मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण 40 हजारांपेक्षा जास्त संख्येने आढळून येत आहेत. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज 6 ते 7 हजार रुग्ण आढळत आहेत. ही स्थिती राज्याची चिंता वाढवणारी आहे. राज्य सरकार काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याबाबत विचार सुरू असल्याचं कळतंय. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. महाराष्ट्राला देखील केंद्रानं सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील 11 जिल्हे असे आहेत या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. संक्रमणाचा दर जास्त आणि कोरोना रुग्ण अधिक आढळत असल्यानं त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी सहा ते सात हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यातील एखादी चूक देखील मोठ्या संकटाला कारणीभूत ठरू शकते. राज्यात येत्या काळात एका दिवसात दहा हजार रुग्ण देखील आढळू शकतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन लावलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
District wise #Corona active cases in Maharashtra. As on August 1, 2021.#MaharashtraFightsCorona#WarAgainstVirus#IAmResponsible#BreakTheChain pic.twitter.com/BXcx95BcHc pic.twitter.com/j0BUq1Ugyr
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) August 1, 2021
महाराष्ट्रात रविवारी 6479 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 157 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. रविवारी 4110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना मुक्त होण्याचा दर 96.59 वर पोहोचला आहे.
पुणे (15680), सातारा (8153), सांगली, (7546) कोल्हापूर (5970), अहमदनगर (6610), सोलापूर (4936), रायगड (2830), रत्नागिरी (2249), सिंधुदुर्ग(1986), बीड (1831), पालघर (1115) सक्रिय रुग्ण आहेत.
इतर बातम्या:
Tokyo Olympics 2021: भारताचं पदक हुकलं, डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये कमलप्रीत पराभूत
Maharashtra Corona Update state government may be declare strict lockdown in 11 district as per center guidelines