MVA Manifesto 2024 Maharashtra: काँग्रेसकडून आता महाराष्ट्रात पाच गॅरंटी, प्रत्येक परिवारास वर्षाला तीन लाख रुपये

| Updated on: Nov 10, 2024 | 12:50 PM

MVA Manifesto 2024 Maharashtra: जातनिहाय जनगणना आम्ही लोकांमध्ये विभाजन करण्यासाठी करत नाही, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा पुढील शंभर दिवसांचा कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात आला. त्यात महिलांना सहा गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. 

MVA Manifesto 2024 Maharashtra: काँग्रेसकडून आता महाराष्ट्रात पाच गॅरंटी, प्रत्येक परिवारास वर्षाला तीन लाख रुपये
mallikarjun kharge
Follow us on

MVA Manifesto 2024 Maharashtra: महाविकास आघाडी सरकारने आपल्या घोषणापत्रात पाच गॅरंटी दिल्या आहेत. तसेच प्रत्येक परिवारास वर्षाला तीन लाख रुपये मिळणार आहे. महिलांना मोफत बस प्रवास देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेऐवजी महालक्ष्मी योजना आणणार असून त्यातून महिलांना तीन हजार रुपये देणार आहे. शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. तसेच बेरोजगार युवकांना दर महिन्याला चार हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. काँग्रेस नेते आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.

काय आहे काँग्रेसचे पंचसूत्री

  1. महालक्ष्मी योजना – महिलांना दर महिन्याला 3 हजार रुपये आणि महिला व मुलींसाठी मोफत बस सेवा देण्यात येईल.
  2. कृषी समृद्धी – या योजनेत शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होईल. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
  3. कुटुंब रक्षणासाठी विमा – 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे.
  4. युवकांना मदत – बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे.
  5. समानतेची हमी – जातनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार आहे.

या केल्या घोषणा

जातनिहाय जनगणना आम्ही लोकांमध्ये विभाजन करण्यासाठी करत नाही, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा पुढील शंभर दिवसांचा कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात आला. त्यात महिलांना सहा गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करणार आहे. एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करुन ४५ दिवसांत निकाल लावण्यात येणार आहे.

हे महत्वाचे मुद्दे

  • राज्यात अडीच लाख सरकारी पदे रिक्त आहे. त्या भरण्यात येणार आहे.
  • २५ नगरपालिकांच्या निवडणुका अजून झाल्या नाही. त्या आमचे सरकार आल्यावर करणार आहे.
  • जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या खात्यावर विशिष्ट रक्कम ठेवण्यात येणार आहे.
  • संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना आता दीड हजाराऐवजी दोन हजार रुपये देण्यात येणार आहे.
  • महायुती सरकारने काढलेल्या अध्यादेशांचा आढावा घेण्यात येणार आहे.