मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 19 बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी ही तक्रार दाखल केली असून त्याच्या चौकशीचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. राज्यात शिंदे गट आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युतीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे अस्तित्वात येण्याचे संकेत मिळत आहेत. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
मुंबई :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा आणि नागपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर
क्रांतिज्योती सावित्री बाई फुलेंच्या जयंत्ती निमित्त मुख्यमंत्री सातारा येथील सावित्री बाईंच्या नायगाव येथील जन्मस्थळी भेट देणार
त्याचप्रमाणे नागपूर येथे इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ऑनलाईन उपस्थित असणार
20 जानेवारी रोजी जेपी नड्डा पुण्यात येणार,
पुण्यातील शिरूर मतदार संघात जे पी नड्डा यांची होणार जाहीर सभा,
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून त्याच अनुषंगाने नड्डा यांची भोसरी येथे सभा होणार आहे,
चंद्रकांत पाटील यांची माहिती.
108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसची नागपुरात जोरदार तयारी
नागपूर विद्यापीठाला मिळाली आयोजनाची जबाबदारी
48 वर्षानंतर मिळाला नागपूरला आयोजनाचा मान
3 ते 7 जानेवारीपर्यंत चालणार परिषद
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन करणार उद्घाटन
राज्य शासनाकडून मानधन मिळत नाही स्थानिक अधिकारी ऐकत नाहीत,
सांगली, सातारा , वाई ,सोलापूर या भागातील कलावंतांनी पुण्यात येऊन भेट घेत,
सरकारकडे कलावंतांचे प्रश्न मांडण्याची केली विनंती,
राज्य सरकारने जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचना देण्याची केली विनंती.
सोलापूर :
– बार्शीतील पांगरी-शिराळे येथील फटाका फॅक्टरी स्फोट प्रकरणी मालकावर गुन्हा दाखल
– फटाका फॅक्टरीचा मालक युसुफ मणियार याच्यावर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल
– फॅक्टरी मालक युसुफ मनियार आणि नाना पाटेकर यांच्यावर गुन्हा दाखल
– बार्शीतील पांगरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला गुन्हा
– संबंधित फॅक्टरीने कोणताही परवाना न घेता चालवत असल्याची बाबही गुन्ह्यामध्ये नोंद
– फटाका फॅक्टरीचा चालक आणि त्याचा साथीदार परागंदा
– 304, 337, 338, 285, 286, 34 भारतीय विस्फोटक अधिनियम कलम 5 आणि 9 (ब)
– सहाय्यक पोलीस फौजदार सतीश कोठावळे यांच्या फिर्यादीवरून दाखल झाला गुन्हा
पुणे :
कलावंतांना मानधन मिळत नसल्यानं कलावतांनी सुरेखा पुणेकरांची घेतली भेट
राज्य शासनाकडून मानधन मिळत नाही स्थानिक अधिकारी ऐकत नाहीत
सांगली, सातारा, वाई,सोलापूर या भागातील कलावंतांनी पुण्यात येऊन भेट घेतली
सरकारकडे कलावंतांचे प्रश्न मांडण्याची केली विनंती
राज्य सरकारने जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचना देण्याची केली विनंती
अहमदनगर : त्यामुळे आता नामांतराच्या प्रश्ना बरोबर जिल्हा विभाजनाचा प्रश्न पेटण्याची चिन्हे,
विभाजनानंतर काय नाव द्यायचं राजकीय आणि सामाजिक संघटनेकडून विचारविनिमय करून निर्णय घ्यावा,
उत्तर नगर जिल्ह्यापेक्षा दक्षिण नगर जिल्हा दुष्काळी,
विभाजन झालं तर दक्षिण जिल्ह्याचा विकास होईल संग्राम जगताप.
खेड तालुक्यातील चासकमान धरणात कार बुडाली
रात्रीच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडली घटना
कारमधून 4 जण करत होते प्रवास
गाडीच्या काचा खाली आसल्याने चार जणांचे वाचले प्राण
वेळीच मदत मिळाल्याने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिकांना यश
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकतो मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दाैरा
शिंदे गटाचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी राहणार सामील
शरयू नदीच्या किनारी महाआरती करणार असल्याची माहिती
21 हजार 49 उमेदवारांनी केले अर्ज
आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रिया सुरू
चालकांची 15 पदे देखील भरली जाणार
जवळपास 2 हजार महिला उमेदवारांचे अर्ज
तीन तृतीयपंथी उमेदवारांनी देखील केले अर्ज
तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात आरोपी शिझान खान जामिनासाठी करणार अर्ज
31 डिसेंबर रोजी शिजानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
शिझानचे वकील शैलेंद्र मिश्रा करणार जामिनसाठी अर्ज
सर्किट हाऊस येथे बोलावली अधिकाऱ्यांची बैठक
चंद्रकांत पाटलांच्या बैठकीच्या ठिकाणी पोलीस विभाग अलर्टवर
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
काल चंद्रकांत पाटील भीमा कोरेगावला गेले नव्हते, घरूनच चंद्रकांत पाटलांनी केलं होतं अभिवादन
पुणे : अजित पवारांच्या विरोधात शहर भाजप करणार आज आंदोलन,
भाजप शहराध्यक्ष जगदीश यांच्या नेतृत्वात 11 वाजता आंदोलन,
संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापले,
भाजपसह शिंदे गटाने केली अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी
आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात
अहमदनगरच्या पोलीस मुख्यालय मैदानात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात
129 जागेसाठी 14 हजारहुन अधिक अर्ज प्राप्त
तर आरंगाव येथील बायपासला धावण्याची चाचणी
अनेक वर्षापासून भारतीय प्रक्रिया रखडल्याने तरुणांमध्ये नाराजी होती
अखेर भरती प्रक्रियेला सुरुवात झाल्याने तरुणांच्या चेहऱ्यावर आनंदाचा वातावरण आहे
मात्र 129 जागेसाठी 14 हजार अर्ज आल्याने तरुणांमध्ये धाकधूकीच वातावरण
सोलापूर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी टोल नाक्यावरील टोल वसुली काल दुपारपासून बंद
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आक्रमक आंदोलननंतर टोल वसुली बंद
31 डिसेंबर 2022 पुर्वी टोल रस्त्याची कामे पुर्ण करा अन्यथा आक्रमक आंदोलनाचा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला होता
अनेक उड्डान पूल, रस्ते कामे अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरु असल्याने केले होते आंदोलन
शिवसेना खासदार ओमराजे यांनी टोल बंद करण्याच्या आवाहनानंतर शिवसैनिकांचे केले होते आक्रमक आंदोलन
ही घटना पाली येथील राजकीय वासाजवळ घडली.
अपघातात सुमारे दहा जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलं नाही.
बचाव पथक घटनास्थळी दाखल. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आलं
नाशिक : आतापर्यंत आगीत दोघांचा मृत्यू ,तर 17 जखमी,
तिघांची प्रकृती चिंताजनक,
आग विझवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच,
22 तासानंतर देखील आगीवर अद्यापही नियंत्रण नाहीच,
अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरूच,
मुख्यमंत्र्यांकडून काल मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर,
आगीच्या घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज औरंगाबाद दौऱ्यावर
औरंगाबाद येथील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर होणार सभा
भव्य सभेला राज्यातील हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती
मैदाना जवळील पाच महत्त्वाचे रस्ते उद्या सभेमुळे बंद
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची ही महत्त्वाची सभा
औरंगाबादेत नवीन वर्षात धावणार 3580 नवीन बसगाड्या
3580 नवीन बस गाड्यांपैकी 180 बस गाड्या असणार इलेक्ट्रिक
राज्यातील 50% एसटी बसचे आयुष्यमान संपल्याची माहिती
2026 पर्यंत 5000 इलेक्ट्रिक बस येणार असल्याची महामंडळाकडून माहिती
2023 या सालात प्रवाशांच्या सेवेत पाहायला मिळणार नवीन बस गाड्या
तुरुंगाच्या भिंतीत दुधाच्या पिशवीत लपवला होता सिम कार्ड आणि बॅटरी नसलेला मोबाईल
तुरुंग अधिकाऱ्यांनी घेतलेल्या झडती दरम्यान आला प्रकार समोर
मोबाईल सापडल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
कळंबा कारागृहात या आधीही सापडलेत मोबाईल आणि गांजा
एक महिला ठार तर लहान मुलासह तीन जण जखमी
मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर शहापूर जवळील कुमार गार्डन हॉल जवळ संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला
अपघातातील एकाची प्रकृती चितांजनक आहे
मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टोयोटो गाडी, रिक्षा व स्कुटी अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून स्कुटी व रिक्षाचा चक्काचूर झाला आहे
गुहागर येथून नवी मुंबईला जाणाऱ्या धावत्या मारुती स्वीफ्ट डिजायर कारने अचानक घेतला पेट
मुंबई-गोवा महामार्गावर खेड मोरवंडे गावानजीक घडली घटना
धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने प्रसंगावधान राखून गाडीतील चार प्रवासी बाहेर पडले
सुदैवाने जीवितहानी टळली मात्र गाडीतील बॅगा आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या
पोलिसांकडून मणियार याचा शोध सुरू आहे
बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे गावात त्यांचा फटाका कारखाना होता
कारखान्यातील स्फोटात चार कर्मचारी ठार झाले असून तीन कर्मचारी गंभीर जखमी आहेत
अद्यापही आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाचे शोध कार्य सुरू
मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान घेतले तिरूमाला बालाजीचे दर्शन
यावेळी सर्व शिंदे कुटुंब उपस्थित होते
श्रीकांत शिंदे यांच्या मुलाचे केस देखील तिरुमालाला देण्यात आले
बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे गावात असलेल्या फटाका कारखान्यातील स्फोटात चार कर्मचारी ठार
तीन कर्मचारी गंभीर जखमी
प्रशासनाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू
अद्यापही आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाचे शोध कार्य सुरू