मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे राज्यात कोरोना लस, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 58 हजार 993 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 301 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दिवसभरात 45 हजार 391 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. (58,993 corona positive, 301 corona-related deaths in Maharashtra today)
नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 32 लाख 88 हजार 540 वर पोहोचली आहे. त्यातील 26 लाख 95 ङजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 57 हजार 329 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 5 लाख 34 हजार 603 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र में पिछले 24 घंटों में #COVID19 के 58,993 नए मामले सामने आए हैं। 45,391 लोग डिस्चार्ज हुए और 301 लोगों की मृत्यु दर्ज़ की गई।
कुल मामले: 32,88,540
कुल डिस्चार्ज: 26,95,148
कुल मृत्यु: 57,329
सक्रिय मामले: 5,34,603 pic.twitter.com/w7mhBICzdr
— ANI_HindiNews (@AHindinews) April 9, 2021
मुंबईत आज दिवसभरात 9 हजार 200 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 5 हजार 99 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मृतांपैकी 28 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 19 पुरुष तर 16 महिलांचा समावेश आहे.
मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 34 दिवसांवर येऊन ठेपलाय. 2 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर 2 टक्क्यांवर पोहोचला आहे.
#CoronavirusUpdates
९ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/HAXEpjOiMA— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 9, 2021
पुण्यात आज दिवसभरात 5 हजार 647 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 4 हजार 587 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात पुण्यात 51 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 7 रुग्ण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 49 हजार 955 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 1 हजार 3 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
नव्या आकडेवारीसह पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 18 हजार 29 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 62 हजार 420 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 654 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
पुणे कोरोना अपडेट : शुक्रवार ९ एप्रिल, २०२१
◆ उपचार सुरु : ४९,९५५
◆ नवे रुग्ण : ५,६४७ (३,१८,०२९)
◆ डिस्चार्ज : ४,५८७ (२,६२,४२०)
◆ चाचण्या : २७,९८६ (१६,७१,४३७)
◆ मृत्यू : ४४ (५,६५४)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/OT3S6R25ty— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 9, 2021
नागपुरात आज दिवसभरात 6 हजार 489 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 2 हजार 175 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. नागपुरात सध्या 49 हजार 347 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागपुरातील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 66 हजार 224 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 11 हजार 236 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नागपुरात आतापर्यंत 5 हजार 641 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
संबंधित बातम्या :
प्रत्येक रुग्ण हसतखेळत घरी गेला पाहिजे, रुग्णसेवेत तडजोड नकोच; जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याची तंबी
58,993 corona positive, 301 corona-related deaths in Maharashtra today