मुंबई : आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यासह देशभरातील जनता सज्ज झाली आहे. राज्यात थर्टीफर्स्टच्या पार्ट्या रंगणार असल्याने राज्यातील पोलीस आणि वाहतूक पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. अपघातात जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंत याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
नवी मुंबईमध्ये चार किलो 520 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त
कोपरखैरणे येथे करण्यात आली कारवाई
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे पोलिसांची मोठी कारवाई
रोख रक्कमेसह 5 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त
दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
घणसोली येथील को ऑप हाऊसिंग सोसायटी येथील प्रकार
ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई
नागपूरमधील सीताबर्डी परिसरात पोलिसांची नाकाबंदी व वाहनांची तपासणी
नागपुरात अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात
इयर एंडचे सेलिब्रेशन रात्री 12 वाजेपर्यंत
नागपुरात 33 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली
ड्रिंक अँड ड्राईव्ह तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक
नागपूर शहरातील 18 हॉटस्पॉटवर बारीक नजर
पार्टीमध्ये साध्या वेशातील महिला पोलीस राहणार हजर
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव्हवर मोठी गर्दी
शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय
वाहतूक व्यवस्थेतदेखील बदल केलेले आहेत
सर्व पर्यटकांची आणि मुंबईकरांची सुरक्षा पोलीस पार पाडतील
महिला सुरक्षेवर अधिक भर देण्यात आलेला आहे
सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांची माहिती
नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाली
ड्रंक अँड ड्राईव्ह याकडे पोलिसांची करडी नजर असणार
नवी मुंबईत प्रत्येक ठिकाणी पोलिसांची चेकिंग होणार
वाहतूक पोलीस अधिकारी तिरुपती काकडे यांची माहिती
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी फुटाळा तलावावर नागपूरकर व पर्यटकांची मोठी गर्दी
यावर्षीच्या शेवटच्या सूर्यास्ताला बघण्याची फुटाळा तलावाच्या किनारी पर्यटकांची गर्दी
यावर्षी कोरोनाचे निर्बंध नसल्याने नागपुरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
रायगडच्या पर्यटन स्थळी नववर्षासाठी पर्यटकांची गर्दी
नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी रायगड जिल्ह्यात खूप पर्यटन स्थळे आहेत
त्या निमित्ताने समुद्रकिनारी मोठी गर्दी जमली आहे
या समुद्रकिनारी पोलिसाची देखील करडी नजर असणार आहे
बाजार मूल्य एक कोटींचे ड्रग्स पकडले
एका बंगल्यातून 16 नायेजेरियन ताब्यात
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई
नवी मुंबई परिसरात विक्रीसाठी आणेलेले ड्रग्स पोलिसांनी केले जप्त
थर्टी फर्स्टच्या आयोजित कार्यक्रमात ड्रग्सचा वापर होणार असल्याचे समोर
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नागपुरात राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट
नागपूर मध्यप्रदेश सीमेवर उभारले चार तपासणी कॅम्प
नागपूर जिल्ह्यात आठ पथक तैनात ठिक-ठिकाणी घालणार गस्त
तपासणीदरम्यान संशयित आढळल्यास कारवाई केली जाणार
8 निरीक्षण 16 दुययम निरीक्षण आणि 24 जवान यांची नजर राहणार
जखमी विद्यार्थीनी वगळता अन्य विद्यार्थीनींसाठी शिवशाही बस केली उपलब्ध
विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे घेतायत सातत्याने अपडेट
संबंधित विद्यार्थीनींच्या उपचारात कोणतीही कमतरता भासू न देण्याच्या अजितदादा व सुप्रियाताईंच्या सूचना
सकाळपासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी शासकीय महिला रुग्णालयात
बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी दाखल,
मंत्री अतुल सावे, चंद्रशेखर बावन्नकुळे यांचीही उपस्थिती,
महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात,
दिवंगत विनायक मेटे यांच्याही प्रतिमेला अभिवादन,
ज्योती मेटे, रामहरी मेटे यांनी केले आहे कार्यक्रमाचे आयोजन.
पुणे : करणी सेनेकडून स्पष्टीकरण,
दोन दिवसांपूर्वी अजय सेगर यांनी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाबाबत केले होते वादग्रस्त विधान,
करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष देविचांदसिह बार वाल यांचं स्पष्टीकरण,
आज औरंगाबाद येथे करणी सेना अजय सेगर यांच्याविरोधात करणार तक्रार दाखल,
दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा करणी सेनेंचा कोणताही संबंध नाही.
काष्टी उपसरपंच निवडीचे पडसाद, आता सरपंच साजन पाचपुते यांच्या भूमिकेकडे लक्ष
माजी मंत्री आणि आमदार बबनराव पाचपुते यांचा सुपूत्र प्रतापसिंह यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत झाला होता पराभव
तर पुतण्या सरपंच साजन पाचपुते यांनी उपसरपंच निवडीतही आमदार काकांना धोबीपछाड देत उपसरपंचपद काबीज केले
बहुमत असतानाही उपसरपंचपदाची निवडणूक हरल्याने 10 सदस्यांनी सरपंचाकडे दिले राजीनामे
नागपूर : इयर एंड चे सेलिब्रेशन रात्री 12 वाजेपर्यंत.नागपुरात 33 ठिकानी राहणार नाकाबंदी,
ड्रिंक अँड ड्राईव्ह तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक,
नागपूर शहरातील 18 हॉटस्पॉटवर बारीक नजर,
पार्टी मध्ये साध्या वेशातील महिला पोलीस राहणार हजर.
नाशिक : भाविकांना नवीन वर्षात दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी निर्णय,
आज रात्रभर मंदिर दर्शनासाठी असणार खुले,
नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षा निमित्त देशभरातून लाखो भाविक येणार दर्शनाला.
दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांची करडी नजर असणार
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी असणार
दारु पिऊन गाडी चालवाल तर कारवाई होणार
ब्रेथ अनालायझर द्वारा प्रत्येक वाहन चालकांची पोलिसांकडून तपासणी होणार
कोरोना विषाणूचा धोका पाहता पुणे पोलिसांकडून युज अँड थ्रो पाईपचावापर होणार
ब्रेथ अनालायझर मार्फत तपासणी दरम्यान प्रत्येक वेळी नव्या पाईपचा वापर होणार
दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसोबत वाहन जप्तीची वेळ येणार
तब्बल 5000 पोलीस कर्मचारी शहरात तैनात राहणार
व्हॉट्सॲप, फेसबूक, इंस्टाग्राम आणि इतर समाज माध्यमावर अफवा किंवा जातीय द्वेषाच्या पोस्ट करणाऱ्यांवर करणार कारवाई
परिसरात फ्लेक्स लावण्यासही बंदी
1 जानेवारी 2018 च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
30 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत 144 लागू
पुणे बेंगलोर महामार्गावर वारजे जवळ भीषण अपघात
अपघातात दुचाकीवरून चालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू
संकल्प चव्हाण असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव
प्राथमिक माहितीनुसार, संकल्प चव्हाण हा वारजेहून धायरीच्या दिशेने दुचाकीवर जात असताना ट्रकने जोरात धडक दिली
ही धडक इतकी जोरात होती की चव्हाण थेट ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला
वारजे पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे
मराठवाडा संघटक नितीन मुजमुले यांचा पाठिंबा
शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून गौतमीला विरोध, आयोजक सचिन लोखंडे यांचा आरोप
आष्टीत कुठलाही गालबोट लागलं नाही, गौतमीचा नृत्यात कुठेही बीभत्सपणा नाही, आज आष्टीत महिलांची मोठी गर्दी होती
1 तारखेला जामखेडमध्ये गौतमीचा पुन्हा कार्यक्रम आयोजित
मुंबईतील कांदिवली अँटी-नॉर्कोटिक्स सेलने तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तीन आरोपींना अटक केली
त्यांच्याकडून सुमारे 500 ग्रॅम चरस आणि 15 व्यावसायिक प्रमाणात, एलएसडी पेपरसह 25.8 ग्रॅम औषधी गोळ्या जप्त करण्यात आल्या
ज्याची किंमत 23 लाख 92 हजार सांगितली जात आहे
अटक केलेले सर्व आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात
आरोपींना न्यायालयात हजर केले असता, सर्वांना 31 डिसेंबरपर्यंत अमली पदार्थ विरोधी कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले
तब्बल दोन वर्षानंतर तळीरामांवर ब्रेथ अॅनालायझर तपासणी सुरू
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी करत कारवाई
बदलापूर- अंबरनाथ परिसरात महिलांची छेड काढू नये म्हणून महिला पोलीस तैनात