महाराष्ट्राचं महामंथन LIVE: दिग्गजांचं विचारमंथन एकाच ठिकाणी

| Updated on: Feb 22, 2022 | 3:11 PM

मुंबई: महाराष्ट्राच्या विकासाचं मॉडेल नेमकं काय असेल? महाराष्ट्र हे देशात महान राष्ट्र बनवण्यासाठी कोणाचा प्लॅन काय आहे? महाराष्ट्र सर्वात पुढे राहण्यासाठी काय करायला हवं, याबाबत सर्वात विराट, सर्वात भव्य मंथन टीव्ही 9 मराठीच्या व्यासपीठावर पार पडलं. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्राप्रती महामंथन केलं. आजचा दिवस टीव्ही 9 च्या महाराष्ट्र महामंथनने गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, […]

महाराष्ट्राचं महामंथन LIVE: दिग्गजांचं विचारमंथन एकाच ठिकाणी
Follow us on

मुंबईमहाराष्ट्राच्या विकासाचं मॉडेल नेमकं काय असेल? महाराष्ट्र हे देशात महान राष्ट्र बनवण्यासाठी कोणाचा प्लॅन काय आहे? महाराष्ट्र सर्वात पुढे राहण्यासाठी काय करायला हवं, याबाबत सर्वात विराट, सर्वात भव्य मंथन टीव्ही 9 मराठीच्या व्यासपीठावर पार पडलं. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्राप्रती महामंथन केलं. आजचा दिवस टीव्ही 9 च्या महाराष्ट्र महामंथनने गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विद्यार्थी नेत कन्हैया कुमार, पाटीदार नेता हार्दिक पटेलसह दिग्गजांनी टीव्ही 9 च्या मंचावर महामंथन केलं. कृषी, आरोग्य, शिक्षण, आरक्षण, राजकारण, रोजगार अशा विविध विषयावर मान्यवरांनी भाष्य करत, महाराष्ट्राच्या विकासाबाबत आपआपली मतं मांडली.

महाराष्ट्र महामंथन या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झालं.  त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपलं विकासाचं मॉडेल मांडलं आणि मुलाखतीचं सत्र सुरु झालं.

प्रश्नांपासून पळणार नाही, ब्राह्मण आरक्षण शक्य नाही: मुख्यमंत्री

मी कोणत्याही प्रश्नापासून पळणारा मुख्यमंत्री नाही. मराठा आरक्षण असो वा अन्य कोणताही प्रश्न जनतेच्या सर्व प्रश्नांना सामोरं जाऊ. धनगर आरक्षणाची योग्यच शिफारस करु. मात्र ब्राह्मण समाजाला आर्थिक आरक्षण मिळणं शक्य नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

महाराष्ट्राचा कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण यासह विविध क्षेत्रातील कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी धांडोळा घेतला. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. शिवाय केंद्रात आणि राज्यात पुन्हा आमचंच सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेसोबतच्या युतीसाठी भाजप पुढाकार घेईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधात राहून आणखी प्रगल्भ होतील असा टोमणाही त्यांनी लगावला.

सविस्तर बातमीप्रश्नांपासून पळणार नाही, ब्राह्मण आरक्षण शक्य नाही: मुख्यमंत्री

 मुख्यमंत्र्यांनंतर आयजी कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य मिलिंद भारंबे यांनी पोलीस प्रशासनाची भूमिका मांडली. तसंच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

यानंतर शाहीर संभाजी भगत यांनी आपला कार्यक्रम सादर करुन वातावरण हलकं केलं.

मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या सत्राला सुरुवात झाली.

कर्जमाफी, हमीभाव हे सगळं मलमपट्ट्या करण्याचं काम आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केली. शिवाय, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात नाहीत, असा आरोपही राजू शेट्टींनी केला. तसेच, सरकारचा हमीभाव आणि बाजारपेठेतील भाव यांच्यात 1000 ते 1200 रुपयांचा फरक असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

खासगी दूध संघाना अनुदानाचे पैसे मिळत नाहीत. दूध संस्था आणि सरकारच्या वादात शेतकऱ्यांचा बळी जातोय, असे राजू शेट्टींनी सांगितल्यावर महादेव जानकर म्हणाले, “शेतकऱ्याला दुधाला 5 रुपये अनुदान आपण देतोय. आपल्या राज्यातील दूध संघ मजबूत व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावं, यासाठी सरकार प्रयत्न करतेय. अनुदानाचे दोन हफ्ते थकलेत हे खरंय, ते लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांकडून 25 रुपये प्रमाणे दूध खरेदी करावी.”

सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा 

राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्या सत्रानंतर अब की बार किसकी सरकार या सत्राला प्रारंभ झाला. यामध्ये काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपआपल्या पक्षाची बाजू मांडली.

यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं व्हिजन मांडलं. राम हा या देशाचा इतिहास आहे. त्यामुळे राम मंदिर बनलं पाहिजे. तसेही, रामाचं मंदिर जर रामाच्या जन्मस्थानी होणार नाही, मग कुठल्या स्थानी होणार? असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राम मंदिराच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. मला मल्ल्याशी काही घेणेदेणे नाही. मी एकंदरीत बँक सिस्टमचा मुद्दा मांडला होता, असं गडकरींनी नमूद केलं.

सविस्तर बातमी:  रामाच्या जन्मस्थानी मंदिर होणार नाही, मग कुठे होणार? : गडकरी

नितीन गडकरी यांच्यानंतर  ICU मध्ये लाल परी या सत्रात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी एसटीची अवस्था मांडली.

यानंतर महाराष्ट्राचे MOST या सत्रात प्रकाश आंबेडकर, राम शिंदे आणि एमआयएम आमदार वारिस पठाण यांनी विचारमंथन केलं.

मग अनिसच्या मुक्ता दाभोळकर,  हर्षाली पवार  आणि सनातनचे संजीव पुनाळेकर यांचं सत्र पार पडलं. 

उत्तर भारतीयांना आरक्षण देण्याची मागणी

आरक्षण आखाडा या सत्रात काँग्रेस आमदार नितेश राणे, भाई जगताप, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांनी मतं व्यक्त केली. यावेळी संजय निरुपम यांनी उत्तर भारतीयांना आरक्षण देण्याची मागणी केली. तर नितेश राणे यांनी आधी स्थानिकांकडे बघा, मग बाहेरच्यांकडे बघा, असा टोला लगावला. सविस्तर बातमी –  महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना आरक्षण द्या : संजय निरुपम

या सत्रानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कविता सादर करत दिवसभरातील  वातावरणातील तणाव निवळला.

रामदास आठवलेंनंतर दिवसभरातील मोस्ट अवेेटेड सत्र ‘राज’कारण अर्थात राज ठाकरे यांची मुलाखत झाली.

…तर मराठी माणसांनाही ठोकून काढेन : राज ठाकरे

चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रात राहिलात, वागलात, तर ठोकून काढणारच, मग उत्तर प्रदेशातील माणूस असो किंवा मराठी माणूस असो, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा असेल, यासह विविध राजकीय विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

सविस्तर बातमी …तर मराठी माणसांनाही ठोकून काढेन : राज ठाकरे

महाराष्ट्र महामंथन या दिवसभरातील कार्यक्रमाचा शेवट प्रचंड धुमश्चक्रीने झाला. या सत्राचं नाव होतं अँग्री यंग मॅन. या सत्रातील पाहुणे होते पाटीदार नेता हार्दिक पटेल आणि विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी मोदी आणि भाजप सरकारची चीरफाड केली. भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांचे प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. तसंच आम्ही केवळ बोलत नाही तर करुन दाखवतो असं म्हणत आपल्या कार्यचा पाढा वाचला.

सविस्तर बातमी –  पुढचा प्लॅन ठरलाय, ‘महामंथन’मध्ये कन्हैयाने ठणकावलं!

कन्हैया कुमार, हार्दिक पटेल लाईव्ह

महाराष्ट्र महामंथन – लोकशाही म्हणजे WWF ची मॅच नाही, आम्ही या देशातील सार्वभौम जनतेला पाठिंबा देतो, जनतेच्या सार्वभौमाला ठेच पोहोचवणाऱ्याला विरोध करतो – कन्हैया कुमार

आम्ही केवळ बयानबाजी करत नाही तर प्रत्यक्ष कामही करतोय, शेतकऱ्यांच्या संघर्षात सहभागी होतोय – कन्हैया कुमार

महाराष्ट्र महामंथन – देशात मोदींना पर्याय नाही असं बिंबवलं जातंय, पण देशाची जनता हाच त्यांना पर्याय आहे – कन्हैया कुमार 

युवकांना आज रोजगार हवे आहेत, मोदीजी म्हणतात भजी तळा- हार्दिक पटेल

महाराष्ट्र महामंथन – राम मंदिरासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येता, रोजगार निर्मितीसाठीही एकत्र या – हार्दिक पटेल

महाराष्ट्र महामंथन – दिल्लीत आप जिंकते, भाजप हरते तर ईव्हीएम चांगले, भाजप यूपीमध्ये जिंकतं तर घोटाळा? – शायना एनसी

महाराष्ट्र महामंथन – इतिहास काम से बनता है, मन की बात से नही – कन्हैया कुमार

राज ठाकरे लाईव्ह 

महाराष्ट्र महामंथन: ज्या दिवशी ब्लू प्रिंट मांडली, त्यादिवसापासून मला एकही पत्रकाराने त्याबद्दल विचारलं नाही, मी माझं विकासाचं मॉडेल मांडलं आहे : राज ठाकरे

महाराष्ट्र महामंथन: ग्रामीण भागात लक्ष घालायला हवं मान्यच, पण आज शेती कुणाला करायची नाहीय, शेती पीकत नाहीय, शेतकऱ्यांची मुलं शहरात येत आहेत, शहरंही विकसित करायला हवी : राज ठाकरे

महाराष्ट्र महामंथन: मराठीचा मुद्दा हा माझ्या अंतर्मनातला आहे, माझ्या वाट्याचं मी बाहेर जाऊ देणार नाही : राज ठाकरे

महाराष्ट्र महामंथन: 1 लाख कोटीमध्ये भारतातील रेल्वे व्यवस्थित होऊ शकते हा काकोडकरांचा अहवाल, आता ते करायचं की मुंबई-अहमदाबाद 1 रेल्वे विकसित करायची? : राज ठाकरे

महाराष्ट्र महामंथन: निवडणुका आल्या की भाजपवाले राम मंदिराचा मुद्दा काढतील आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील हे मी मागेच बोललो होतो : राज ठाकरे

महाराष्ट्र महामंथन: मी राहुल गांधींबद्दल चांगलं बोलतोय याचा अर्थ त्यांच्याशी युती-आघाडी करतोय असा नाही, मी 2014 मध्ये मोदींबद्दलही चांगलं बोललं होतो. आता कुणाबद्दल चांगलं बोलायचं पण नाही का? : राज ठाकरे

महाराष्ट्र महामंथन: भाजपने साम दाम दंड भेदचा प्रयत्न पाच राज्यात पण केला, आता लोक भाजपकडून पैसे घेतील पण मतं देणार नाहीत : राज ठाकरे

साडेचार वर्षात नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. असे का? लोकांना सामोरं जात नाहीत, म्हणजे काळेबेरे आहे – राज ठाकरे लाईव्ह

नोटाबंदी, जीएसटी, राफेल या सगळ्याबद्दल तुमच्या मनात काळंबेरं नाही तर मोदींनी समोर येऊन बोलायला हवं, अमित शाहांनी नको : राज ठाकरे

कन्हैया कुमार, हार्दिक पटेल हे ज्या प्रकारे बोलत आहेत, मुद्दे मांडत आहेत, ते उत्तम आहे – राज ठाकरे लाईव्ह

महाराष्ट्र महामंथन: कन्हैया कुमार, हार्दिक पटेल ज्या पद्धतीने लोकांसमोर जातायेत त्यांचं कौतुक आहे, अभ्यासपूर्ण मांडणी करत आहेत : राज ठाकरे

महाराष्ट्र महामंथन: नरेंद्र मोदी थापा मारतायेत, नोटबंदी, जीएसटी हे लोकांना आवडलेलं नाही, त्याचा परिणाम निवडणुकीतील निकाल : राज ठाकरे

महाराष्ट्र महामंथन: राहुल गांधींचं नेतृत्त्व सिद्ध झालं हे या निवडणुकांनी दाखवलं, पप्पू म्हणत होते आता तेच परमपूज्य झालेत –  : राज ठाकरे

महाराष्ट्र महामंथन: उत्तर भारतीयांना आरक्षण द्या या संजय निरुपमांच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज नाही : राज ठाकरे 

महाराष्ट्र महामंथन: प्रश्न निवेदनातून सुटत नाहीत, त्यामुळे खळ्ळ खट्याक : राज ठाकरे

माझा जो परप्रांतियांचा मुद्दा आहे, तो जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने आहे – राज ठाकरे लाईव्ह

आरक्षण आखाडा – सहभाग – नितेश राणे, शायना एनसी, संजय निरुपम, भाई जगताप

महाराष्ट्र महामंथन : महाराष्ट्रात शिंदे-पवार यांना एसटी/एससीमध्ये आरक्षण मिळतं, जर ते दिल्लीत गेले आणि त्यांना तिथे मिळालं नाही तर कसं होईल? – संजय निरुपम

महाराष्ट्र महामंथन : उत्तर भारतीयांना त्यांच्या राज्यात आरक्षण आहे, पण इकडे महाराष्ट्रात आरक्षण नाही. त्यांना ते मिळावं – संजय निरुपम

महाराष्ट्र महामंथन : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसेल का असा प्रश्नच विचारणे बंद करा, त्या प्रश्नाने संशय निर्माण होत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही: नितेश राणे

महाराष्ट्र महामंथन : ओबीसी समाजाने घाबरायचं कारण नाही, मराठा आरक्षणाने कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही : नितेश राणे

महाराष्ट्र महामंथन : आधी स्थानिकांचा विचार करा, मग संघर्ष होणार नाही : नितेश राणे

जात एकच पण वेगळ्या आडनावांमुळे आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्यावर तोडगा काढायला हवा : संजय निरुपम

उत्तर भारतीय महाराष्ट्रात येऊन आरक्षण मागू लागले, तर मग इथल्या मराठी माणसाने जायचं कुठं? सर्वात आधी इथल्या स्थानिकांचा अधिकार आहे, : नितेश राणे

आधी स्थानिकांचा विचार करा, मग संघर्ष होणार नाही : नितेश राणे

नमो विरुद्ध रागा – अरविंद सावंत (शिवसेना), जयंत पाटील (राष्ट्रवादी) आणि विश्वास पाठक (भाजप)

नमो की रागा , 10 पैकी कुणाला किती गुण द्याल? अरविंद सावंत यांचं उत्तर – कुणालाच नाही. कारण ज्याला सोनं म्हटलं ते पितळ निघालं, ज्याला पितळ समजलं ते कधीही सोनं होईल की नाही माहित नाही

तारेवरची कसरत आम्ही राष्ट्रवादीकडूनच शिकलो, अरविंद सावंत यांचं जयंत पाटलांना उत्तर

शिवसेनेच्या तारेवरच्या कसरतीचं कौतुक, सत्तेतही राहायचं आणि विरोधही करायचा – जयंत पाटील

भाजपची ताकद नव्हती, मोदींना लोकांनी मतं दिली, आता हळूहळू मोदींना पर्याय उपलब्ध होत आहे. मोदी विकासाचं स्वप्न दाखवून सत्तेत आले, पण त्यांनी ते पूर्ण केलं नाही – जयंत पाटील

शिवसेना कुणाच्या बाजूने नाही, तर सत्याच्या बाजूने – खा. अरविंद सावंत

भाजपचा पराभव अहंकारामुळे , त्या अहंकारामुळेच शिवसेना रस्त्यावर – खा. अरविंद सावंत

भाजपची वेळ वाईट आली आहे, त्यामुळे ते शिवसेनेला टाळी देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण 2014 मध्ये युतीत खोडा घालणारे कोण होतं, ते त्यांनी शोधावं – खा. अरविंद सावंत

मुक्ता दाभोलकर 

मोकळेपणाने महाराष्ट्रात, भारतात कुठे बोलू शकत नाही – मुक्ता दाभोळकर

जे आम्हांला आज श्रेय मिळतंय ते आमचं नाही, ते डॉ. दाभोळकरांचं आहे -मुक्ता दाभोळकर

लोकशाही असून सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही- मुक्ता दाभोळकर

जिथे विचार मांडले म्हणून खून होतो, ते घटनेसाठी शोभेसे नाही. माणूस मारुन विचार मारता येत नाही – मुक्ता दाभोळकर

तुम्ही विचार मांडता म्हणून खून होऊ शकतो.म्हणून सामान्य माणूस घाबरतो – मुक्ता दाभोळकर

सर्वात आधी माणसाच्या मनात बदल घडायला हवा, तर समाजात बदल होईल – मुक्ता दाभोळकर

महाराष्ट्राचे MOST

मराठा आरक्षण दिल आहे आणि ते कोर्टात आतापर्यंत टिकलं आहे. धनगर आणि मुस्लिमांच्या आरक्षणाचा पण प्रश्न लवकर सुटेल-राम शिंदे

सनातनसारख्या संस्थांना केवळ भाजपच नव्हे, काँग्रेसही पाठीशी घालतंय – प्रकाश आंबेडकर

अनेकांना पंतप्रधान व्हायचंय, प्रत्येकजण आपापली आघाडी घेऊन पुढे येणार आहे – प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र महामंथन: RSS ला हे हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, पण हा देश सर्वांचा आहे – आमदार वारिस पठाण

महाराष्ट्र महामंथन: गेल्या 70 वर्षात जात जावी यासाठी कुणी काय प्रयत्न केले ते सांगावे, प्रत्येक निवडणुका या जातीपातीवरुनच होतात -प्रकाश आंबेडकर

नितीन गडकरी लाईव्ह 

महाराष्ट्र महामंथन: राजू वाघमारे – गडकरीजी तुम्ही काम करता पण ती फक्त कागदावर आहेत नितीन गडकरी – मी आव्हान स्वीकारुन कामं दाखवतो. तुम्ही एक एक विषयाच्या डिटेलमध्ये जाऊन माहिती घेऊन मग टीका करा

महाराष्ट्र महामंथन: शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन, बाळासाहेब केवळ शिवसेनेचे नाहीत तर आमच्यासाठीही वंदनीय, दोन्ही पक्षाची युती व्हावी ही आमची इच्छा आहे – नितीन गडकरी –

राजू वाघमारे – विकास सोडून भाजप पुन्हा धर्माच्या नावावर निवडणुका लढवणार का?

नितीन गडकरी – राम मंदिर आणि धर्म हे मुद्दे एकत्र करु नका. धर्म म्हणजे जगण्याची पद्धत असते. राम मंदिर हा भाजपचा पूर्वीपासूनचा मुद्दा, आमचा विकासाचा मुद्दा सोडलेला नाही

महाराष्ट्रात 5 लाख कोटी पेक्षा जास्त रुपयाची कामं झालीत – नितीन गडकरी

तिसऱ्या आघाडीतील पक्ष एकमेकांकडे बघत नव्हते, त्यांना आता आमची भिती आहे, त्यामुळेच ते एकत्र आले आहेत – नितीन गडकरी

जे विकासावर निवडणुका लढवू शकत नाहीत, ते जाती-धर्मावर समाजात भांडणं लावून मतं मिळवतात

मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमधील मतांचा फरक केवळ 43 हजारांचा आहे, मात्र हार ही हार असते नि विजय हा विजय असतो, आम्ही पराभव स्वीकारला आहे – नितीन गडकरी

विजय मल्ल्याने फ्रॉड केला असेल तर कायद्याने शिक्षा होईल, पण मी बँकिंगबद्दल बोलतोय, माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या – नितीन गडकरी

विजय मल्ल्याने चुकीचे केले असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, मात्र बँकांचा अॅप्रोच असा असला पाहिजे की, अडचणीतल्या माणसाला बाहेर काढलं पाहिजे – नितीन गडक

विजय मल्ल्यांचा बिझनेस 40 वर्षे नीट होता, मात्र अडचणीत आल्यावर तो फ्रॉड कसा? मला मल्ल्याशी काही घेणेदेणे नाही. मी एकंदरीत बँक सिस्टमचा मुद्दा मांडला होता

प्रत्येक प्रश्नाकडे सकारात्मक पाहिले, तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असतं – नितीन गडकरी

महाराष्ट्र महामंथन: सत्र अब की बार किसकी सरकार – काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी मंथन

आमच्या सरकारने जो विकास केला आहे, तो गेल्या अनेक वर्षात झाला नाही. ज्या निवडणुकांमध्ये पराभव सांगितला जातो, त्यावर आम्ही ईव्हीएमवर खापर फोडलं नाही – केशव उपाध्ये

राहुल गांधी आणि काँग्रेस नकारात्मक प्रचार करत आहेत. राफेल मुद्द्यावरुन ते तोंडावर पडले – भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये

भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या, या सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्नच सोडवले नाहीत, साखर, डाळ जर बाहेरुन आयात केलात, तर इथल्या शेतकऱ्यांना काय मिळणार? – काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे

महाराष्ट्र महामंथन: भाजपने ग्राऊंड लेवलला जाऊन पाहावं, सरकारबद्दल काय चर्चा आहे हे समजेल, आमचे विरोधक म्हणजे तुमचे समर्थक म्हणतात भाजपला कधीच मतदान करणार नाही: संभाजी भगत

महादेव जानकर आणि राजू शेट्टी 

महादेव जानकर, दुग्धविकास मंत्री

शेतकऱ्याला दुधाला ५ रूपये अनुदान आपण देतोय
आपल्या राज्यातील दुध संघ मजबुत व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करतेय
अनुदानाचे २ हफ्ते थकलेत हे खरंय, ते लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे
शेतकऱ्यांकडून २५ रूपये प्रमाणे दुध खरेदी करावी
गोशाळांना ३४ कोटी रूपये दिले गेले

राजू शेट्टी, खासदार

खासगी दुध संघाना अनुदानाचे पैसे मिळत नाही
दुध संस्था आणि सरकारच्या वादात शेतकऱ्यांचा बळी
राज्यातील गोशाळांमध्ये गाईंची अवस्था काय याचं टीव्ही ९ ने स्टिंग ऑपरेशन करावं
भाकड जनावरांना बाजारात विकल्यावर चांगला पैसा मिळत होता मात्र गोवंश कायदा आणल्यानंतर शेतकरी हवालदिल

राजू शेट्टी, खासदार

बेवारसी जनावरं शेतामध्ये जाऊन नुकसान करतात, अनेक अपघात घडतात
सरकारने गोवंश कायद्याबाबत पुन्हा विचार करावा
पाच राज्यातील निकालांवर शेतकऱ्यांचा परिणाम अधिक जाणावला
संघटीत झालेल्या शेतकऱ्यांनी सरकार उलथवलं
महाराष्ट्रातही शेतकरी रोषाचा परिणाम सरकारला सहन करावा लागणार
शेतकरी फॅक्टर महाराष्ट्रात महत्वाचा ठरणार

महादेव जानकर, दुग्धविकास मंत्री

शेतकऱ्यांप्रती राज्य सरकार संवेदनशील
विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकार करतंय

राजू शेट्टी, खासदार

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही
सरकारचा हमीभाव आणि बाजारपेठेतील भाव यांच्यात १ हजार ते १२०० फरक

महादेव जानकर, दुग्धविकास मंत्री

कांदा उत्पादकांना थोड्या दिवसात चांगला निर्णय येणार

राजू शेट्टी, खासदार

कांदा संकटांबाबत पंतप्रधानाना, कृषिमंत्र्यांना आधीच पत्र लिहून कळवलं होतं
निर्यातीवर अनुदान दिलं असतं तर कांदा उत्पादकांवर ही वेळ आली नसती

राजू शेट्टी, खासदार

२०१४ साली मोदींनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ही दिशाभूल करणारी
शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने दिली, शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली
जी आश्वासने दिली ती पुर्ण न होणारी होती.
सरकारला बाजारपेठ स्थिर ठेवता आलं नाही, आयात-निर्यातीचं धोरणं ठरवता आली नाहीत.
सरासरी उत्पन्नात जास्त फरक पडत नाही
बाहेरच्या देशातून जी डाळं येतेय ती थांबविण्याचा प्रयत्न का केला नाही
पिकविम्यातील घोटाळा आम्हीच बाहेर काढला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ११ अधिकाऱ्यांना निलंबित केलं

राजू शेट्टी, खासदार

कर्जमाफी, हमीभाव हे सगळं मलमपट्टी करण्याचं काम
शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना केल्या जात नाही

महाराष्ट्रातही शेतकरी रोषाचा परिणाम सरकारला सहन करावा लागणार – खा. राजू शेट्टी

पाच राज्यातील निकालांवर शेतकऱ्यांचा परिणाम अधिक जाणावला, संघटीत झालेल्या शेतकऱ्यांनी सरकार उलथवलं – खा. राजू शेट्टी

बेवारसी जनावरं शेतामध्ये जाऊन नुकसान करतात, अनेक अपघात घडतात, सरकारने गोवंश कायद्याबाबत पुन्हा विचार करावा – खा. राजू शेट्टी

खासगी दूध संघाना अनुदानाचे पैसे मिळत नाही, दूध संस्था आणि सरकारच्या वादात शेतकऱ्यांचा बळी – राजू शेट्टी

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही, सरकारचा हमीभाव आणि बाजारपेठेतील भाव यांच्यात एक हजार ते 1200 चा फरक – खा. राजू शेट्टी

शेतकऱ्यांप्रती राज्य सरकार संवेदनशील, विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकार करतंय – महादेव जानकर

आम्ही कर्जमाफी दिली, दुधाचे अनुदान वाढवले, कुठे कमी पडत असू, तर प्रामाणिक प्रयत्न करुच – महादेव जानकर

कांदा संकटांबाबत पंतप्रधानाना, कृषिमंत्र्यांना आधीच पत्र लिहून कळवलं होतं, निर्यातीवर अनुदान दिलं असतं तर कांदा उत्पादकांवर ही वेळ आली नसती – खा. राजू शेट्टी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह

वाचा: प्रश्नांपासून पळणार नाही, ब्राह्मण आरक्षण शक्य नाही: मुख्यमंत्री

शेती आणि उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर, उद्योगात अन्य राज्ये महाराष्ट्राच्या खूप मागे – मुख्यमंत्री

दिल्ली, गुजरातची एकत्र गुंतवणूक घेतली, तरी महाराष्ट्र त्यांच्या पुढे – मुख्यमंत्री

देशातील सर्वात जास्त स्टार्ट अप महाराष्ट्रात – मुख्यमंत्री

पायाभूत सुविधांमध्ये सर्वाधिक काम महाराष्ट्रात, केंद्र सरकारच्या मदतीने येत्या तीन वर्षात राज्य महामार्गांचं काम होईल – मुख्यमंत्री

कोस्टल रोड, एअरपोर्ट, मेट्रो प्रकल्प, अशी विविध कामं आम्ही युद्धपातळीने सुरु केली -मुख्यमंत्री

शिक्षणात 18 नंबरवरुन महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आला आहे – मुख्यमंत्री

आरक्षण असो वा आदिवासी पट्ट्यांचा प्रश्न,  कोणत्याही प्रश्नावरुन पळ काढला नाही  – मुख्यमंत्री

महाराष्ट्र महामंथन : देशात नरेंद्र, राज्यात नरेंद्र पुन्हा दिसणार का?

 मुख्यमंत्री – ते जनता ठरवेल, जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, केंद्रात आणि राज्यात आम्हीच परत येऊ, कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय

महाराष्ट्र महामंथन : पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची लाट दिसली का?

मुख्यमंत्री – लाट वगैरे काही नाही. काँग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा फुगा लवकरच फुटेल. मध्य प्रदेशात आम्हाला मतं जास्त आहेत. जनता आमच्या पाठिशी

महाराष्ट्र महामंथन : रेकॉर्ड करुन ठेवा राज्यात आम्हाला आहे तेवढ्याच, किंबहुना जास्त जागा मिळतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : स्वामीनाथन आयोगाच्या सर्वाधिक शिफारसी मोदी सरकारने लागू केल्याचं खुद्द स्वामीनाथन यांनी सांगितलं –  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : स्वामीनाथन आयोगाच्या सर्वाधिक शिफारसी मोदी सरकारने लागू केल्याचं खुद्द स्वामीनाथन यांनी सांगितलं – : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : शेतकऱ्यांचं संकट दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जोमाने काम करतंय – : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका त्या त्या वेळेत होतील, दोन्ही निवडणुका एकत्र व्हाव्या हे खर्च, वेळ, कष्ट टाळण्याच्या दृष्टीने योग्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : राजकीय वास्तविकतेनुसार शिवसेना-भाजप एकत्र येतील, काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : बाळासाहेब ठाकरेंबद्दल मोदींना प्रचंड आदर, मोदींनी पहिल्या भाषणात सांगितलं होतं मी कधीही बाळासाहेबांवर टीका करणार नाही  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : आम्ही दोघे एकत्र लढलो तर एकतर्फी विजय होईल, स्वतंत्र लढल्यास आव्हान उभं राहिल पण जिंकू नक्कीच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : धनगर आरक्षणाबाबत योग्य ती शिफारस राज्य सरकारची असेल,
ब्राह्मण समाजाला आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळू शकत नाही. ब्राह्मण समाजात शिक्षण आणि सामाजिक स्तर चांगला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र महामंथन : प्रतिज्ञापत्रात काही गोष्टी लपवल्या हे धादांत खोटं आहे. ज्याने आरोप केले त्याचं रेकॉर्ड तपासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्र महामंथन- मी माशीसुद्धा मारली नाही, पण माझ्याविरोधात 324 अंतर्गत गुन्हा दाखल झाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन 

महाराष्ट्र महामंथन-  देशात काँग्रेस महत्त्वाचा पक्ष आहेच, लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधक मजबूत हवेतच, राहुलजींना पुढील 5-10 वर्ष विरोधात राहायचं आहे, ते आणखी प्रगल्भ होतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन- देशात काँग्रेस महत्त्वाचा पक्ष आहेच, लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधक मजबूत हवेतच, राहुलजींना पुढील 5-10 वर्ष विरोधात राहायचं आहे, ते आणखी प्रगल्भ होतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

Live Tv

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  हस्ते होईल. पुन्हा मीच!!  या सत्रात मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासाचं मॉडेल मांडतील. महाराष्ट्रात कोणत्या क्षेत्रात काय काम करायला हवं, महाराष्ट्र भरारी कसा घेऊ शकतो, त्यासाठी उपाययोजना काय आहेत? आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, आरक्षण, शेती असे अनेक प्रश्न महाराष्ट्रात आहेत. त्याला मुख्यमंत्र्यांची उत्तरं काय, हे सर्व टीव्ही 9 मराठीच्या ‘महाराष्ट्र महामंथन’ या कार्यक्रमात सकाळी 10 पासून पाहायला मिळेल.

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राबाबतचं मॉडेल मांडल्यानंतर, त्यांच्यासोबत संवाद होईल. उपस्थितांच्या खुल्या प्रश्नांना ते थेट उत्तरं देतील.

खाकी आणि खादी

मुंबई आणि महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ज्यांच्या खांद्यावर आहे, ते महाराष्ट्र पोलीसही पहिल्यांदाच खुल्या व्यासपीठावर येणार आहेत. खाकी आणि खादी या सत्रात राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल आणि महाराष्ट्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख संजय बर्वे हे गुन्हे विश्वातील खाचखळगे मांडतील.

जमिनीवर कधी होणार जय किसान?

शेतकऱ्यांचे प्रश्न तर बहुतेकांना माहित आहेत, पण त्यावर उत्तरं काय? शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधणारं सत्र जमिनीवर कधी होणार जय किसान? हे सुरु होईल.  या सत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेते आणि राज्याचे कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत, तसंच दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे महामंथन करतील.

मोदींची मास्टर की – रोडकरी, पूलकरी, पोर्टकरी, क्रूझकरी अर्थात नितीन गडकरी

मोदींच्या मंत्रिमंडळातील आश्वासक चेहरा नितीन गडकरी या सत्रात सहभागी होतील. गडकरींच्या आयडिया महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या कशा ठरणार? गडकरींचं डेव्हलपमेंट मॉडेल काय आहे? रोडकरी, पूलकरी, पोर्टकरी, क्रूझकरी असणारे गडकरी आता नवं काय करणार, हे त्यांच्याकडून ऐकायला मिळेल.

अबकी बार किसकी सरकार?

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांची अबकी बार किसकी सरकार? या सत्रात खडाजंगी पाहायला मिळेल. सरकारच्या त्रुटी राजू वाघमारे दाखवतील, तर सरकारची बाजू उपाध्ये मांडतील.

ICU मध्ये लालपरी

या सत्रात गरिबांच्या हक्काचं वाहन अर्थात एसटीच्या दुर्दशेबद्दल खुद्द राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आपलं म्हणणं मांडतील.

महाराष्ट्राचे MOST

या सत्रात भारिप नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएम आमदार वारिस पठाण आणि राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे आपली मतं पुढे ठेवतील.

नमो विरुद्ध रागा

या सत्रात भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची धुमश्चक्री पाहायला मिळेल.

आरक्षण आखाडा

आमदार नितेश राणे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, संजय निरुपम, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे विविध समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतील.

‘राज’कारण

दिवसभरातील मच अवेटेड सत्र संध्याकाळी सातच्या सुमारास सुरु होईल. कारण या सत्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट ते सादर करतील.

अँग्री यंगमॅन!

दिवसभरातील कार्यक्रमांच्या रेलचेलीचा शेवट अँग्री यंगमॅन! या सत्राने होईल. यामध्ये पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल, विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि भाजप प्रवक्त्या शायना एनसी आपल्या भूमिका मांडतील.