मुंबई : कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला मोठे यश आले आहे. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची छाती अभिमानाने फुलून आली आहे. गडचिरोली पोलिस आणि सी 60 जवानांचं त्यांनी मनापासून अभिनंदन करत विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच, असा निर्धार यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करेल.
कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाच्या जवानांनी शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गडचिरोली पोलिस आणि सी 60 जवानांचं मनापासून अभिनंदन. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं देखील हे मोठं यश आहे, असं पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी ६० पथकाच्या जवानांनी शनिवारी १३ नोव्हेंबर रोजी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गडचिरोली पोलिस आणि सी ६० जवानांचं मनापासून अभिनंदन. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं देखील हे मोठं यश आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 13, 2021
पोलिस आणि नक्षली चकमकीत कारवाईत चार पोलिसही जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. शासन त्यांच्या उपचारामध्ये कुठलीही कमतरता ठेवणार नाही. नक्षलवाद्यांविरोधातली कारवाई यापुढेही अशाच पद्धतीने सुरू ठेवली जाईल, असा निश्चय यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
गडचिरोलीचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेल. शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाचं धोरण आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं, असं पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे.
विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेल. शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाचं धोरण आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं, असं पालकमंत्री या नात्याने आवाहन करतो.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 13, 2021
या मोहिमेत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या वृत्ताला पोलीस विभागामार्फत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र तेलतुंबडे याच्या मृत्यूमुळे नक्षली चळवळ खिळखिळी झाली असून पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
मिलिंद तेलतुबंडे हा लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा छोटा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा मुळचा वणी येथील असून मागील कित्येत वर्षांपासून तो नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय आहे. तेलतुंबडे याने भाकप माओवादी या पक्षाचा महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम केलेले आहे.
दरम्यान, मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात उडालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. यात पोलिसांचे तीन जवान गंभीर जखमी झाले. जखमी पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी अजूनही पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
हे ही वाचा :