मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ.अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉ.अजित देसाई हे ह्रदयरोग तज्ञ असून डॉ. शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर असल्याचे एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी सांगितले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 12, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या त्रस्त आहेत. उद्धव ठाकरे यांना दिवाळीपासून हा त्रास जाणवत होता. उद्धव ठाकरे यांच्यावर आज गिरगावातील एच. एन. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आलीय. उद्दव ठाकरे यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती.
कोरोना लसींच्या बाबतीत आपण 10 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो, असंही त्यांनी सांगितलं होतं.
इतर बातम्या:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?; डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबीयांशी बोलून घेणार निर्णय
Chandrakant Patil | उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल