मुंबई : शिवसेनापक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे… शिवसैनिकांचं श्रद्धास्थान! बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) लावलेलं गुलमोहराचं झाड काल पडलं. त्याला आता पुनर्रोपित करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वहस्ते लावलेले गुलमोहराचे झाड आज उन्मळून पडलं. ते झाड पार्कातच पुनर्रोपित करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्कातील (Shivaji Park) मैदानालगतची उत्तर दिशेच्या कोपऱ्यातील जागा त्यासाठी निवडली. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाजवळ हे झाडं होतं. हा गुलमोहर अनेक वर्षे इथे होता. तो अचानक उन्मळून पडल्याची माहिती समोर आली. हे झाड कोसळल्यानं मैदानाच्या जवळच्या संरक्षक जाळीचं नुकसान झालंय. त्यानंतर महापालिकेने गुलमोहराच्या मैदानात पसरून पडलेल्या फांद्या छाटल्या. कोसळलेले झाड हायड्राच्या सहाय्याने उचलून ते पुनर्रोपित करण्याच्या ठिकाणी नेण्यात आलं. झाडाच्या मुळाशी खतयुक्त मातीचा लेप दिला गेला. त्यानंतर मातीमध्येही खते मिसळून खड्यामध्ये ते झाड पुनर्रोपित केलं गेलं. हे झाड कोसळल्याने बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या संरक्षक जाळ्या, लाद्या, पाण्याचे पाईप, विजेची केबल यांचं नुकसान झालंय. त्याची दुरुस्ती महापालिकेकडून केली जाणार आहे.
बाळासाहेबांनी लावलेलं गुलमोहराचं झाड काल पडलं. त्याला आता पुनर्रोपित करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वहस्ते लावलेले गुलमोहराचे झाड आज उन्मळून पडलं. ते झाड पार्कातच पुनर्रोपित करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेने पार्कातील मैदानालगतची उत्तर दिशेच्या कोपऱ्यातील जागा त्यासाठी निवडली. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाजवळ हे झाडं होतं. हा गुलमोहर अनेक वर्षे इथे होता. तो अचानक उन्मळून पडल्याची माहिती समोर आली. हे झाड कोसळल्यानं मैदानाच्या जवळच्या संरक्षक जाळीचं नुकसान झालंय. त्यानंतर महापालिकेने गुलमोहराच्या मैदानात पसरून पडलेल्या फांद्या छाटल्या. कोसळलेले झाड हायड्राच्या सहाय्याने उचलून ते पुनर्रोपित करण्याच्या ठिकाणी नेण्यात आलं. झाडाच्या मुळाशी खतयुक्त मातीचा लेप दिला गेला. त्यानंतर मातीमध्येही खते मिसळून खड्यामध्ये ते झाड पुनर्रोपित केलं गेलं.
दादरच्या शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते लावलेलं गुलमोहरचं झाड कोसळलं. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून याठिकाणची पाहणी करण्यात आली. झाड पडल्यानं गेटवरील लोखंडी रेलिंगही तुटली. शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मारकाजवळ असलेलं हे गुलमोहराचं झाडं कोसळलं. मुंबईत रविवारपासून जोरदार पाऊस आहे. रविवारी मध्यरात्री हे गुलमोहराचं झाड कोसळलं. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे हे झाड कोसळल्याची माहिती आहे.