मुंबई : अवकाशात घडणाऱ्या खगोलीय घटनांचं कायमच माणसाला कुतूहल राहिलंय. परवा राज्यात अचानकपणे आकाशातून पडलेल्या गोळ्यांची सध्या चर्चा सुरु आहे. आकाशातून पडलेले गोळे म्हणजे उल्कापात की सॅटेलाईटचे तुकडे? याबाबत संभ्रम आहे. आजपर्यंत केवळ हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिलेली ही दृश्यं, शनिवारी राज्यातल्या नागरिकांनी याची देही याची डोळा अनुभवली. खान्देशातल्या धुळे, जळगावपासून विदर्भात अमरावती, चंद्रपूरपर्यंत (Chandrapur) महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमध्ये आकाशातून आगीचे गोळे पडत होते. पहिल्यांदाच अशा प्रकारची दृश्यं पाहणाऱ्या लोकांनी मोबाईल कॅमेऱ्यात ही दृश्यं रेकॉर्ड केली. ही दृश्यं पाहून काहींना आश्चर्याचा धक्का बसला तर काही ठिकाणी भीतीचं वातावरण होतं. रात्रीची वेळ अचानकपणे आकाशात दिसलेले आगीचे गोळे आणि जोरदार आवाजामुळे लोकांची धावपळही झाली आकाशातून पडणारे आगीचे गोळे म्हणजे काहींना उल्का पडतायत असं वाटलं तर काहींना UFO अर्थात अनआयडेन्टीफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स आहेत अशीही शंका आली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात लोखंडी रिंग पडली. धातुचा गोळा देखील चंद्रपूर जिल्ह्यातील गावात आढळला. हे सर्व चीनच्या रॉकेटचा भाग (China Rocket Debris) असल्याचं नासाच्या अंदाजानुसार समोर येत आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये देखील काही भागात रॉकेटचं डेब्रीस पडलंय.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात ज्या ठिकाणी हे आगीचे गोळे पडले त्या ठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली.बैलगाडीच्या चाकाच्या आकाराएवढ्या लोखंडी पट्ट्या लोकांना सापडल्या. त काहींना धातूची गोलाकार वस्तूही सापडली. लोखंडी गोलाकार वस्तू चीनच्या रॉकेटचं डेब्रीस असल्याचं समोर आलं आहे. इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पृथ्वीच्या कक्षेत चार उपग्रहाचं डेब्रीस परत येणार होतं.
चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्री अवकाशात प्रवाही लाल गोळे दिसल्याने हा प्रकार काय, असा प्रश्न सर्वांना पडला होता. अनेकांनी त्यांच्या भागातील व्हीडीओ सोशल मीडिया शेयर केले आहेत. आता नासा मधील विज्ञान अभ्यासक लीना बोकील यांनी काल जे अवकाशातून पडलं ते चायनीज रॉकेट किंवा सॅटॅलाइट चा एखादा भाग असू शकतो असा दावा केला आहे.
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये पडलेले आगीचे गोळे हे चीनच्या रॉकेटचे अवशेष असल्याचंही काही तज्ज्ञांनी म्हटलंय. फेब्रुवारी 2021 मध्ये चीननं ”चँग झेंग 3 बी” या नावाचं रॉकेट प्रक्षेपित केलं होतं आणि चीनच्या याच रॉकेटचे अवशेष महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पडल्याचा अंदाज आहे. चीनच्या रॉकेटचे डेब्रीस भारतातील मध्यवर्ती राज्यांमध्ये पडलं. या घटनेत जीवितहानी झालेली नसली तर केंद्र सरकरानं या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचं बोललं जातंय.
उल्का म्हणजे अवकाशातील खडक होय. हा खडक जेव्हा पृथ्वीच्या दिशेने अतिशय वेगाने प्रवास करत असतो त्यावेळी घर्षणाने खडक प्रकाशमान होतो. पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर गुरुत्वाकर्षणाने हा खडक खेचला जातो आणि त्यानंतर अतिशय वेगाने या खडकाचा प्रवास भूपृष्ठाकडे सुरु होतो.काही उल्का या आकाशातच नष्ट होतात.अशाच एका उल्कापातामुळे महाराष्ट्रातल्या बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवराची निर्मिती झालीय. सुमार 52 हजार वर्षांपूर्वी 2 दशलक्ष टन वजनाची उल्का जमिनीवर आदळली आणि त्यातूनच लोणार सरोवराची निर्मिती झालीय.
Meteor Shower or Satellite ? चंद्रपुरातील पवनपारमध्ये सापडला साडेपाच किलोचा गोळा; प्रशासन करणार तपास
Chandrapur- सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरीमध्ये पडली उल्कासदृश्य वस्तू, नागरिकांमध्ये संभ्रम