मुंबई : कोरोनाची तिसरी लाट आणि ब्लॅक फंगसचं (Black fungus) थैमान यामुळे महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन (Maharashtra lockdown) आहे. आता त्यामध्ये शिथीलता आणण्याच्या हालचाली सुरु असल्या तर काही जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये (Red zone) आहेत. या रेड झोन जिल्ह्यांमध्ये सरसकट शिथीलता आणता येणार नाही, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी सांगितलं. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन वडेट्टीवारांनी विविध विषयावर भाष्य केलं. (Maharashtra red zone district list where corona cases increased Minister Vijay Wadettiwar PC on lockdown update)
विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात आता कोरोना रुग्ण कमी होत आहेत. लॉक डाऊन शिथील करण्याची मागणी होत आहे. पुढच्या पाच सहा दिवसात परिस्थिती बघून निर्णय होईल. माझ्या माहितीप्रमाणे 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे सरसकट शिथील करता येणार नाही. काही झोन करता येतील. कंटेन्मेंट झोन करून तिथे नियम कडक करावे लागतील. जिथं रुग्ण संख्या कमी तिथे शिथील करावे लागेल”
जे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत तिथे कडक लॉकडाऊन असला पाहिजे. गृह विलगिकरणाला अर्थ नाही लोकांना संस्थात्मक विलगीकरण केलं पाहिजे. कुटुंबाच्या कुटुंब कोरोना बाधित होत आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे 31 मे नंतर जरी राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाली, तरी या जिल्ह्यांमध्ये शिथीलता येण्याची शक्यता कमी आहे.
आधीच कोरोनाचं संकट असताना त्यात ब्लॅक फंगसच्या आजाराने विळखा घातला. त्यानंतर लगेच व्हाईट फंगसनेही थैमान घातले. आता येलो फंगसने दस्तक दिली आहे. उत्तर प्रदेशात येलो फंगसचा पहिला रुग्णही सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्रातील रुग्णसंख्या
राज्यात काल 23 मे रोजी 26 हजार 672 नवे रुग्ण आढळले. तर 29 हजार 177 रुग्ण बरे होऊन घरी परतले. काल दिवसभरात तब्बल 594 जणांचा मृत्यू झाला.
तुमच्या राज्यात किती रुग्ण पाहा संपूर्ण यादी
महाराष्ट्र सरकारने येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Maharashtra Lockdown Extended Till 31 January 2021)
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे भारतात काही रुग्ण आढळत आहे. त्यामुळे सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
बापरे! ब्लॅक, व्हाईट फंगसपेक्षाही ‘येलो फंगस’ अधिक धोकादायक; उत्तर प्रदेशात सापडला पहिला रुग्ण
मुंबई लोकलवर निर्बंध आवश्यक, 14 जिल्हे रेड झोनमध्ये, कडक लॉकडाऊन गरजेचा : विजय वडेट्टीवार
(Maharashtra red zone district list where corona cases increased Minister Vijay Wadettiwar PC on lockdown update)