गँगस्टर ते नेता असा प्रवास करणारा उत्तर प्रदेशातील बाहुबली मुख्तार अंसारीचा मृत्यू झाला आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने त्याच निधन झालं. उल्टी आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्याला गुरुवारी रात्री 8.25 च्या सुमारास मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं. 9 डॉक्टर्सची टीम त्याच्यावर उपचार करत होती. पण त्याचा मृत्यू झाला. मुख्तारच्या मृत्यूनंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. दरम्यान रोहित पवार यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. पुण्याच्या भोरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्या दरम्यान ते बोलत होते. चिन्ह आणि पक्ष जाऊन कमळाबाईच्या चिन्हावर लढण्याची परिस्थिती अजित पवार गटावर येणार अशी टीका रोहित पवार यांनी केली.
काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले की, आम्ही भाजपच्या सर्व उल्लंघनांचे विश्लेषण केले आहे तेच पॅरामीटर्स वापरून त्यांनी आमच्या उल्लंघनांचे विश्लेषण केले. भाजपवर 4600 कोटींचा दंड आहे. ही रक्कम भरण्याची मागणी आयकर विभागाने केली पाहिजे.
5 एप्रिलला काँग्रेस आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. त्यानंतर 6 एप्रिल रोजी उत्तर आणि दक्षिण भारतात दोन मोठ्या रॅलीच्या माध्यमातून जाहीरनाम्याची प्रसिद्धी आणि वितरणही करण्यात येणार आहे. जयपूरमध्ये उत्तर भारताचा मेळावा होणार आहे. हैदराबादमध्ये दक्षिण भारताचा मेळावा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. आठवले हे शिर्डी जागेबाबत बोलण्यासाठी आले होते. बैठकीनंतर रामदास आठवले म्हणाले की, शिर्डीची जागा शिंदे कोट्यात गेली आहे. आम्ही देवेंद्रजींना सांगितले की आम्ही तुमच्या भरवशावर आलो आहोत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ रामलीला मैदानावर विरोधी भारत आघाडीच्या रॅलीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. याशिवाय तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही या रॅलीत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत.
निलेश लंके यांच्या बैठकीत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय होणार आहे. बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार त्यानंतर पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे निलेश लंके आज राजीनामा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. तर नगर दक्षिण मध्ये सुजय विखे विरुद्ध लंके अशी लढत होणार.
शाहू महाराजांचा सन्मान करायचा असता तर त्यांची राज्यसभेवरच बिनविरोध निवड केली असती अशी टीका महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केली आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कार्यकाळात काय केले याचा हिशोब द्यावा अशी मागणी रामटेकचे उमेदवार राम सातपुते यांनी केली आहे. हिंदूंना दहशतवाद म्हणणारे हेच नेते आता संत महतांचे दर्शन घेत आहेत अशीही टीका त्यांनी केली आहे.
गेल्यावेळी आम्ही मदत केली, मात्र पाच वर्षात आमचे फोन देखील उचललेले नाहीत अशा शब्दात भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
पक्षासाठी सर्व काम करेन असं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं. साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांची मत मी इथे येऊन जाणून घेतली. साताऱ्यातील उमेदवाराबाबत एक ते दोन दिवसात निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले.
मविआची जागा वाटपाचची चर्चा पूर्ण झाली. यशवंतराव चव्हाणांनंतर साताऱ्याच्या जनतेच राष्ट्रवादीवर प्रेम. लोकसभा निवडणूक लढवण्यास श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव नकार दिला. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा.
“आमच्याकडे मुंबईत 5 जागा आहेत. आम्ही उत्तर मुंबईच्या उमेदवाराचं नाव लवकरच जाहीर करू. आम्ही ठाण्यासाठी राजन विचारे आणि कल्याण, उत्तर मुंबई, पालघर, जळगावसारख्या इतर जागांसाठी लवकरच उमेदवारांची नावं जाहीर करू”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
आयकर विभागाने काँग्रेसला 1700 कोटी रुपयांची डिमांड नोटीस बजावली आहे. ही नवीन डिमांड नोटीस 2017-18 ते 2020-21 या वर्षांच्या मूल्यांकनासाठी आहे. त्यात दंड आणि व्याज यांचा समाविष्ट आहे.
“प्रकाश आंबेडकरांना आम्ही वारंवार आवाहन केलंय आणि त्यांच्यासोबत चर्चादेखील केली आहे. आम्हाला खात्री आहे की संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या बाजूने ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उभे राहणार नाहीत. ते आंबेडकर आहेत. आमची लढाई संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या विरोधात आहे. त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर उभे राहणार नाहीत,” असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
दिल्लीच्या मंत्री आणि आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी म्हणाल्या, “काल राऊस एव्हेन्यू कोर्टात अरविंद केजरीवाल यांच्या रिमांडच्या सुनावणीदरम्यान ईडीचे वकील एएसजी एसव्ही राजू यांनी अप्रत्यक्षपणे एजन्सीचा खरा हेतू न्यायालयासमोर आणि जगासमोर मांडला. अरविंद केजरीवाल यांना आणखी काही दिवसांची कोठडी सुनावण्याची मागणी त्यांनी केली. कारण केजरीवाल त्यांच्या फोनचा पासवर्ड देत नाहीयेत, असं कारण त्यांनी सांगितलं. ही तीच ईडी आहे, ज्यांनी याआधी सांगितलं होतं की अरविंद केजरीवाल यांनी मद्य धोरण तयार करताना आणि त्याची अंमलबजावणी करताना वापरलेला फोन सापडत नाहीये. खरंतर ईडीला नव्हे तर भाजपला पासवर्ड हवा आहे.”
आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी विभक्त पतीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अभिनेत्री राखी सावंतला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. यापूर्वीही राखी सावंतने अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली होती. मात्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने तिने याचिका मागे घेतली होती. आता पुन्हा तिने याचिका दाखल केली होती.
जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे शेतकऱ्यांचा ग्रामस्थांनी मंत्री आमदार यांच्यासह सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. आगामी सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय.
गावाच्या मुख्य चौकात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी सह मतदानावर बहिष्कार टाकण्याबाबत गावकऱ्यांनी लावला फलक. वारंवार पिक विमा मिळणार असल्याच्या घोषणा करून खासदार आमदार मंत्री राजकारण करत असल्याच्या आरोप.
मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांच्या नाराजीचा लोकसभा उमेदवारांना फटका बसणार…
महायुतीच्या गटातटाबाबच काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत यावं , आजही आम्हाला असंच वाटतं. बैठकीला वंचितचे लोक आले होते, आपण सर्वांनी पाहिलं आहे.
धैर्यशील माने यांच्या उमेदवारी वर भाजप कार्यकर्त्यांची उघड नाराजी. यापुढे काँग्रेसचे गुणगान चालणार नाही दिला स्पष्ट इशारा.
भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवलं आहे. धैर्यशील माने यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं कौतुक केल्याच्या व्हिडिओचा दाखला देत इशारा दिला.
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात नाराजी नाट्य. मातोश्रीवर आज खैरे दानवे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
अंबादास दानवे कालपासून मुंबईत तर चंद्रकांत खैरे आज सकाळी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्यासोबत खैरे – दानवेंची होणार बैठक. बैठकीत अंबादास दानवे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
आमदार निलेश लंकेंची आज पत्रकार परिषद होत आहे. निलेश लंके आज राष्ट्रवादीचा राजीनामा देणार का ? दक्षिण नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध लंके लढत होईल का ? शरद पवार गटाकडून लंकेंना उमेदवारी फिक्स आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
कांदा नगरी लासलगाव येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसमोर संकट उभे केले. 10 ते 15 मिनिटे रिपरिप पावसाची हजेरी होती. अचानक आलेल्या पावसाने बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. तर काढणीला आलेल्या शेती पिकांना फटका बसण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेणार आहेत. वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी कडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांची आज दुपारी भेट होईल. काल पिंपरीत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली होती.
पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासाठी महायुतीची पुण्यात आज बैठक होत आहे. बैठकीला महायुतीचे सर्व आमदार,नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुणे आणि बारामतीत प्रचाराचे आणि सभांचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आज संध्याकाळी 5 वाजता गुप्ते मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात उमेदवार बाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. भावना गवळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब मात्र अजूनही उमेदवारी जाहीर न झाल्याने संभ्रम होत आहे. कालच्या यादीत नाव नसल्याने चर्चाना उधाण, दुसऱ्या यादीवर कार्यकर्त्याची भिस्त आहे.
धाराशिव लोकसभेत 400 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास काय करावे यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी जिल्हा स्तरीय विशेष अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. समितीत 15 सदस्य अधिकारी असून यात महसूल वा जिल्हा परिषदमध्ये कार्यरत वा सेवा निवृत्त अधिकारी यांचा समावेश आहे. मराठा समाजाने प्रत्येक गावातुन उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
सोने गेल्या दोन दिवसांपासून चमकत आहे. तर नरमाईचे धोरण सोडून चांदी पण वधारली आहे. चांदीत सलग दोन दिवस घसरण सुरु होती. सोन्यातील दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला झळ बसली. सोने जवळपास 600 रुपयांनी महागले आहे.
पुणे शहर पोलीस दलाच्या हद्दीतील कोलवडी परिसरामध्ये पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेने कारवाई करत अवैध दारू भट्ट्या उध्वस्त केल्या… यावेळी हजार लिटर कच्चे रसायन, दारू बनवण्यासाठी लागणारे कच्चामाल जप्त करत नष्ट केली… या प्रकरणी एका महिलेला आरोपीवर गुन्हा दाखल करत संबंधित आरोपीला लोणिकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले… अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत
भाजपाचा उमेदवार बदलण्याची मागणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्यासह शिवसैनिकांनी निर्धार मेळाव्यातुन केली होती… शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभुमीवर आता रणजितसिंह नाईक निंबाळकर आज माढा दौऱ्यावर शिवाजीराव सावंत यांच्यासह शिवसैनिकांची भेट घेणार…
मुंबईमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागणार सुरेश दादा पाटील… प्रकाश आवाडे आमदार यांची पुत्र राहुल आवाडे शिवसेनेतून करणार तिकीटाची मागणी.. आमदार प्रकाश आवाडे भाजपाची साथ सोडणार का? आज मुंबईत उद्धव ठाकरेंची आमदार पिता पुत्र घेणार भेट
सटाण्यात देव मामलेदारांचे दर्शन घेत डॉ. सुभाष भामरेंनी केला प्रचाराचा श्रीगणेशा… डॉक्टर सुभाष भामरे यांचे सटाण्यात जंगी स्वागत… हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित..
शहरातील पब, बिअर बार आस्थापनांना रात्री दीड वाजेपर्यंतची वेळ यापूर्वीच ठरवून दिली आहे. परंतु आता रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि आइस्क्रीम पार्लर यांनाही रात्री दीडपर्यंत परवानगी राहील. रस्त्यालगतच्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सना रात्री साडेअकरानंतर बंद ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्त यांनी दिले आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमधून सुरेशदादा पाटील महाविकास आघाडी कडून तिकीटची मागणी करणार. सुरेशदादा पाटील हे मराठा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मुंबईमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागणारा सुरेश दादा पाटील.
गँगस्टर ते नेता असा प्रवास करणारा उत्तर प्रदेशातील बाहुबली मुख्तार अंसारीचा मृत्यू झाला आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने त्याच निधन झालं. तो तुरुंगात बंद होता. मुख्तारच्या मृत्यूनंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब आज प्रहार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता. दिनेश बुब हे प्रहार पक्षाकडून अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती. दुपारी 1 वाजता आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत दिनेश बुब यांचा प्रहार प्रवेश होण्याची शक्यता. खासदार नवनीत राणांच्या विरोधात आमदार बच्चू कडूंची नवी खेळी. दिनेश बुब यांनी महाविकास आघाडी कडे मागितली होती ठाकरे गटातून उमेदवारी.