मराठा आरक्षणासाठी आज सर्व पक्षीय ठाणे बंद पुकारण्यात आला आहे. मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचं मनोमिलन झालं का? अशी चर्चा आता ठाण्यात रंगली आहे. या चर्चा रंगण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या कृतीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आभार मानले आहेत.
या पोलीस व्हॅनने आमदार चिमणराव पाटील यांच्या कारला मागून धडक दिली. या अपघातात चिमणराव पाटील यांना किरकोळ दुखापत झाली.
अजित पवारांचा गट वेगळा झाल्यापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जितेंद्र आव्हाड हे महत्वाची भूमिका बजावू लागले आहेत. पण आता त्याच जितेंद्र आव्हाडांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु झालाय. जितेंद्र आव्हाडांविरोधात लढण्यासाठी तगड्या उमेदवाराची शोधाशोध सुरु झालीय.
डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित 9 जणांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठातांवर गंभीर आरोप केले आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये 2000 प्रतींची तिसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे.
यावेळी त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही टीका केली. त्यांना रात्रीच फार दिसते. त्यामुळे सत्तार रात्री बांधावर जात आहेत. आपण भाग्यवान आहोत की, आपल्याला असे कृषीमंत्री लाभले. अवघड आहे सगळं, असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात राडा झाला. शिंदे गटाने शिवाईनगर येथील शाखा ताब्यात घेतली. त्यानंतर ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलीय.
राज्यभरात सध्या होळीचा उत्साह असताना ठाण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाण्यात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात राडा झाल्याची माहिती मिळत आहे.
डान्सर गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अखेर या प्रकरणी राज्य महिला आयोगालादेखील दखल घ्यावी लागली आहे. त्यामुळे गौतमीच्या नकळत तिचा व्हिडीओ तयार करणाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
संदीप देशपांडे यांच्या आरोपांना आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संदीप देशपांडे यांच्यावर सडकून टीका केलीय.
केंद्र सरकारने औरंगाबादच्या नामांतराला हिरवा कंदील दिल्याची बातमी समोर आलेली. पण ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी याबद्दल महत्त्वाचं ट्विट केलंय. त्यांनी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय.