मुंबई : आठवडाभराच्या तुफान बॅटिंगनंतर आज राज्यभरात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात एकट्या पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यानुसार कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यातल्या जवळपास 18 जिल्ह्यांत पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्याला पावसाचा आज कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. केवळ अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. जळगाव, औरंगाबाद, जालन्याला देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
राज्यात सध्या असलेला जोरदार पावसाची तीव्रता, 9 सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना कोणतीही अडचण नसेल. यंदाचं बाप्पाचं आगमन पावसाच्या विघ्नाशिवाय होईल.
गणपती बाप्पा मोरया? & Weather:
राज्यात सध्या असलेला जोरदार पावसाच्या सिस्टिमची, 9 सप्टेंबर पासून तिव्रता कमी होण्याची शक्यता IMD ने आज वर्तवली आहे.त्यामुळे गणेश चतुर्थीला,बाप्पाच्या आगमनासाठी,भावीकांना अडचण नसेल.अधिक माहितीसाठी हवामान विभागाची वेबसाईट पहा@CMOMaharashtra pic.twitter.com/ZRYovBgSfD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 7, 2021
जळगाव
औरंगाबाद
जालना
बुलडाणा
अकोला
नंदूरबार
धुळे
नाशिक
ठाणे
पुणे
सातारा
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
राज्यात गेले आठवडाभर तुफान पाऊस पडतोय. राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस पडतोय. मात्र आजपासून पावसाची तीव्रता कमी होतीय. त्यामुळे आज अर्ध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नाहीय.
राज्याला काल पावसाने झोडपून काढले. राजधानी मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर पाऊस झाला. हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज अतिशय अचूक ठरला. धो धो पावसाने अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय. महापुरातून सावरलेल्या चाळीसगावात पुन्हा जोरदार पावसाने नद्या नाल्यांना पूर आलाय. मुंबई, नागपूर, बुलडाणा, जामनेर, लातूर, नाशिक सगळीकडेच पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली.
राज्याच्या सर्वच विभागांत पाऊस धो धो बरसला. यामुळे कुठे पिकांना जीवदान मिळालं तर कुठे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झालंय. कुठे रस्ते वाहून गेलेत, तर कुठे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय
(maharashtra mumbai rain weather update imd warning live update)
हे ही वाचा :