Manohar Joshi Health Update | मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबद्दल हिंदुजा रुग्णालयाकडून महत्त्वाची अपडेट जारी

| Updated on: Jun 05, 2023 | 8:41 PM

मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबद्दल पी. डी. हिंदुजा रुग्णालयाकडून हेल्थ अपडेट जारी करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मीडिया स्टेटमेंट जारी करत मनोहर जोशी यांच्या प्रकृती विषयी माहिती देण्यात आली आहे.

Manohar Joshi Health Update | मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबद्दल हिंदुजा रुग्णालयाकडून महत्त्वाची अपडेट जारी
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मनोहर जोशी यांच्यावर सध्या मुंबईतील पी. डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल उपचार सुरु आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून आज मनोहज जोशी यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट जारी करण्यात आली आहे. मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच त्यांना आता आयसीयूतून बाहेर शिफ्ट करण्यात आलं आहे आणि त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.

मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय विश्वासाचे आणि जवळचे सहकारी मानले जायचे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक संविधानिक पदे भूषविली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. मनोहर जोशी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना 22 मे रोजी मुंबईतील पी. डी. हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. या दरम्यान आज रुग्णालय प्रशासनाकडून मनोहर जोशी यांच्या प्रकृत्तीबद्दल मीडिया स्टेटमेंट जारी करत त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

मनोहर जोशी यांना आयसीयूतून बाहेर शिफ्ट करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असून रुग्णालयातील डॉक्टरांची टीम सातत्याने त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात हिंदुजा रुग्णालयात जावून मनोहर जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.