मुंबई : मराठा आरक्षण मोर्चा वाशीपर्यंत काढून आणि जल्लोष करुन काय मिळालं, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. यावर रितसर पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय काय मिळालं, हे मनोज जरांगे यांनी सांगितलं. यावेळी नाव न घेता अप्रत्यक्षपणे जरांगेंनी राज ठाकरेंवर पलटवार केला. सोशल मीडियावर लिहून टीका करता असं सांगून जरांगेंनी राज ठाकरेंच्या ट्विटचाही उल्लेख केला.
सरकारनं सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढल्यानंतर राज ठाकरेंनी नेमकं काय ट्विट करत, श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि सोशल मीडियावरुन सवाल करणाऱ्या इतरांनाही काय काय मिळालं हे वाचून दाखवलंय.
अहमदनगरच्या ओबीसी एल्गार सभेतून नाभिक समाजावरुन मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुनही, जरांगेंनी भुजबळांवर टीका केली. तर आपलं ते वक्तव्य एका गावापुरतं होतं. मात्र माझं म्हणणं तोडून मोडून दाखवल्याचं सांगून भुजबळांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तर नुकताच राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे, महाराष्ट्रात सर्व्हेक्षण पूर्ण झालंय. मात्र भुजबळांनी पुन्हा या सर्वेवरुन सरकारवरलाच सवाल करत, खोट्या पद्धतीनं सर्वेचा आरोप केलाय.
मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि त्यावरुन दिल्या जाणाऱ्या ओबीसी जातप्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध कायम आहे. तर जरांगेही ठाम असून अधिसूचनेचं कायद्याचं रुपांतर व्हावं म्हणून पुन्हा 10 फेब्रुवारीपासून उपोषणाची घोषणाही केली आहे.