मुंबई : राज्यात सोमवारपेक्षा मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 47 हजार 288 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 26 हजार 252 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.36 टक्के झालं आहे. राज्यात आज मृत्यूच्या संख्येतही काही दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात 155 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सोमवारी हिच संख्या 222 वर होती. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.83 टक्के एवढा आहे. (In Maharashtra, 47,288 new corona patients, 155 died due to corona on Tuesday)
राज्यात सध्या 24 लाख 16 हजार 981 व्यक्ती होम क्वारंटाईन आहे. तर 20 हजार 115 वक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 4 लाख 51 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महराष्ट्र में #COVID19 के 47,288 नए मामले सामने आए हैं। 26,252 लोग डिस्चार्ज हुए और 155 लोगों की मृत्यु दर्ज़ की गई।
कुल मामले: 30,57,885
कुल डिस्चार्ज: 25,49,075
कुल मृत्यु: 56,033
सक्रिय मामले: 4,51,375 pic.twitter.com/3V2dLwZ1uv
— ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2021
मुंबईत आजही कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. गेल्या 24 तासांत मुंबई 9 हजार 857 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 357 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 13 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 11 पुरुष तर 10 महिलांचा समावेश आहे.
मुंबईत आज रोजी 74 हजार 522 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 40 दिवसांवर येऊन ठेपलाय. मुंबईत 29 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत एकूण कोविड वाढीचा दर 1.70 टक्के झाला आहे.
#CoronavirusUpdates
५ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/Nw4eo5chbk— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 5, 2021
पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 77 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 3 हजार 240 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 10 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. पुण्यात सध्या 42 हजार 741 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नव्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 लाख 94 हजार 121 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 45 हजार 892 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 488 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिवसभरात नवे ४ हजार ०७७ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ०७७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ९४ हजार १२१ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 5, 2021
पिंपरी चिंचवडमध्ये आज दिवसभरात 2 हजार 152 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 1 हजार 815 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात पिंपरी-चिंचवडमध्ये 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 53 हजार 80 वर पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 28 हजार 450 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 79 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
संबंधित बातम्या :
In Maharashtra, 47,288 new corona patients, 155 died due to corona on Tuesday