Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 10, 2022 | 7:28 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Latest Breaking News
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

आज 9 डिसेंबर. कालच गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकीचे निकाल लागले. हिमाचलची सत्ता काँग्रेसच्या हातात गेली आहे. तर गुजरात राखण्यात भाजपला यश आले आहे. त्यानुषंगाने आता या राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या ठिणग्या अजूनही उमटत आहेत, त्यानुषंगाने काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातही विविध घडामोडी घडत आहेत. मुंबई, पुणे नाशिकसह अन्य जिल्ह्यातही घडणाऱ्या घडामोडींकडेही आपलं लक्ष असेलच. सगळे अपडेट तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Dec 2022 04:45 PM (IST)

    अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या उपाध्यक्षपदी भारतीय महिला

    Marathi News LIVE Update

    अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या उपाध्यक्षपदी भारतीय महिला

    भारतीय वंशाच्या सुष्मिता शुक्ला पहिल्या उपाध्यक्ष

    केंद्रीय बँकेच्या दुसऱ्या सर्वोच्च पदी झाली नियुक्ती

    मार्च 2023 पासून शुक्ला या पदाचा जबाबदारी स्वीकारतील

  • 09 Dec 2022 12:59 PM (IST)

    काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त मोफत पेट्रोलचे वाटप

    शहरातील प्रणिती नाव असलेल्या महिला आणि युवतींना मोफत 1 लीटर पेट्रोल वाटप

    पेट्रोल घेण्यासाठी प्रणिती नामक महिलांची पंपावर मोठ्याप्रमाणात गर्दी

    सोलापूर शहर उत्तर युवक काँग्रेसच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला


  • 09 Dec 2022 11:11 AM (IST)

    मराठा क्रांती मोर्चाचे औरंगाबादेत शिट्टी बजाव आंदोलन सुरू

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात शिट्टी बाजाव आंदोलन

    सिडकोच्या शिवाजी महाराज स्मारकसमोर शिट्टी बजाव आंदोलन

    राज्यपालांच्या हकालपट्टीसाठी आंदोलन सुरू

  • 09 Dec 2022 10:53 AM (IST)

    5 वर्षीय मुलीवर इमारतीच्या लिफ्टमध्येच लैंगिक अत्याचार

    नवी मुंबई : एसी रीपेअरिंग करायला आलेल्या व्यक्तीचा पाच वर्षीय मुलीवर इमारतीच्या लिफ्टमध्येच लैंगिक अत्याचार, पळून जाताना नराधमाला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

  • 09 Dec 2022 10:39 AM (IST)

    60 हजार शिक्षकांची होणार परीक्षा

    औरंगाबाद : विद्यार्थ्यांची हुशारी तपासण्यासाठी 60 हजार शिक्षकांची होणार परीक्षा, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी विभागीय आयुक्तांचे आदेश, दहा हजार जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसोबत 60 हजार शिक्षकांची गुणवत्ता परीक्षा घेण्याचा निर्णय

  • 09 Dec 2022 10:32 AM (IST)

    महाराष्ट्र-कर्नाटक परिवहन खात्याच्या बस सेवा अजूनही बंद

    सीमा प्रश्न पेटल्यामुळे बस सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9 ते 23 डिसेंबरपर्यंत जमाबंदी आदेश लागू

    शनिवारी महाविकास आघाडीचे कर्नाटक सरकारच्या विरोधात निदर्शने होणार

  • 09 Dec 2022 09:43 AM (IST)

    दरीत आदळली कार, जीवितहानी नाही

    बुलढाणा : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दरीत आदळली कार, सुदैवाने जीवितहानी टळली, सुनगाव ते जळगाव जामोद रोडवरील घटना

  • 09 Dec 2022 09:24 AM (IST)

    सीमा प्रश्नासंदर्भात महाविकास आघाडीचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार

    गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून सकाळी सव्वा अकराची वेळ

    सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार अमित शाह यांना भेटणार

    कालची वेळ होती. मात्र ती रद्द झाली होती

    आज होणार अमित शाह यांच्यासोबत सीमाप्रश्नाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

     

  • 09 Dec 2022 09:01 AM (IST)

    मोदी यांची महाराष्ट्रातील खासदारांशी अचानक चर्चा

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील खासदारांशी अचानक चर्चा, खासदारांना काल रात्री निरोप दिल्याची सूत्रांची माहिती, महाराष्ट्रातील काही खासदार पंतप्रधान मोदी यांच्या भेटीला

  • 09 Dec 2022 08:54 AM (IST)

    माध्यमांचे कॅमेरे दिसताच चंद्रकांत पाटलांनी हात जोडत काढला पळ

    माध्यमांशी बोलण्यास चंद्रकांत पाटीलांची टाळाटाळ

    गेल्या 15 दिवसांपासून चंद्रकांत पाटील काढतायत पळ

    चंद्रकांत पाटलांना माध्यमांशी न बोलण्यासाठी वरिष्ठांनी तंबी दिल्याची माहिती

  • 09 Dec 2022 08:26 AM (IST)

    नाशिक : ज्ञानदीप आश्रमातील अत्याचार प्रकरण

    नाशिक : म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप आश्रमातील अत्याचार प्रकरण, संशयित आरोपी हर्षल मोरे यास न्यायालयाने सुनावली सात दिवसांची पोलीस कोठडी, पोलीस घेणार एअरगन विक्रेता आणि हर्षल मोरेच्या साथीदारांचा शोध, संशयित आरोपी हर्षल मोरे याच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल

  • 09 Dec 2022 08:23 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समृद्धी महामार्गाचे उद्धघाटन करणार

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानुषंगाने आज आढावा बैठक घेणार

    मुख्यसचिव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार

    संपूण तयारीचा आढावा राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांकडून घेणार आहेत

  • 09 Dec 2022 08:03 AM (IST)

    राज्यात १५ डिसेंबरपर्यंत कधीही पाऊस पडण्याची शक्यता

    बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस, तर तुरळक ठिकाणी जोरधारांचीही शक्यता

    11 ते 14 डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे

    मॅनदौस या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता

    पुणे हवामान खात्याचा अंदाज

  • 09 Dec 2022 07:49 AM (IST)

    Juhu Murder : 74 वर्षीय महिलेची मुलानेच केली हत्या

    मुंबई : जुहूमध्ये 74 वर्षीय महिलेची मुलानेच हत्या केल्यानं खळबळ, पोलिसांची मुलासह त्याच्या साथीदाराला अटक, पुढील तपास सुरु, हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव वीणा कपूर

  • 09 Dec 2022 07:47 AM (IST)

    नाशिक विमानतळाला ‘जटायू विमानतळ’ नाव द्या

    नाशिकच्या साधू महंतांची उड्डाणमंत्र्यांकडे मागणी

    सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येणार लाखो भाविक

    यानिमित्ताने होणार नाशिकचे ब्रँडिंग

    श्रीरामाला दिशा दाखवणाऱ्या जटायूचे नाव विमानतळाला देण्याची मागणी

    नाशिकला रामायणाचे अनेक संदर्भ असल्याने विमानतळाला देखील हे नाव संयुक्तिक असल्याचा दावा

     

     

     

     

  • 09 Dec 2022 06:58 AM (IST)

    खासदार शरद पवार, लांडगे यांचा कुस्तीगीर परिषदेचा राजीनामा

    भाजपचे खासदार रामदास तडस यांच्याकडे कुस्तीगीर परिषदेची सूत्रे

    पुण्यात रंगणार महाराष्ट्र केसरीचा आखाडा

  • 09 Dec 2022 06:55 AM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या निषेधार्थ 13डिसेंबरला पुणे बंद

    पुणे बंदमध्ये पुणे व्यापारी महासंघ सहभागी होणार

    दुपारी 3 पर्यंत दुकानं बंद ठेवून होणार सहभागी

    पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकर्यांच्या बैठकीत निर्णय

  • 09 Dec 2022 06:53 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आज अंबरनाथमध्ये येणार

    उद्योगपती विश्वनाथ पनवेलकर यांच्या साईबाबा मंदिराचा लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावणार

    मुख्यमंत्र्यांची वेळ अद्याप निश्चित नाही

    केसरकर सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत अंबरनाथला येणार

  • 09 Dec 2022 06:49 AM (IST)

    मालेगावात एटीएसकडून पुन्हा झाडाझडती

    मालेगावातील अजून काही लोक एटीएसच्या रडारवर असल्याची शक्यता

    मालेगावात शहरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही कार्यकर्त्यांना मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाने आधीच ताब्यात घेतलेले आहे

    त्यांचे कार्यालय देखील सील करण्यात आलंय

    काल पुन्हा मालेगाव शहरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयाला एक नोटीस बजावण्यात आली

  • 09 Dec 2022 06:46 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता

    इंदोरी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध

    9 ग्रामपंचायतीतील 44 सदस्य बिनविरोध तर उर्वरित 36 जागांसाठी 76 उमेदवार रिंगणात

    तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

    शिरगाव येथील सरपंच पदाचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने सरपंच पद देखील बिनविरोध झाले आहे