मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) आणि त्यांचे नगरसेवक पुत्र निल सोमय्या यांच्यावर बॉम्ब टाकले आहेत. पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत. सोमय्यांचा मुलगा तर या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल.. आदित्य ठाकरेंना (aaditya thackeray) माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा दावा ही संजय राऊत यांनी केला आहे.
ईडी वाले सुनो. सीबीआयवाले सुनो.सगळ्यांनी ऐका जरा माझं. हा जो किरीट सोमय्या आहे, हा एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केलाय. लोकांचे पैसे बुडवलेत. तर मी विचारतो की, निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची.. नील सोमय्याची. आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
मौजे गोखिवरे वसईत यानं तिथं एक प्रोजेक्ट केलाय. वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं. आणि त्याला लुबाडलं. आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले. कॅशही घेतली. 100 कोटी घेतले. लधानीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या. 400 कोटी रुपयांची जमीन फक्त 4.4 कोटी रुपयांनी केली. अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या. या कंपनीचा डायरेक्ट आहे नील किरीट सोमय्या. निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभारले जात आहेत. पर्यावरणाच्या परवानग्या नाही, हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल. आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्याला अटक करा, असं आवाहन राऊत यांनी केलं.
मुळात पीएमसी घोटाळ्यातील आरोपीनं सोमय्याच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली? आणि हा भ्रष्टाचाराविरोधात लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय, आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा. देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन आहे.. त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पीएमसीचा तपास ईडी करतेय. हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीत पाठवलेत. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता. सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो. ईडी भ्रष्ट आहे. हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत, हा माझा दावा आहे, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
Sanjay Raut: महाराष्ट्र हा गांXची औलाद नाही, तुमच्या नामर्दानगीला घाबरणार नाही; राऊत गर्जले
Sanjay Raut: तो मुलूंडचा दलाल, भडवा, नाव न घेता संजय राऊतांनी सोमय्यांची अक्षरश: पिसं काढली