मुंबई : राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावर बोलताना भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले, मला वाटतं आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं महाविकास आघाडी यावर बोलावं. दुसऱ्या एखाद्या विषयावर पोपटपंच करायची. राजकारण करायचं. आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट. राजन पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भूमिका स्पष्ट करावी. कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन नाही. पण, मुख्यमंत्री शिंदे यांच्या काही लोकांनी वक्तव्य केलं.
त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकारण केलं. त्यांनी जे केलं असेल ते चुकीचंच आहे. पण, याठिकाणी राजन पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल सुप्रिया सुळे तसेच इतर काँग्रेसचे पुढारी, प्रवक्ते यांनी आपलं म्हणणं स्पष्ट करावं, असं आव्हान प्रवीण दरेकर यांनी दिलं.
कायद्याचा गैरवापर केला जातो, असा आरोप राष्ट्रवादीकडून केला जातो. यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, सौ चुहे खाके बिल्ली चली हज को. जितेंद्र आव्हाड यांनी अशी वक्तव्य केली, यापेक्षा दुर्दैव काय. आव्हाड मंत्री असताना आनंद करमुसे या इंजिनीअरला बेदम मारलं.
रुममध्ये कोंडून मारलं. आव्हाडांची अनेक प्रकरणं असलेली ट्रॅक रेकॉर्ड तपासा. कितीतरी प्रकरणात त्यांनी अनेकांना मारहाण केली. आव्हाडांच्या प्रकरणात गैरवापराचा प्रश्न येतो कुठं, असा सवालही प्रवीण दरेकर यांनी विचारला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. चित्रपटांच्या बाबतीत मत-मतांतरं असू शकतात. ते व्यक्त करण्याचाही अधिकार आहे. परंतु, थेटरमध्ये जाऊन मारहाण करण्याचा अधिकारी यांना कुणी दिला. त्यामुळं पोलिसांनी त्यांचं काम केलं, असं दरेकर यांनी सांगितलं.
चुका आपण करायच्या आणि सरकारला दोष द्यायचा. राजकीय अभिनिवेशातनं बोलायचं. लोकांना सगळं काही कळतं. महाराष्ट्राला आव्हाड कॅरेक्टर काय आहे, हे निट पूर्णपणे माहीत असल्याचंही प्रवीण दरेकर म्हणाले.