मुंबई : राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आलेत. भारतीय पोलीस सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदांसह पोलीस उपमहानिरीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदांवर बदल्या करण्यात आल्यात. बदली किंवा पदोन्नती असं या बदल्याचं स्वरुप आहे. अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदांसाठी 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. पोलीस उपमहानिरीक्षक पदांसाठी 16 आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदांवर 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात.
दरम्यान, याआधी जुलै 2021 मध्ये राज्यातील 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या होत्या. प्रशासकीय कामाचा भाग म्हणून नियमित बदल्यांच्या प्रक्रियेला राज्य सरकारने निश्चित कालमर्यादा दिलीय. त्यामुळे या कालावधीत वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आल्याचं सांगण्यात आलं होतं. या प्रक्रियेनुसार कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली.
1. संजय दैने, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका.
2. अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर.
3. मलीकनेर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी.
4. सुरेश जाधव यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर.
5. प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी.
6. कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर.
7. जी एम बोडके सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर.
8. एस जी देशमुख, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर.
9. एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर.
10. राहुल कर्डिले, यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.
11. जी एस पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर.
12. रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर.
13. एन आर गटणे, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर.
14. दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर.
Maharashtra government transfer many IPS officer Know full list