मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत (Maharashtra Corona Updates) पुन्हा प्रचंड वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. आरोग्य विभाग सर्तक झालं आहे. आगामी काळात कोरोनाचं संकट पुन्हा नव्याने उभं राहण्याची भीती आहे. कारण कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 926 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 4 हजार 487 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधित आहे. इथे दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबई आणि पुण्यात तर कोरोना संक्रमण वाढण्याची भीती आहे. तसेच कोरोनामुळे आता इथे मृत्यू देखील होऊ लागले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या ही संपूर्ण देशात वाढताना दिसत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयदेखील सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. संबंधित सूचनांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशात गेल्या 24 तासात 6 हजरा 50 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच देशात सध्या कोरोनाचे 28 हजार 303 सक्रिय रुग्ण आहेत.
विशेष म्हणजे भारतात 203 दिवसांनंतर एका दिवसाला 6050 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याआधी गेल्यावर्षी 16 सप्टेंबरला 6 हजार 298 रुग्ण एकाच दिवशी आढळले होते. देशात आतापर्यंत 4 कोटी 47 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झालीय. कोरोनामुळे काल महाराष्ट्रात तीन, कर्नाटकात आणि राजस्थानात दोन आणि दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि पंजाब यांच्या राज्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
देशात सध्याच्या घडीला रुग्ण बरे होण्याचा दर हा 98.75 टक्के इतका आहे. तर कोरोना संक्रमाणाचा सध्याचा देशाताली दर हा 3.39 टक्के असल्याचं मानलं जात आहे. तर साप्ताहिक दर हा 3.02 टक्के इतका मानला जातोय. देशात आतापर्यंत 4 कोटी 41 लाख नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशातील कोरोना मृत्यूर हा 1.19 टक्के इतका आहे.
देशात नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एक्सबीबी.1.16 हा व्हेरिएंट आढळत असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचे आतापर्यंत जे नवे रुग्ण आढळले आहेत त्यांपैकी 38.2 टक्के रुग्णांमध्ये हा नवा विषाणू आढळला आहे. संबंधित विषाणू हा ओमायक्रोन स्वरुपाचा मानला जातोय.