मुंबई : महाराष्ट्र सरकारने येत्या 1 डिसेंबरपासून शाळेची घंटा (School Reopen) वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाच काय होणार असे प्रश्न उपस्थित झाला आहे आहेत. त्यावर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही निर्णय घेण्यात आलेला नाही. निर्णय आरोग्य विभाग घेणार; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, अशी स्पष्ट माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तरीही, शाळांना दिलेल्या आदेशानुसार, शाळांनी तयारी सुरु केली आहे.
मात्र, असं असलं तरी राज्यातील बरेचसे पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत अद्यापही संभ्रमात आहेत. ऑक्टोबर महिन्यात राज्यातील 8 वी, 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरु करण्यात आले. मात्र, त्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक होतं. शिक्षणविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 29,819 विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत येण्यासाठी संमती दर्शवलेली नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिलीये. तसेच, या पालकांचे समुपदेशनही करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
शिक्षणविभाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 8 वी, 9 वी आणि 10 वीचे एकूण 71 हजार 923 विद्यार्थी आहेत. मात्र, त्यापैकी 47 हजार 634 विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. तर, उर्वरित 29,819 विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत येण्यासाठी संमती दर्शवलेली नाही.
शिक्षणविभागाने जारी केलेली आकडेवारी –
शाळेत प्रत्यक्ष येत नसलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभाग त्यांचं समुपदेशन करण्याचं काम करत आहे. त्यासाठी पालकांचे व विद्यार्थ्यांचे समुपदेशन तसेच जनजागृती करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समितीची मदत घेतली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेतली जात आहे. सेवा भावी संस्थांचे सहकार्य घेतले जात आहेत. तसेच, त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गृह भेटी दिल्या जात आहेत.
शाळेत प्रत्यक्षात येऊ न शकणाऱ्यांच्या समस्या काय ?
विद्यार्थी आजारी असणे
स्थलांतरित असणे
रेल्वे प्रवासाची सोय नसणे
बस अथवा रीक्षा-टॅक्सी प्रवासासाठी पैसे नसणे
अर्थार्जनासठी पालकांद्वारे मुलांचा वापर करणे
गृह भेटी दरम्यान तसेच संपर्काचे साधन नसल्याने ठावठिकाणा लागत नाही.
संबंधित बातम्या :
शाळांबाबत तळ्यात-मळ्यात, निर्णय आरोग्य विभाग घेणार; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, टोपेंची माहिती