मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai City) आनंदाची बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं फुल्ल झालीत. त्यामुळ येत्या काळातील पाणीप्रश्न मिटला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत (Mumbai Dam) पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सर्वच तलाव तुडुंब भरले असून वर्षभर आवश्यक असणाऱ्या पाण्यापैकी 90 टक्के कोटा फुल झाला आहे. तलावांत सध्या 1302775 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झालाय. हे पाणी 338 दिवस म्हणजेच जुलै महिन्यापर्यंत पुरणारं आहे. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणातून मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या वर्षी संपूर्ण जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने एकूण जलसाठा 11 टक्क्यांपर्यंत खाली गेल्याने 28 जूनपासून दहा टक्के पाणीकपात करण्यात आली होती. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत असल्याने तलावांत 25 टक्के पाणी जमा झाल्यानंतर 12दिवसांतच पाणीकपात मागे घेण्यात आली. दरम्यान, जुलैअखेर पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठा वाढत नव्हता. मात्र आता तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असल्याने मुंबईकरांसाठी वर्षभरासाठीचे पाणी जमा होत आहे.
या सगळ्या धरणांंध्ये एकूण 1302775 दशलक्ष लिटर पाणी आहे. हा जलसाठा मुंबईकरांना जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठा करू शकतो. मागच्या तीन वर्षांतील हा सर्वाधिक जलसाठा आहे. तलावांमध्ये 6 ऑगस्ट रोजी 1302775 दशलक्ष लिटर म्हणजेच 90.01 टक्के पाणी जमा आहे. 2021 मध्ये याच दिवशी सातही तलावांत 1157161 दशलक्ष लिटर म्हणजेच 79.95 टक्के पाणीसाठा जमा होता. 2020 मध्ये तर याच दिवशी केवळ 600156 दशलक्ष लिटर म्हणजेच केवळ 41.47 टक्के पाणी जमा झाले होते.
कुठल्या धरणात किती पाणी?
अप्पर वैतरणा 189890 दशलक्ष लिटर
मोडक सागर 125761 दशलक्ष लिटर
तानसा 144063 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा 144899 दशलक्ष लिटर
भातसा 628431 दशलक्ष लिटर
विहार 216884 दशलक्ष
लिटर तुळशी 8046 दशलक्ष लिटर
अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणातून मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या वर्षी संपूर्ण जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने एकूण जलसाठा 11 टक्क्यांपर्यंत खाली गेल्याने 28 जूनपासून दहा टक्के पाणीकपात करण्यात आली होती. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत असल्याने तलावांत 25 टक्के पाणी जमा झाल्यानंतर 12दिवसांतच पाणीकपात मागे घेण्यात आली. दरम्यान, जुलैअखेर पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठा वाढत नव्हता. मात्र आता तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असल्याने मुंबईकरांसाठी वर्षभरासाठीचे पाणी जमा होत आहे.