Mahim assembly election : माहिममध्ये कोणामध्ये होणार टक्कर, अमित ठाकरे लढणार?

| Updated on: Oct 22, 2024 | 5:40 PM

Mahim assembly election : मराठी आणि मुस्लीम बहुल भाग असलेल्या माहिम मतदारसंघात कोणाला संधी मिळणार हे अजून निश्चित झालेले नाही. पण मनसेकडून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथे कोणामध्ये मुख्य लढत असेल जाणून घ्या.

Mahim assembly election : माहिममध्ये कोणामध्ये होणार टक्कर, अमित ठाकरे लढणार?
Follow us on

मुंबईतील एक महत्त्वाच्या मतदारसंघापैकी एक असलेल्या माहित मतदारसंघात यंदा कोण कोण मैदानात असेल याबाबत उत्सुकता वाढली आहे. कारण या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुलगा अमित ठाकरे निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा असा हा मतदारसंघ सध्या शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडे आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडून ही येथे कोण उमेदवार असेल हे देखील अजून गुलदस्त्यात आहे. अशी ही चर्चा आहे की, अमित ठाकरे यांच्यासाठी महायुतीकडून त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. हा मतदारसंघ ठाकरे गटासाठी देखील महत्त्वाचा आहे. कारण याच भागात शिवसेना भवन देखील आहे. काही दिवसांआधी येथून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी चाचपणी सुरु केली होती. पण आता येथून अमित ठाकरे यांचं नाव पुढे येत आहे.

माहित हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण मनसे, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या तीन पक्षात येथे चुरस होण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा माजी नगरसेवक समाधान सरवणकर देखील या मतदारसंघातून इच्छूक असल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून देखील दोन नावांची चर्चा आहे. माजी आमदार विशाखा राऊत आणि महेश सावंत यांची नावे चर्चेत आहेत.

अमित ठाकरे जर माहिममधून उभे राहिले तर ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार नाही अशी ही चर्चा आहे. कारण मागच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे जेव्हा वरळी मतदारसंघातून उभे होते तेव्हा मनसेने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे ठाकरे गट देखील अशीच काही भूमिका घेऊ शकते.

या मतदारसंघात मराठी आणि मुस्लीम समाजाची मते सर्वाधिक आहेत. या मतदारसंघात 45 हजाराहून अधिक मराठी मतं आहेत. त्यानंतर 33 हजार मुस्लीम मतदार आहेत. त्यानंतर 9 हजार ख्रिश्चन मतदार आहेत.

माहिम विधानसभा 2019 चा निकाल

उमेदवार पक्ष मते
सदा सरवणकर शिवसेना 61,337
संदीप सुधाकर देशपांडे मनसे 42,690
प्रवीण नाईक काँग्रेस 15,246
नोटा इतर 3,912

माहिम विधानसभा 2014 चा निकाल

उमेदवार पक्ष मते
सदा सरवणकर शिवसेना 46,291
नितीन सरदेसाई मनसे 40,350
अंबेकर विलास रमेश भाजपा 33,446
प्रवीण नाईक काँग्रेस 11,917

माहिम विधानसभा 2009 चा निकाल

उमेदवार पक्ष मते
नितीन सरदेसाई मनसे 48,734
सदा सरवणकर काँग्रेस 39,808
आदिव चंद्रकांत बांदेकर शिवसेना 36,364
वसंत भगुजी जाधव इतर 1,890