मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अन्य शहरातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मात्र, भाजपसह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीही लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचं म्हटलंय.(In Maharashtra, 31 thousand 643 new corona patients were registered on Monday)
राज्यात गेल्या 24 तासांत 31 हजार 643 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 हजार 854 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 102 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दरम्यान, कालपेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. मात्र रविवार असल्यामुळे कोरोना चाचण्याही कमी झाल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Maharashtra reports 31,643 new #COVID19 cases, 20,854 recoveries and 102 deaths in the last 24 hours.
Total cases 27,45,518
Total recoveries 23,53,307
Death toll 54,283Active cases 3,36,584 pic.twitter.com/aDdcl0jn2W
— ANI (@ANI) March 29, 2021
आजच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 74 लाख 5 हजार 518 झाली आहे. त्यातील 2 कोटी 35 लाख 3 हजार 307 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 36 हजार 584 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण 54 हजार 283 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत आज दिवसभरात 5 हजार 888 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 561 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 8 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांपैकी 7 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णाचा दर 85 टक्क्यांवर आलाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 53 दिवसांवर आला आहे.
#CoronavirusUpdates
२९ मार्च, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/gUl5wJIJij— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 29, 2021
पुण्यात आज दिवसभरात 2 हजार 547 नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 771 जणांचा डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यात दिवसभरात 32 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यातील 8 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. पुण्यात सध्या 32 हजार 875 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 674 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे.
आजच्या आकडेवारीसह पुण्यातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या 2 लाख 61 हजार 659 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 23 हजार 541 जण पुर्णपणे बरे झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत 5 हजार 243 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे कोरोना अपडेट : सोमवार २९ मार्च, २०२१
◆ उपचार सुरु : ३२,८७५
◆ नवे रुग्ण : २,५४७ (२,६१,६५९)
◆ डिस्चार्ज : २,७७१ (२,२३,५४१)
◆ चाचण्या : १५,१५३ (१४,४९,१५१)
◆ मृत्यू : २४ (५,२४३ )#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/erepvbKeWl— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 29, 2021
नागपुरात आज 3 हजार 177 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलीय. तर 2 हजार 600 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 55 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 997 वर पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 78 हजार 713 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर नागपुरात आतापर्यंत 4 हजार 986 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Maharashtra: Nagpur reports 3177 new #COVID19 cases, 2600 recoveries and 55 deaths in the last 24 hours.
Total cases 2,21,997
Total recoveries 1,78,713
Death toll 4986Active cases 38,298
— ANI (@ANI) March 29, 2021
नाशिकमधील कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात आज 2 हजार 847 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 2 हजार 610 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नाशिकमध्ये आज दिवसभरात 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या कोरोना रुग्णांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रात 1 हजार 658, नाशिक ग्रामीणमधील 981, मालेगाव महापालिका क्षेत्रात 175 तर नाशिक जिल्ह्याबाहेरील 33 नवे रुग्ण आढळले आहेत.
संबंधित बातम्या :
Maharashtra lockdown update : अखेर मुख्यमंत्र्यांचा आदेश, लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे निर्देश
In Maharashtra, 31 thousand 643 new corona patients were registered on Monday