र जाणकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, असे विधान राष्ट्रवादीचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुरानी यांनी केलाय.
जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांबाबतचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भूमिका निश्चित करण्यासाठी आज जळगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा पार पडणार आहे. जळगाव शहरातील लाड वंजारी मंगल कार्यालयात मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार बाबतची नेमकी भूमिका काय जाहीर होणार आहे.
नागपूर, रामटेकसह पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातल्या पाच मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या भागातील अंतीम लढतीचं चित्र आज स्पष्ट होणार आहे. आज तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. मतांचं विभाजन टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.
महाराष्ट्रातील अनेक जागांवर भाजप आणि शिंदे गट हे आपापले दावे करत आहेत. भाजपचं पार्लमेंटरी बोर्ड हे जागा निश्चित करणार असून 95 टक्के जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. जागा वाटपाचा तिढा येत्या 2 दिवसात सूटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.