मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा आहे. आज विधानसभेत राज्यातील अवकाळी पावसाच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यासह राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनातील सर्व महत्वाच्या घडामोडी वाचा क्लिक करा…
मुंबई :
हक्कभंग प्रस्तावावर उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांना मुदतवाढ
संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे विनंती केल्यानंतर त्यांच्या विनंती दखल
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संजय राऊत यांना भूमिका मांडण्यासाठी मुदतवाढ दिली
मुंबई :
‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ चा अहवाल आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला.
या पाहणीच्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत सात टक्के वाढ अपेक्षित आहे. सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक म्हणजे 14 टक्के इतका आहे.
विधानसभेबाहेर विरोधी पक्षाकडून निदर्शनं
मुंबई: विपक्षी दलों के नेताओं ने महाराष्ट्र विधानसभा के बाहर राज्य सरकार के खिलाफ विरोध-प्रदर्शन किया। pic.twitter.com/cmG1RKvPOW
— ANI_HindiNews (@AHindinews) March 8, 2023
शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत… अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे…
जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा… कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…
बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे… मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा…
अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा तिसरा आठवडा आहे
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात माहिती,
दुपारनंतर पुन्हा अडपेट माहिती घेऊन निवेदन केले जाणार,
राज्यातील आठ जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाल्याची माहिती.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून विधानभवनातील प्रत्येक महिला कर्मचाऱ्यांना महिला दिवसानिमित्त शुभेच्छा पत्र , गुलाबाचे फूल आणि चॉकलेट दिलं जात आहे
महिलांचं मनोबल वाढवण्याचे काम सध्या विधान भवनात होत असल्याचं पाहायला मिळतंय
विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतात
मुख्यमंत्र्यांकडून पाच मंत्र्यांची नावं विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुचवली जाणार
विधानपरिषदेच्या उपसभापतींकडून एका नावावर होणार शिक्कामोर्तब
विधानपरिषदेत खातं आणि जबाबदारी पाहून संधी मिळणार असणार असल्याची माहिती
लवकरच नावं पाठवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती…
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची विरोधकांची मागणी
विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार
सत्ताधारी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्याची शक्यता