मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन काल मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत कुठलाही निर्णय तातडीने घेण्यात आला नाही. फक्त शांतता राखावी व मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे हा ठराव एकमुखाने या सर्वपक्षीय बैठकीत झाला. त्यावर “सरकारला वेळ किती आणि कशासाठी पाहिजे?. सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे सांगा” ही मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया होती. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. काल त्यांनी संध्याकाळपासून पाणी बंद करणार असल्याची घोषणा केली होती. बुधवारी सुद्धा राज्याच्या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. अधिवेशन बोलवून प्रश्न सुटणार नाही, हे देखील तितकच स्पष्ट आहे. एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं महाधिवक्ते तृषार मेहता म्हणाले.
संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण संपल्यानंतर त्यांना संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. थोड्याच वेळात उपचारासाठी मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी रुग्णालयात पोहोचतील.
धाराशिव : मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर धाराशिव येथे सुरु असलेले 9 दिवसांचे साखळी उपोषण मागे घेण्यात आले. जरांगे यांनी घोषणा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले जात आहे. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी आंदोलकानी केली.
पुणे : पुरंदर तालुक्यातील मराठा बांधवांनी सासवड येथील शिवतीर्थावर एकत्र येत कुणबी प्रमाणपत्राची होळी केली. ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले होते अशा लोकांनी आपले प्रमाणपत्र जाळून टाकले. जोपर्यंत सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही तोपर्यंत आम्हीही हे प्रमाणपत्र वापरणार नाही असे म्हणत या प्रमाणपत्राची होळी करण्यात आली.
मुंबई : दोन महिन्यात आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जुन्या नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. शिंदे समितीला मनुष्यबळ दिले जाईल. डे टू डे अपडेट जरांगे पाटील यांना देऊ. तुमची लोकं या समितीत असतील. काही त्रुटी असतील तर त्या दूर करू. दोन महिन्यात आरक्षण देऊ. त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई : मराठा कुणबी नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर करू. तसे दाखले दिले जातील. दुसरा टप्पा क्युरेटिव्ह पिटीशनचा आहे. त्यावर सरकार काम करत आहे. आरक्षण न देण्याचा कोर्टाने निर्णय घेतला. त्यात काय त्रुटी आहेत यावर काम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालाने एक विंडो ओपन केली आहे. सुनावणीवेळी आम्ही आमचे मुद्दे मांडू. मराठा समाज कसा मागास आहे आम्ही कोर्टात मांडू. कोर्टाने ज्या त्रुटी दाखवल्या आहेत. त्या दूर केलेल्या जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
अंतरवाली सराटी | या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या शिष्ठमंडळाला मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आमरण उपोषण मागे घेत राज्य सरकारला 2 जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे. मात्र तोवर साखळी उपोषण सुरुच राहणार आहे.
अंतरवाली सराटी | मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य सरकारच्या शिष्ठमंडळाची झालेली चर्चा यशस्वी ठरलीय. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुदत दिली आहे. वेळ घ्या पण आरक्षण द्या, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. तसेच आता दिलेला वेळ शेवटचा आहे, असंही जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं आहे.
जालना | मराठवाड्यातील जालन्यात अंतरवाली सराटीत गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. जरांगे पाटील यांची सरकार आणि विविध मंत्र्यांकडून समजूत काढली जात आहे. मात्र जरांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्य सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी पोहचले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
मालेगावात सकल मराठा समाजाच्या महिलांनी काढला मुक मोर्चा. लहान मुले, महिला आणि पुरुषांचीही लक्षणीय उपस्थिती आहे. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी काढला मुक मोर्चा.
उद्या 200 गावातील मराठा समाज बांधव एकत्र येऊन करणार रेल्वे रोको आंदोलन. शुक्रवारी हिंगोलीच्या बोलडा स्टेशनला रेल्वे रोको आंदोलन केले जाणार आहे. बोलडा येथील आठवडी बाजार देखील राहणार बंद
पुण्यातील धनकवडीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समजातर्फे भव्य कँडल मार्च काढण्यात आलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आला हा कँडल मार्च
चौथा दिवस आहे बीड बंद आहे. बीडच्या जनतेला काय चाललंय अद्याप माहीत नाही. क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला होत असेल तर सर्व सामन्याचे काय? प्रशासनाकडून जनतेसाठी काहीच प्लॅन तयार नाही. एकही संदेश नागरिकांना प्रशासनाने दिला नाही. व्यापारी वर्गात विश्वास दाखविण्यासाठी प्रशासन प्रयत्न केले पाहिजे. पोलिसांकडून काहीही होत नाही. पोलीस मुख्यालयाच्या समोर माझे घर आहे, तरीही माझ्या घरावर हल्ला झाला, तिथं एकही पोलीस कर्मचारी नव्हता, असे योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
सदावर्ते विरोधात पंढरपुरात मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. मराठा आरक्षण आणि आंदोलनाच्या विरोधात सदावर्ते यांनी आज कोर्टात केस दाखल केलीये. मराठा आरक्षण आणि आंदोलना विरोधात पुन्हा काही वक्तव्य केली तर सदावर्तेची गाडी न फोडता मुंबईत जाऊन डोके आणि चेष्मा फोडणार, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी म्हटले.
#WATCH उत्तर प्रदेश: उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ और उत्तर प्रदेश की राज्यपाल आनंदीबेन पटेल ने वाराणसी के काशी विश्वनाथ मंदिर में पूजा-अर्चना की। pic.twitter.com/CtbojfstV1
— ANI_HindiNews (@AHindinews) November 2, 2023
सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याचा जीआर काढवा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. तर रक्ताचं नात असल्यास प्रमाणपत्र मिळणार असं निवृत्त न्यायाधीशांनी सांगितलं.
“मोदींची हमी म्हणजे प्रत्येक हमी पूर्ण करण्याची हमी… नऊ वर्षांपूर्वीपर्यंत अशक्य वाटणारी कामेही आम्ही पूर्ण केली कारण मोदींनी हमी दिली होती. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण त्याला मोदींनीही दुजोरा दिला आहे.”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
#WATCH छत्तीसगढ़: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, "मोदी की गारंटी यानि हर गारंटी पूरा करने की गारंटी… 9 साल पहले तक जो काम असंभव लगते थे, वो काम भी हमने पूरे किए हैं क्योंकि उनकी गारंटी मोदी ने दी थी। लोकसभा और विधानसभा में महिलाओं के लिए आरक्षण भी मोदी ने ही पक्का किया है।" pic.twitter.com/QDIHk1LEIV
— ANI_HindiNews (@AHindinews) November 2, 2023
सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची मनधरणी करत आहे. तसेच आरक्षणातील तांत्रिक बाबी समजावून सांगत आहे. दरमन्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यातच नाही तर राज्यात काम करा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. थोड्याच वेळाच मंत्रिमंडळ जरांगे पाटलांची भेट घेणार आहे.
भारतीय जनता पक्षाने राजस्थानसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत उर्वरित 76 जागांपैकी 58 जागांसाठी घोषित उमेदवारांची नावे आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसला कोणत्याही प्रकारचा वॉकओव्हर देण्याच्या मनस्थितीत नसल्याचेही भाजपने आपल्या यादीतून स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरदारपुरा मतदारसंघातून सीएम अशोक गेहलोत यांच्या विरोधात महेंद्रसिंग राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर टोंकमध्ये सचिन पायलट यांच्याविरोधात अजितसिंग मेहता यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
एक दोन दिवसात कोणतंही आरक्षण मिळत नाही. घाई गडबडीत कोणताही निर्णय घ्यायला नको, असं निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगे पाटील यांना सांगितलं. दोन्ही निवृत्त न्यायाधीश जरांगे पाटलांना समजावत आहेत. मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळेल असा शब्द त्यांनी दिला.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. जरांगे पाटलांची सरकारी शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सरकारी शिष्टमंडळात दोन निवृत्त न्यायाधीशांचा समावेश आहे. बच्चू कडू पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या भेटीला गेले आहेत.
प्रकाश सोळंके यांचा बंगला आणि कार जाळण्याचा प्रकार घडला. त्याआधारे पोलिसांनी समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल केला. स्वतः प्रकाश सोळंके यांनी याप्रकरणात त्यांचे राजकीय विरोधकांचा पण हात असू शकतो असे पत्रकार परिषदेत म्हटले. मराठा आंदोलकांसह काही इतर समाजातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या घटनेवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आंदोलकांनी हा प्रकार केला नसावा, असं मत त्यांनी मांडलं.
मनोज जरांगे पाटील यांनी पु्न्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 9 दिवस आहे. या उपोषणास्त्रामुळे सरकारवर मोठा दबाव आला आहे. जवळपास दीड महिन्यापूर्वी पण त्यांनी असाच दबाव आणला होता. त्यातून बऱ्याच घडामोडी घडल्या. पण मराठा समाजाला आरक्षण मिळेल याची ठोस भूमिका सरकार घेत नसल्याची शंका समाजाच्या मनात घर करत आहे. त्यामुळे आता जरांगे यांनी उपोषणावर ठाम असल्याचे दाखवून दिले. आता त्यांची मनधरणी करण्यासाठी शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत पोहचत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी टॉवरवर चढून प्रशासनाचा जीव टांगणीला लावला आहे. अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडल्याचे समोर येत आहे. साताऱ्यात मराठा समाजाने टॅक्टर रॅली काढली. तर जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी एकवीरा देवीला साकडे घालण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला होता. लातूरमध्ये शिवापूर येथे आंदोलक पाण्यात उतरले. मेहकर येथे आंदोलकांनी रास्तारोको केला. तर मनमाडमध्ये आंदोलकांनी लोटांगण आंदोलन केले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. राज्य सरकारने ओबीसी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. पण या कोणत्याच उपायाच्या त्यांच्यावर परिणाम झाला नाही. काल सर्वपक्षीय बैठक झाली. त्यानंतर आज जरांगे यांना भेटण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ मुंबईहून छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले. येथे एक बैठक घेऊन आता हे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहे. या शिष्टमंडळात दोन निवृत्त न्यायमूर्तींचा पण समावेश आहे.
आमदार अपात्रतेप्रकरणा पुढील सुनावणी 21 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. नागपूर येथील अधिवेशन काळात पण सुनावणी घेणार असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. आज दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद रंगला. ठाकरे गटाने शिंदे गट युक्तीवादात अडथळा आणत असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.
नितेश राणेंनी आपली किंमत बघायची असेल तर गरजवंत मराठा समोर एकटे येऊन बघावे. सांगलीतील मराठा समाजाचे नितेश राणे यांना थेट आव्हान दिलं आहे. संतप्त मराठा समाज आंदोलकांनी नितेश राणेंच्या पोस्टरला जोडे मारून नितेश राणेंचे पोस्टर गाढवाला बांधून सोडून देत घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
कर्वेनगर परिसरात हॉस्टेल, बिल्डिंगमध्ये प्रवेश करुन बूट किंवा दरवाज्यावर ठेवलेल्या चावी घेऊन रुम मधील लॅपटॉप चोरी करणाऱ्या युवकाला वारजे माळवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केलीय. अर्जुन तुकाराम झाडे असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १२ लॅपटॉप दोन दुचाकी, एक कॅमेरा आणि लॅपटॉप चार्जर चोरल्याचे समोर आले आहे.
सरकारचे शिष्ट मंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटी जात आहे. आमची कळकळीची विनंती आहे की जरांगे पाटील यांनी कायदेशीर प्रक्रिया समजून घ्यावी आणि त्यासाठी लागणारा वेळ सरकाला द्यावा असे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांच्या भेटी सरकारचं शिष्ठमंडळ संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले आहे. दहा ते पंधरा गाड्यांचा ताफा असून तो लवकरच अंतरवाली सराटीला जाऊन जरांगे यांची उपोषण स्थळी भेट घेणार आहे.
सरकारचं शिष्टमंडळ जालन्याच्या दिशेने रवाना झाले आहे. शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून शिष्टमंडळ जालन्याच्या दिशेने रवाना झाले आहे. या शिष्टमंडळामध्ये धनंजय मुंडे, सामंत, सावे, संदिपान भुमरे, कुचे, मंगेश, चिवटे यांचा समावेश आहे.
मराठा आंदोलनामुळे एसटी महामंडळाला 20 कोटींचा फटका बसला आहे. आधीच कोरोना आणि नंतर कर्मचाऱ्यांचे संप यामुळे एसटीची आर्थिक स्थिती ढासाळलेली आहे.
आंबेगावच्या महाळुंगे गावात शाळेकडून माहिती मागविल्यानंतर 1120 कुणबी नोंदी असल्याचे समोर आले आहे. शाळेकडून तसे पत्र देण्यात आले आहे.
शिष्टमंडळ 1 वाजता निघणार. शिष्टमंडळात मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री उदय सामंत यांचाही समावेश. संदीपान भुमरे आणि अतुल सावे असणार शिष्टमंडळात. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचाही शिष्टमंडळात समावेश. दोन दिवसांपासून मंगेश चिवटे यांनी केली होती मनोज जरांगे यांच्यासोबत शिष्टाई. आज उपोषण सोडवण्यासाठी केले जाणार आटोकाट प्रयत्न. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून शिष्टमंडळ draft करणार फायनल
जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थानात आणि मराठा आरक्षणसाठी सकल मराठा समाजाची गांधीगिरी. नागपुरात साखळी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी नागरिकांना गुलाबाची फुल देत केली जात आहे गांधीगिरी.
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. मराठा आरक्षणासाठी जेल भरो व महिलांनी बांगड्या फोडून आंदोलन केले होते. अटक केल्यानंतर त्यांना ग्रामीण पोलिसात आणले गेले आहे
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 दरम्यान दोन तासांचा हा ब्लॉक असेल. या दरम्यान पुण्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येईल. आयटीएमएस अंतर्गत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी हा ब्लॉक घेतला जातोय. यावेळी सोमटने फाटा जवळ ही गॅन्ट्री बसविण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून असे ब्लॉक घेतले जातायेत अन पुढील काही महिने असेच ब्लॉक घेतले जाणार आहेत. ब्लॉकवेळी सर्व वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल. या दरम्यान प्रवाश्यांनी सहकार्य करावं असं आवाहन MSRDC आणि महामार्ग पोलिसांनी केलेलं आहे.
सोलापुरात काल रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर कलम 371 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलकांपैकी 10 जणांना अटक तर एक जण फरार आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर काल टायर जाळत आंदोलन केलं होतं. अटक केलेल्या कार्यकर्त्यांना आज कोर्टात हजर करणार आहे.
सलग तिसऱ्या दिवशी मंत्रालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलक आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वपक्षीय आमदार गेल्या तीन दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहेत.
अहमदनगरमध्ये एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी उग्र आंदोलन होत असल्याने एस टी महामंडळाने वाहतूक बंद केली आहे. एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेजवर परिणाम होत आहे. सध्या परीक्षेचे दिवस असल्याने आणि एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
सर्वपक्षीय आमदारांकडून मंत्रालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सलग तिसऱ्या दिवशी हे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम झालं आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा नियोजित नाशिक दौरा रद्द करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांनी गाव बंदी केली असल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जाण्याच्या धसक्याने दौरा रद्द केल्याची चर्चा आहे. अंबादास दानवे आज दुपारी बारा वाजता नाशिकमध्ये येणार होते. नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी दुपारी 12 ते 5 या वेळेत होणार होत्या.
अहमदनगर : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर कल्याण महामार्गवर रास्ता रोको करण्यात आला आहे. खातगाव टाकळी गावात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं असून सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची त्वरित दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनात शाळेतील विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. सुमारे एक तासापासून चाललेल्या या आंदोलनामुळे नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आज अमित शाहा यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत ही भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज दुपारी 3.30 वाजता ही महत्त्वाची बैठक होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत. या बैठकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे
शिष्टमंडळाच्या भेटीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करणार आहेत. त्यानंतरच शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेतील.
अतुल सावे, उदय सामंत यांची थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार बैठक. ‘वर्षा’ बंगल्यावर थोड्याच वेळात बैठकीला सुरूवात होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटील यांची भेट घेणार असून त्यामध्ये अतुल सावे यांचाही समावेश आहे.
नाशिकमधील चांदोरी चौफुलीवर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. नाशिक आणि निफाड दरम्यानचा रास्ता आंदोलकांनी अडवला असून मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. चांदोरी चौफुलीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दुपारी ३.३० च्या सुमारास ही भेट होईल. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर फडणवीस हे अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. आज सरकारतर्फे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.
अतुल सावे, नारायण कुचे आणि संदीपान भुमरे हे जरांगेची भेट घेतील, सर्वपक्षीय नेत्यांच्या ठरावाची प्रत हे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना देणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील नरवीर तानाजी चौकात मराठा आंदोलकांतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे.
आरक्षण देणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पंतप्रधान मोदींनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून तरी संवाद साधावा, असे संजय राऊत म्हणाले. सरकारला आणखी किती वेळ हवा आहे ? असा सवालही त्यांनी विचारला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात मराठा आंदोलकांचे आंदोलन सुरु आहे. पुण्यातील नरवीर तानाजी चौकात आंदोलन सुरु आहे. आंदोलकांकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आरक्षणाची मागणी करण्यात आली.
सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली आहे. आमची भूमिका 50% च्या आत असलेले ओबीसी आरक्षण देण्याची आहे. परंतु त्याचा साधा उल्लेखही ठरावात केला गेला नाही. ही बैठक केवळ दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे मराठ्यांच्या डोळ्यात धूळफेक होत असल्याचा आरोप मराठा समनव्यक योगेश केदार यांनी केला.
आमदार बच्चू कडू आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे. बच्चू कडू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी समितीबरोबर बच्चू कडू अंतरावाली सराटीला जाणार आहे.
पुणे नगर महामार्गावर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार शंकर गडाख यांच्या नेतृत्वात घोडेगाव चौफुला येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्यासह निवृत्त न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव जरंगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी सरकारकडून मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाजू त्यांना समजवून सांगितली जाईल.
आज येवला बाजार समितीतील कांदा, धान्य लिलाव बंद. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाचा निर्णय. कांदा, धान्य लिलाव बंदमुळे येवला बाजार समितीत शुकशुकाट. बंदमुळे कांदा आणि धान्याची अंदाजे पाच ते सात कोटींची होणारी उलाढाल ठप्प.
काल रात्रीपासून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी सोडलं आहे. आज सरकारकडून शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे सापड्ले कुणबीचे दाखले. जरांगेंचा दावा खरा, पश्चिम महाराष्ट्रातही सापडताहेत कुणबी दाखले. जुने रेकॉर्ड तपासताना पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावात कुणबी दाखल्यांची नोदं असल्याचं आलं समोर. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर जुने रेकॉर्ड तपासताना भोसेसारख्या लहानशा गावात 25 पेक्षा जास्त दाखले सापडले आहेत.
राजकीय संन्यासाच्या ट्विट नंतर माजी खासदार निलेश राणे पहिल्यांदाच रत्नागिरी दौऱ्यावर. माजी खासदार निलेश राणे यांच्या रत्नागिरी दौऱ्याआधीच जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनरबाजी. निलेश राणे यांच्या स्वागतासाठी लागलेले बॅनर भुवया उंचावणारे. “क्या हार में क्या जीत में किंचित नही मे भयभीत मे, कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वो भी सही वरदान नही मांगूंगा हो कुछ पर हार नही मानूंगा” असं या बॅनरवर लिहिलं आहे. रत्नागिरी दौऱ्यावर येणारे माजी खासदार निलेश राणे करणार जोरदार शक्ती प्रदर्शन.
धाराशिवमध्ये जमावबंदी-शस्त्रबंदी कायम आहे. बससेवा बंद आहे. आज जेल भरो आंदोलन होईल. तणावपूर्ण शांतता आहे. धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी आदेश मागे घेतले आहेत. धाराशिव पोलिसांनी गेल्या 2 दिवसात तब्बल 120 ज्ञात व 200 च्या वर अज्ञात आंदोलकांवर गुन्हे नोंद केले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता कायम असून तणावपूर्ण शांतता आहे.
अजित पवार यांच्या हस्ते आज दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ होणार होता. या समारंभास दौंड शहर व तालुका सकल मराठा समाजाने विरोध दर्शविला होता. दरम्यान अजित पवारांची प्रकृती बरी नसल्याने आंदोलन रद्द करण्याचा निर्णय. गळीत हंगामाचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती. अजित पवार यांच्याविरोधातील मराठा मोर्चाचे निषेध आंदोलन रद्द.