Police Recruitment : राज्यात 7231 पदांची भरती लवकरच, नंतर आणखी पदे भरणार: दिलीप वळसे पाटील

| Updated on: Mar 14, 2022 | 5:37 PM

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरु आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी विधानसभेत कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात उत्तर दिलं.

Police Recruitment : राज्यात 7231 पदांची भरती लवकरच, नंतर आणखी पदे भरणार: दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरु आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी विधानसभेत कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात उत्तर दिलं. दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील पोलीस विभागाच्या पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) पदाच्या भरतीसंर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 5297 पदांची पोलीस भरती अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात पोलीस भरतीची ती प्रक्रिया पूर्ण होईल. उमेदवारांना नेमणूक आदेश देण्यासंदर्भातील कार्यवाही सुरु आहे. तर, काही ठिकाणी मुलाखत घेण्याचं काम सुरु आहे. तर, येत्या काही दिवसात 2019 ची पोलीस भरती प्रक्रिया दिवसात पूर्ण करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. तर, 7231 पदांची भरती येत्या काही दिवसात सुरु करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

7231 पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करणार

महाराष्ट्र पोलीस दलातील 7231 कॉन्स्टेबल पदांची भरती येत्या काळात सुरु करण्यात येईल. पोलीस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या पदाची भरती करताना कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ दिले जाणार नाहीत. ही भरती पारदर्शक पद्धतीनं केली जाईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

आगामी काळात आणखी पोलीस भरती करणार

राज्याच्या पोलीस दलातील 7231 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं आणखी पदांची भरती करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

5200 पदांची भरती अंतिम टप्प्यात

राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांतर्गत 5200 पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती सुरु आहे. विविध जिल्ह्यातील पोलीस भरती अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळं येत्या काही काळात 5200 पदांवर युवकांना पोलीस कॉन्स्टेबल पदावर संधी मिळणार आहे.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी संधी

महाराष्ट्र पोलीस दलात भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी 7231 पदांची भरती करण्यात असल्याचं सांगितलं आहे. ही भरती होताना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. यामुळं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.

इतर बातम्या:

VIDEO: असं व्हयं.. अन् पुढे अक्षय कुमार सोलापुरच्या पोरीसोबत मराठीत बोलत राहिला, परीक्षार्थिंनो तुम्हीही ऐका सल्ला

VIDEO | तुम्ही दाऊदची माणसे वक्फ बोर्डात नेमली, फडणवीसांच्या पुराव्याने ठाकरे सरकार धास्तावले