मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session day 4 live updates) चौथा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर दिलं आहे. आज, विधिमंडळात दोन्ही सभागृहांमध्ये 2020-21 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाईल. अशासकीय कामकाज देखील सुरु राहणार आहे.
शर्जील उस्मानीवर आम्ही गुन्हा दाखल केला आहे – पोलीस तपास करीत आहेत. लोकांच्या भावना भडकविण्याचे काम कोणीही करू नये. कुणालाही पाठशी घातलं जाणार नाही. एक तथाकथित पत्रकाराने व्हाट्सएपच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे . त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एक सदस्य मंत्रालयाबाहेर आंदोलन करीत होते जिथे आंदोलक कमी होते, अजित पवारांचा राम कदम आणि अर्णव गोस्वामींना टोला
इतक्या गंभीर आजाराने देशाला वेढलं होतं. पॅरामेडिकल स्टाफ सहित सर्वच कोरोना योद्ध्यांचं आभार मानतो. राज्य सरकारने ज्या पद्धतींत काम केलं त्यामुळे 1 वर्षपूर्वी जशी भीती वाटायची तशी आता सर्वांना वाटत नाही. केंद्राने निधी दिला की नाही यावर मला वाद घालायचा नाही. नेत्यांनी लस घेतल्यामुळे आता लोक लस घेतायेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
सुधीर मुनगुंटीवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हक्कभंग
– हक्कभंगाचा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्याचे अध्यक्षांचे निर्देश
– अजित पवार यांनी वैधानिक विकास मंडळ लवकरात लवकर देण्यात येईल असं १५ डिसेंबर २०२० रोजी आश्वासन दिले होते
– सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे हा सभागृहाचा अवमान आहे
विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आक्रमक
विधासभा अध्यक्ष निवडीवरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विधानसभा नियमाबाहेर जाऊन काम करत असेल तर लक्षात आणून देणं काम आहे. सुधीर मुनगंटीवारांनी राज्य सरकारला इतिहास घडवायचाय का? 50 वर्षे राज्य करा पण संविधान मोडू नका. विधानसभा अध्यक्ष निवडीमध्ये 30 दिवसांचा गॅप ठेवू नका, अन्यथा राष्ट्रपती राजवट लागल्यावर रडू नका, असा थेट इशारा मुनगंटीवारांनी राज्य सरकारला दिला.
सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा विषय काढला, इतक्या दिवस अध्यक्षाची निवडणूक का होत नाही, मुनगंटीवारांचा सभागृहात सवाल, 30 दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले, अजून अध्यक्षांची निवडच नाही
कोविड सेंटरमधील महिलांवरील अत्याचारांवरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देत आहेत. अजित पवार यांनी संबंधित प्रकरणी बलात्काराची घटना घडली नाही, विनयभंगाची घटना घडलीय. डॉक्टरवर कठोर कारवाई केली जाईल. 31 मार्चपूर्वी कार्यपद्धती जाहीर केली जाईल, असं अजित पवार म्हणाले.
कोरोना काळातील भ्रष्टाचाराविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन
#महत्वाच्या_बातम्या #Tv9MarathiLive https://t.co/mBIFnBFZHE
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2021
आज दोन्ही सभागृहांमध्ये 2020-21 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाईल. अशासकीय कामकाज देखील सुरु राहणार आहे.
विधिमंडळात पुरवणी मागण्यांवर चर्चा, विरोधक आक्रम होण्याची शक्यता
ठरलं ! विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर, 8 मार्चला अर्थसंकल्प सादर होणारhttps://t.co/5YtuSKEOmU#anilparab | #Maharashtra | #Maharashtra | #uddhavthackeray | #ajitpawar | #balasahebthorat | @NCP | @INCMaharashtra | @ShivSena | @advanilparab
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2021