मुंबई: परवा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पंतप्रधांनाना भेटलं. यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची एकांतात भेट झाली. त्यावर अनेकांनी तर्कवितर्क लढवले. शंकाकुशंका घेतल्या. या शंका घेणारे वेगळ्या नंदनवनात राहत आहे. शिवसेना हा सर्वात विश्वासहार्य पक्ष आहे, असं सांगतानाच महाविकास आघाडीतील सरकार पाच वर्षे टिकेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ठणकावलं. (Maharashtra’s MVA government will complete 5-year term says sharad pawar)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शरद पवारांनी हे विधान केलं. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकांतात भेटल्याने त्यावरून अनेक वावड्या उठल्या होत्या. त्याचं खंडन करत पवारांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री-पंतप्रधान एकांतात भेटले. त्यामुळे काही लोकांनी अनेक तर्कवितर्क लढवले. शंका घेतल्या. पण शंका घेणारे वेगळ्या नंदनवनात राहत आहेत. शिवसेना हा विश्वासहार्य पक्ष आहे. लोकांच्या विश्वासावर हे सरकार काम करत आहे. त्यामुळे हे सराकर नुसतं टिकणारन नाही तर पाच वर्षे टिकेल, असं पवार म्हणाले.
राज्यात वेगळ्या विचाराचं सरकार स्थापन केलं. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असं लोकांना कधीच वाटलं नव्हतं. पण आपण एकत्र आलो. पर्याय दिला. लोकांनी हा पर्याय स्वीकारला असून आपली यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. कुणी काही म्हणो, सरकारची वाटचाल दमदार सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आपल्या देशात अनेक पक्ष निर्माण झाले. काही टिकले, तर काही कधी गेले ते कळलंही नाही. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात 70च्या दशकात पक्ष स्थापन झाला होता. या पक्षाची अकरा राज्यात सत्ता आली. पण दीड वर्षही हा पक्ष टिकू शकला नाही. आपण 22 वर्षे टिकून आहोत. 15 वर्षे आपण सत्तेत होतो. मधल्या काळात सत्तेत नव्हतो. त्याने काही फरक पडत नाही, असं पवार म्हणाले.
या दरम्यान, अनेक लोक आपल्याला सोडून गेले. पण नवीन लोक तयार झाले आहेत. नव्या लोकांचं कर्तृत्व कधीच दिसलं नव्हतं. त्यांना सधी मिळाली आणि त्यांचं कर्तृत्व समोर आलं. देशभर कोरोनाचं संकट असताना राजेश टोपेंनी चांगलं काम केलं. राजेंद्र शिंगणेही चांगलं काम करत आहेत. राजकारणात तरुणांना नेहमीच संधी दिली पाहिजे. पिढी तयार केली पाहिजे. राष्ट्रवादीने ही पिढी तयार केली आहे, असं त्यांनी सांगितलं.
सत्ता ही महत्त्वाची आहे. पण एकाच ठिकाणी सत्ता राहता कामा नये. एकाच ठिकाणी सत्ता राहिली तर सत्ता भ्रष्ट होते. त्यामुळे सत्ता ही सर्वसामान्यांपर्यंत गेली पाहिजे, त्यादृष्टीने प्रत्येकाने कामं केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. (Maharashtra’s MVA government will complete 5-year term says sharad pawar)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. ..https://t.co/QVXp1cD93c#Ncp22 #NCP #FoundationDay
— NCP (@NCPspeaks) June 10, 2021
संबंधित बातम्या:
कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही: अजित पवार
मुंबईकर शिवसेनेला महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देतील: चंद्रकांत पाटील