मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा करु शकतात. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (CM Uddhav Thackeray address state today What to start and what to turn off in lockdown)
– वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स
– वृत्तपत्र, मीडीया संदर्भातील सेवा
– दूध विक्री भाजीपाला विक्री, फळे विक्री, पेट्रोल पंप
– किराणा दुकाने, अंडी आणि मास दुकाने, पशू खाद्य दुकाने
– बँक आणि पोस्ट सेवा
– कोरोना विषयक लसीकरण सेवा आणि चाचणी केंद्र, ऑप्टीकल्स दुकानं
अत्यावश्यक सेवेतील सर्वकाही सुरु राहणार.
रेल्वे, बस, एसटीचा वापर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी करू शकतील, त्याव्यतिरिक्त रस्त्यावर कोणालाही प्रवासाला परवानगी नाकारली जाण्याची शक्यता.
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवता येणार नाही, मात्र होम डिलीव्हरीची मुभा असेल. घरपोच मद्य सेवा सुरु ठेवली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी लागू केलेल्या लॉकडाऊन प्रमाणे यावेळीही जिल्ह्यांतर्गत प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रवासादरम्यान कोरोना संसर्गाचा मोठा धोका असल्यामुळे जिल्ह्यांतर्गत प्रवासबंदी लागू केली जाऊ शकते.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील अशी माहिती दिली होती. “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी आज माध्यमांना सांगितलं होतं.
महाराष्ट्रात लॉकडाऊन 12 ते 13 दिवसांचा असू शकतो, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. राज्यातल्या परप्रांतिय कामगारांनी महाराष्ट्र सोडू नका. तुमची सगळी काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल. महाविकास आघाडी सरकार आणि कामगार मंत्री म्हणून महाराष्ट्र तुमची काळजी घेईल याचं आश्वासन देतो, असं मुश्रीफ म्हणाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार, लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यताhttps://t.co/TMMbAJdi5r#CMUddhavThackeray #Lockdown
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2021
संबंधित बातम्या :
Maharashtra lockdown guidelines : महाराष्ट्रात लॉकडाऊन केल्यास नियम काय असू शकतात?
CM Uddhav Thackeray address state today What to start and what to turn off in lockdown