मुंबई: स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नोकर भरतीबाबतची मोठी घोषणा केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणाच दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. (Maharashtra government going to recruit 15 thousand vacant post, say dattatray bharane)
‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. तसेच गट अ ची 4 हजरा 417 पदे, गट ब ची 8 हजार 31 पदे आणि गट कची 3 हजार 63 पदे अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असं भरणे यांनी सांगितलं.
उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची 4 रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील, असं त्यांनी सांगितलं.
संघ लोकसेवा आयोगाकडून (युपीएससी) दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. (Maharashtra government going to recruit 15 thousand vacant post, say dattatray bharane)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 14 July 2021 https://t.co/L6TKxdAtI4 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 14, 2021
संबंधित बातम्या:
सामाजिक न्याय विभागातील 3025 रिक्त पदे भरणार; धनंजय मुंडे यांचे निर्देश
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंचे फेरबदल, माजी नगरसेवकाला हटवून नवे नेतृत्व
अर्धा जुलै संपला, तरीही पीक कर्ज वाटप रखडलं, बँकांनी हात आखडला!
(Maharashtra government going to recruit 15 thousand vacant post, say dattatray bharane)