मुंबई, दि. 12 फेब्रुवारी 2024 | बिहार विधानसभेमध्ये आज बहुमत चाचणी होणार आहे. बहुमताचा जादूई आकडा 122 आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे त्यांच्याकडे 128 आमदारांच बहुमत असल्याचा दावा करत आहेत. नितीश कुमार यांनी राजकीय भूमिका बदलल्याने RJD विरोधी पक्षात तर भाजपा सत्तेमध्ये आला आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी दोघेही आपल्याकडे बहुमताची मॅजिक फिगर असल्याचा दावा करत आहेत. दरम्यान पाकिस्तानात कोणाच सरकार येणार? हे अजून स्पष्ट नाहीय. नवाज शरीफ यांनी त्यांच्या पक्षाचा विजय झाल्याचा दावा केला होता. पण तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्याकडे बहुमत असल्याचा दावा केला.
महाराष्ट्रावर संकट आल्यावर पंतप्रधान कधी आलेले दिसलेत का?,मराठवाड्यात किती आत्महत्या झाल्या त्याबद्दल कधी पंतप्रधान बोलले का? गद्दारांना भाव आहे पण इमानाने शेती करणाऱ्या अन्नदात्याला तुम्ही भाव देत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
आज अशोकराव एवढ्या लवकर जातील असे मला वाटले नव्हते. पण गेल्यावर कपाळावर शिक्का काय लागणार तर गद्दार. आयुष्यभर कमवले आणि एका रात्रीत गमावले. संपूर्ण महाराष्ट्र दिल्लीशाहची हुकूमशाही सुरु आहे त्याविरोधात लढत आहेत. हिंदूसोबतच मुस्लिम आणि ख्रिश्चन सुध्दा माझ्या सभेला येतं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये अशोक चव्हाण हे देखील गेले. त्यांना आता काय श्रद्धांजली वाहायची की काय करायचे. मात्र कोणी काहीही केले तरी 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेत जनता धडा शिकवेल. आज देशात एकच नेता लढतोय तो म्हणजे उद्धव ठाकरे, असं संजय राऊत संभाजीनगरमध्ये म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी उप जिल्हाधिकारी, उप विभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार भेटण्यासाठी आलेले आहेत. परंतु जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली असल्याने ते झोपून आहेत. 5 ते 10 मिनिटांनी पुन्हा हे पथक जरांगे यांची भेट घेणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोनवरून दिली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना माहिती दिली. काँग्रेस पक्षाची मुंबई उद्या दुपारी 2 वाजत बैठक होणार आहे.
छत्तीसगडवरून नाना पटोले हे दिल्लीला आले होते. मात्र काँग्रेस अध्यक्षांसोबत दूरध्वनी चर्चा झाल्यानंतर त्यांना मुंबईतील बैठकीत उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली त्यामुळे ते मुंबईला रवाना झाल्याची माहिती समजत आहेत.
नवी दिल्ली | काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या देखील दाखल झाल्या आहेत. तसेच केसी वेणू गोपाल, सलमान खुर्शीद यांच्यासह वरिष्ठ नेते खरगे यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. या बैठकीत आज घडलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीबाबतही चर्चा होणार असल्याचं समजतंय. तसेच राज्यसभा निवडणुकीच्या नावाबाबत चर्चा होणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
मुंबई | अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथामिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढील 2 दिवसात मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली. चव्हाण यांच्या या निर्णयानंतर राजकीय विश्वात खळबळ उडाली. चव्हाण यांच्या निर्णयावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला हा त्यांनी चांगला निर्णय घेतला.मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.अशोक चव्हाण यांनी महायुतीमध्ये यावे. तसेच महायुती मधील माझ्या रिपब्लिकन पक्षात त्यांनी प्रवेश करावा असे मी त्यांना आवाहन करतो.”, असं आठवले म्हणाले. आठवले यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
नवी दिल्ली : आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी येत्या शुक्रवारी किंवा पुढच्या सोमवारी होईल अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. आज दोन मिनिटांसाठी हे प्रकरण ऐकण्यात आले. त्यावेळी हरीश साळवे आणि महेश जेठमलनी यांनी शिंदे यांच्यावतीने युक्तिवाद केला. हे प्रकरण उच्च न्यायालयात ऐकलं गेलं पाहिजे असे त्यांनी सांगितले. कॉमन ऑर्डर आहे त्यामुळे सुनावणी एकाच ठिकाणी होऊ शकते. एकनाथ शिंदेंनी reply दाखल केलेला नाही, त्यांना नोटीस जारी केली गेली होती असेही त्यांनी सांगितले.
हिंगोली : पुढील आठ दिवसात एवढा मोठा स्फोट होईल की काँग्रेस संपुष्टात येईल. काँग्रेस राहणारच नाही असे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर म्हणाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची शिवसेना आणि भाजपमध्ये येण्याची वाटचाल सुरू आहे. पुढील दोन दिवसांमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे. लातूरचे मोठे दिग्गज नेते अमरावतीचे मोठे दिग्गज नेते, चंद्रपूरचे दिग्गज नेते असे अनेक काँग्रेसचे नेते शिवसेना भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
मुंबई : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेस पक्षाने आमदारांची 14 तारखेला बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या सूचना सगळ्या आमदारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 14 कॉंग्रेससोबत किती आमदार आहेत हे स्पष्ट होणार आहे.
चंद्रपूर : काँग्रसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माझ्या संदर्भातील काही अफवा पसरवण्यात आल्या. मी काँगेसमध्येच राहणार असून कुठंही जाणार नसल्याचे मत काँग्रस आमदार आणि जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.
उल्हासनगर-भाजप आमदार गोळीबार प्रकरणात विक्की गणोत्रा यांच्या पोलीस कोठडीत वाढ. पाच दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी. उल्हासनगर न्यायालयात केले होते हजर.
अशोक चव्हाण यांच्या सोबत काँग्रेसचे 10 ते 11 आमदार संपर्कात आहे. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदारही संपर्कात. तिवसा मतदारसंघात देखील चमत्कार घडणार.आमदार रवी राणा यांचा मोठा दावा.
अशोक चव्हाण साहेब काय बोलतील हे पहावे लागेल पाहावं लागेल. चव्हाण घराणं हे काँग्रेसचे मोठं घराणं आहे, असा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे यांनाच तिकीट मिळणार नाही आधी त्यांना त्यांच तिकीट कन्फर्म होऊ द्या मग त्यांच्या पक्षात कोण येणार आहे हे सांगा म्हणावं. रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य
संभाजीनगर : 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतायत पण मग गरिबी हटली कोणाची. मोदींना आवाहन आहे की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवा. निवडणुकी आधी तसे जाहीर करा आणि मग निवडणुकीला सामोरे जावा. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य
संभाजीनगर : मी साद घालतो की, माझ्यासोबत या. मी फक्त शिवसेनेसाठी लढत नाही तर जनतेसाठी करतोय. या लढाईत तुम्ही मला साथ द्या. एकदा सत्ता येऊ द्या मग बघून घेऊ एकेकाला. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य
संभाजीनगर : गंगापूरमधील खासदार आणि आमदार शिवसेनेचा येणार आहे. पण नुसतं भाषणं ठोकून चालणार नाही तर लोकांमध्ये जावे लागेल. मोदी सरकारच्या किती योजनाचा लाभ झाला ते लोकांना विचारा. लोकांना देखील विचारा की मी मुख्यमंत्री असताना दिलेली कर्जमाफी तुम्हाला मिळाली की नाही. – उद्धव ठाकरे
संभाजीनगर : मोदींनी जे वचन नव्हे तर जी थाप मारली होती. अजित पवारांवर घोटाळ्याचा आरोप झाला आणि ते दहा दिवसात तिकडे गेले. भ्रष्टाचाऱ्यांना भाजपात घेतायंत आणि मंत्रिपद देतायत हीच ती मोदी गॅरंटी आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
संभाजीनगर : सरकारी यंत्रणा हाताशी धरून आपल्यावर अन्याय करत आहेत. आपली शिवसेना ही दरोडेखोरांच्या हातात दिली. 2012 साली बाळासाहेब गेले आणि नंतर हे मंत्री झाले.
अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र त्यांनी राजीनामा दिला नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्यांनी राहूल नार्वेकर यांच्याकडून राजीनाम्याची प्रक्रीया समजून घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अशोक चव्हाण यांनी राहूल नार्वेकरांची भेट घेतली. त्यानंतर ते नॉट रिचेबल होते. अशोक चव्हाण यांनी राहूल नार्वेकरांकडून राजीनाम्याची प्रक्रिया समजून घेतली अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्याच्या राजकारणात मोठा पक्ष प्रवेश होणार आहे. देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांच्यासह अनेक पदाधिकारी पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत.
मुंबईच्या भाजप कार्यालयात हालचालींना वेग आला आहे. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. भाजपचे मोठे नेते भाजप प्रदेश कार्यालयात जमताना दिसत आहेत.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरदार असताना त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यांचा फोनही नॉट रिचेबल येत आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चेनंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राहूल नार्वेकरांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी 19 फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर येणार होते, मात्र काही कारणास्तव त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दोघांनाही अतिदक्षता विभागातून जनरल वार्डमध्ये हलवण्यात आलं आहे. दोघांनाही लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.
निर्यात बंदीमुळे विदेशात कांद्याचे भाव १ हजारावरून १० हजारांवर गेले आहेत. भारतातून तीन देशात तस्करी होत असल्याचा संशय आहे. द्राक्ष, बटाटा, केळी, डाळिंब, टोमॅटो आणि सुरणच्या खोक्यांमधून ही तस्करी होत आहे. चेन्नई, मुंबई, बिहारमधून रोज बांग्लादेश, दुबई आणि श्रीलंकेत कांद्याची तस्करी होत आहे. दररोज १० ते १२ कंटेनरमधून ३०० टन कांद्याची तस्करी होत आहे. तस्कऱ्यांकडून महिन्याला अंदाजे ५० कोटींची निव्वळ कमाई होत आहे. कंटेनरमध्ये कृषीमाल भरल्यानंतर तो सील केला जातो. त्यामुळे ही चलाखी कोणालाही कळत नाही.
नाशिकच्या मालेगाव, लासलगाव, चांदवड या भागातून कांदा कोल्ड स्टोरेजमध्ये आणि नंतर बंदरावर पॅकिंग करू पाठविला जातो. कांदा निर्यात बंदीनंतर देशात दरात मोठी घसरण झाली आहे. या तस्करीवरून शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनीही नाराजी व्यक्त करत कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली आहे.
राज्यभरात मराठा समाजाच्या सर्वेचं वर्गीकरण पूर्ण झालं असून राज्य मागासवर्ग आयोगाची आज किंवा उद्या बैठक होणार आहे. सर्वेक्षणाचा अहवाल या बैठकीत मंजूर करण्याची शक्यता आहे. अहवाल मंजूर झाल्यानंतर लगेच तो सरकारकडे पाठवला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे.
पुणे- १ जानेवारी २०१८ कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी प्रकाश आंबेडकर हे आज चौकशी आयोगासमोर साक्ष देणार आहेत. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज आज पुण्यात चालणार आहे. प्रकाश आंबेडकर, हर्षाली पोतदार आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांची आयोग उलटतपासणी घेणार आहे. कोरेगाव भीमा येथे २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत पुराव्यांच्या नोंदीसाठी ही आयोगाची शेवटची सुनावणी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही स्थगिती दिली जाणार नाही असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आमदार गणपत गायकवाड फायरिंग प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला विकी गणोत्राला आज पुन्हा उल्हासनगर चोपडा कोर्टात हजर करणार आहेत. 7 फेब्रुवारी रोजी विकी गणोत्राला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली होती. अटकेनंतर उल्हासनगर न्यायालयात त्याला हजर केलं असता 12 तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.
मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीसाठी हजर राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश… लोकसभा होईपर्यंत शिक्षकांना निवडणुकीचे काम करण्याचे आदेश… मनपा शाळेसोबत खाजगी शाळांच्या शिक्षकांनाही जिल्हाधिकारी आणि पालिकेचे पत्र… ऐन परीक्षा तोंडावर असताना पुढील तीन महिने शिक्षक निवडणुकीच्या कामात
मला बसता येईना, मला उठता येईना असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यांचा आजचा उपोषणाचा तिसरा दिवस… जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे…
सकल धनगर समाजाच्या वतीन आज बुलढाणा शहर बंद… धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी मागणी, तर आरक्षणासाठी 15 दिवसांपासून सुरू आहे उपोषण… उपोषणाला पाठिंबा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा
माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा… महेश गायकवाड यांना अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलवलं. महेश गायकवाड सध्या धोक्यातून बाहेर असल्याची माहिती मिळत आहे….
विदर्भातील 6 जिल्ह्यांना आजही यलो अलर्ट.. नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशी देखील गापपिटीचा फटरका…
भिवंडी व कल्याण लोकसभेमध्ये आजी आणि माजी मुख्यमंत्रीच्या दौरा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
तर राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार प्रथमच पक्ष बांधणी व कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी कल्याणच्या दौऱ्यावर येणार आहेत.
दोन्ही गटातील परस्पर विरोधी पक्ष नेते येत असल्याने शिंदे व पवार दोन्ही गटाकडून भिवंडी व कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. चौकाचौकात झेंडे लावत व आपल्या नेत्यांचे स्वागताचे बॅनर लावत दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन सुरू आहे.
राज्यातील शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लागण्याची शक्यता आहे. मराठा सर्वेक्षणातून उसंत मिळण्याच्या आधीच शिक्षकांना आता लोकसभा निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आलं आहे. मात्र निवडणुकीचं काम लावल्याने शिक्षकवर्गात प्रचंड नाराजी आहे. मुंबईतील शइक्षकांनी इलेक्शन ड्युटीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
सकल धनगर समाजाच्या वतीन आज बुलढाणा शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात येत असून आरक्षणासाठी 15 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
देशात भीतीचं वातावरण आहे. हिंदू आणि इतर धर्मीयांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. लोकांच्या घरात चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आज दुपारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार . सुनील प्रभू यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
पुण्यातील शासकीय कार्यालयांकडे पाणीपट्टी थकली. जवळपास १२५ कोटींची पाणी पट्टी थकीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयाचा यात समावेश आहे. सर्वाधिक पाणी पट्टी ही कंटोनमेंट बोर्डाची आहे. महापालिका आता पाणीपट्टी भरली नाही तर महिन्याला एक टक्का दंड आकारणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण संदर्भात हे चौथे उपोषण आहे. जरांगे पाटील यांनी या उपोषण दरम्यान अन्न, पाणी आणि औषध उपचार घेण्यास नकार दिला आहे. जरांगे पाटील यांच्या ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांच्या सग्या सोयऱ्याना त्या नोंदी आधारे आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सरकारने या संदर्भात अध्यादेश काढला आहे. आणि त्या आध्यादेशाची अंमलबजावणी करावी जरांगे, अशी मागणी मागणी जरांगेंनी केलीय.
गावातील माथे फिरूकडून वृद्धाचा डोक्यात दांडके मारून हत्या… कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कुडित्रे गावातील ही घटना आहे. हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय. या हल्यात जंभा साठे यांचा मृत्यू झाला. तर रतन भास्कर अस माथेफिरू हल्लेखोरांचं नाव आहे. मृत जंबा साठे गावातील चौकात मित्रा सोबत बोलत बसले असताना अचानक हल्ला झाला. हत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. करवीर पोलिसांनी पळून गेलेल्या हल्लेखोर रतन भास्करला ताब्यात घेतलं.
सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची मुदत आहे. या पूर्वी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. पदवी आणि पदव्युत्तर अब्यासक्रमसाठी ही परीक्षा घेण्यात येते. विधी, एमबीए , बीपीएड, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी घेतली जाते. आज त्याची मुदत संपणार आहे.
पुण्यातील हडपसर भागात सातववाडीमधील भन्नाट बिर्याणी हाऊस दुकानात सिलेंडरचा स्फोट झाला आहे. स्फोटात दुकान जळून झालं खाक झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर राजन साळवींच्या कुटुंबियांचा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज. राजन साळवी यांच्या कुटुंबाचे मुख्य वकिल हजर नसल्याने सुनावणी ढकलण्यात आली होती पुढे.
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून लवकरच नाव जाहीर होणार. आज उद्या ही नाव जाहीर होवू शकतात. भाजपकडून इतर राज्यातील राज्यसभा उमेदवारांची नाव काल केली जाहीर. 14 उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली. मात्र माजी खासदारांपैकी एकालाही पक्षाने तिकीट दिलं नाही. महाराष्ट्रातही भाजप तेच पॅटर्न वापरणार की नारायण राणे यांना पुन्हा संधी मिळणार?. 15 राज्यात 56 जागांसाठी निवडणूक होत आहे. अर्ज भरण्याची शेवटची मुदत ही 15 आहे
बिहार विधानसभेत बहुमताचा जादुई आकडा 122 आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA आघाडी आपल्याकडे 128 आमदार असल्याचा दावा करत आहे. यात भाजपाचे 78, जेडीयूचे 45, हमचे 4 आणि एक अपक्ष आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीकडे 115 आमदार आहेत. यात बहुमतासाठी 7 जाग कमी पडतायत.
जुन्नरचे माजी आमदार शरद पवार यांचे निकटवर्तीय वल्लभ बेनके यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले. बेनके यांनी 20 वर्ष जून्नर विधानसभेचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. 1985 ते 1995 आणि 2004 ते 2014 असे चार टर्म आमदार होते. आज सायंकाळी ४ वाजता हिवरे बुद्रूक या त्यांच्या जन्मगावी होणार अंत्यसंस्कार.