रुग्णवाहिका न पोहोचल्याने दिलीप काका गेले, रत्नाकाकींना तुमच्या मदतीची गरज

| Updated on: Apr 17, 2020 | 10:00 PM

वरळी कोळीवाड्यातील दिलीप नवरत या 50 वर्षीय व्यक्तीचं 13 एप्रिल रोजी उपचाराअभावी निधन झालं (Man death due to unavailability of ambulance).

रुग्णवाहिका न पोहोचल्याने दिलीप काका गेले, रत्नाकाकींना तुमच्या मदतीची गरज
Follow us on

मुंबई : वरळी कोळीवाड्यातील दिलीप नवरत या 50 वर्षीय व्यक्तीचं 13 एप्रिल रोजी उपचाराअभावी निधन झालं (Man death due to unavailability of ambulance). दिलीप यांना 13 एप्रिल रोजी आकडी आली. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यावेळी त्यांच्या शेजारच्यांनी 108 क्रमांकावर फोन करत रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केला. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे उपचाराअभावी दिलीप नवरत यांचं निधन झालं (Man death due to unavailability of ambulance).

दिलीप नवरत यांच्या पश्चात त्यांच्या 49 वर्षीय पत्नी रत्ना नवरत आहेत. त्यांना मूलबाळ नाही. त्यांची गरीब परिस्थिती आहे. पतीच्या निधनानंतर घरात आता कुणी कमवतं नाही. याशिवाय सध्या देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे रत्ना नवरत यांना मदतीची गरज आहे.

‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीचा इम्पॅक्ट

दिलीप नवरत यांच्या निधनाची बातमी ‘टीव्ही 9 मराठी’ने प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत पंढरपूरचे मनसेचे सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांनी रत्ना नवरत यांना अकरा हजार रुपयांची मदत केली. त्यांनी ऑनलाईन प्रक्रियेमार्फत रत्ना नवरत यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले.

जर तुम्हालाही मदत करायची असेल तर

Name – RATNA DILIP NAVRAT
AC NO – 36040767474
IFSC Code – SBIN0001429
CIF NO – 89239737043
Branch – Shivaji Park ( MUMBAI )

इतर स्वरूपात मदत करायची असल्यास त्यांचा पत्ता  :

Add – Godekar Patra Chawal , Room no 78 D
Dogar Galli Worli Koliwada , Mumbai – 400030

संबंधित बातम्या :

कोरोनाचा वाढता कहर, धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट, कोणत्या परिसरात किती रुग्ण?

पुण्यात कोरोना बळींची संख्या 47 वर, आणखी दोघांचा मृत्यू