Mahim Assembly election : सदा सरवणकर पाठिब्यांसाठी राज ठाकरे यांना भेटणार?

| Updated on: Oct 31, 2024 | 1:28 AM

माहीम विधानसभा निवडणुकीसाठी तिरंगी लढत आहे. मनसेकडून राज ठाकरे यांच सुपूत्र मैदानात आहेत. तर शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर देखील शिंदे गटाकडून मैदानात आहेत. आता आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी सग

Mahim Assembly election : सदा सरवणकर पाठिब्यांसाठी राज ठाकरे यांना भेटणार?
Follow us on

माहिममध्ये अमित ठाकरे यांना पाठींबा द्यावा अशी भाजपची भूमिका आहे आणि मुख्यमंत्री शिंदेंचीही तीच भूमिका होती, असं फडणवीस म्हणाले आहेत. तर माहिमचे शिंदेंचे उमेदवार स्वत: सदा सरवणकरांनी निष्ठावाण शिवसैनिकावर अन्याय करु नका म्हणत राज ठाकरेंनाच पाठींबा मागितलाय. त्यासाठी राज ठाकरेंना भेटण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.

सदा सरवणकर म्हणाले की, ‘मी 40 वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने 3 वेळा माहिमचा आमदार झालो. बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे 50 नातेवाईक दादर,माहिममध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते. एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे 3 वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या.’

माहिममध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर, मनसेकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत अशी तिहेरी लढत आहे. लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा दिल्यानं, माहिममध्ये अमित ठाकरेंना पाठींबा द्यावा, अशी भूमिका भाजपची आहे. शिंदेंचीही त्याला मान्यता होती, असं फडणवीस म्हणाले आहेत.

4 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. मात्र उमेदवारी मागे घेणार नाही, शिंदेंनीच मला लढण्याचे आदेश दिलेत असं सदा सरवणकर म्हणाले आहेत आणि त्यांनी प्रचारही सुरु केलाय.

ठाकरे कुटुंबातले आता दोघे जण विधानसभेच्या रिंगणात आहेत. आदित्य ठाकरेंनंतर अमित ठाकरेही माहिममधून पहिल्यांदाच मैदानात उतरलेत. वरळीतही माहिम प्रमाणंच, तिहेरी लढत आहे. 2019 मध्ये वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता. आता मनसेकडून संदीप देशपांडे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा उमेदवार आहेत. पण वरळीत जर कामं झाली असती तर याही वेळी राज ठाकरेंनी उमेदवार दिला नसता असं म्हणत अमित ठाकरेंनी आदित्यवरही निशाणा साधला.