मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्येही रुग्णसंख्येच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत. असं असतानाही कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे.(Large increase in the number of corona patients in the state)
राज्यात बुधवारी दिवसभरात 28 हजार 699 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 13 हजार 165 जण कोरोनामुक्त झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपेक्षा आज मृतांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. बुधवारी दिवसभरात 132 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 30 हजार 641 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 25 लाख 33 हजार 26 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 22 लाख 47 हजार 495 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 53 हजार 589 जणांचा मृत्यू झाला आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
28,699 new cases have been reported in the state today
The state tally of #Covid_19 positive patients is now 25,33,026
District-wise details of cases and deaths until today are as follows:
(3/4)? pic.twitter.com/EaLOmPRJd1
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) March 23, 2021
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्येत आज पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मुंबईत आज दिवसभरात 3 हजार 512 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 203 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 6 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता खालावला आहे. 100 दिवसांच्या पुढे असणारा हा कालावधी आता 90 दिवसांवर आला आहे.
#CoronavirusUpdates
23-Mar, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/rzxiWfhj0L— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 23, 2021
पुण्यात आज दिवसभरात 3 हजार 98 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 698 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आज मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात आज दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 9 मृत हे पुण्याबाहेरील असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुण्यात सध्या 24 हजार 440 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 555 जण गंभीर आहेत.
पुणे कोरोना अपडेट : मंगळवार, २३ मार्च, २०२१
◆ उपचार सुरु : २४,४४०
◆ नवे रुग्ण : ३,०९८ (२,४०,८३४)
◆ डिस्चार्ज : १,६९८ (२,११,३०४)
◆ चाचण्या : ११,३१० (१३,४९,९९९)
◆ मृत्यू : २२ (५,०९०)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/c3BHQrwgUA— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 23, 2021
नागपुरात आज 3 हजार 95 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज दिवसभरात 2 हजार 136 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरातही आज मृत्यूचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे. नागपुरात दिवसभरात 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपुरातील एकूण रुग्णसंख्या 1 लाख 99 हजार 771 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1 लाख 63 हजार 81 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नागपुरात आतापर्यंत 4 हजार 697 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात 2 हजार 644 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. नाशिक महापालिका हद्दीत आज 1 हजार 480, नाशिक ग्रामीणमध्ये 827, मालेगाव महापालिका हद्दीत 259 तर जिल्ह्याबाहेरील 78 रुग्ण आढळून आले आहेत.
नांदेडमध्ये गेल्या 24 तासांत 1 हजार 330 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये आतापर्यंत 34 हजार 337 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील 26 हजार 293 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात सध्या 7 हजार 144 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 59 रुग्ण गंभीर आहेत.
संबंधित बातम्या :
नवी मुंबईत अधिक प्रभावीपणे ‘मिशन ब्रेक द चेन’, मॉलमध्ये प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
Large increase in the number of corona patients in the state