मुंबई – मुंबईमध्ये दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज पुन्हा एकाद आगीची घटना समोर आली आहे. मानखुर्दच्या मंडाला परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊन भिषण आग लागली. पहाटे तीनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. दरम्यान आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या 20 गाड्या पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी हजर झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेत कुठलीही जीवितहाणी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान मानखुर्द परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भंगाराचे गोडावून आहेत. तसेच या परिसरात लोकवस्ती देखील दाट आहे. प्लास्टिकच्या गोडाऊन आग लागल्यानंतर थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. आग पसरल्यास या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
धक्कादायक! न्यायालय परिसरात वकिलाच्या चेंबरमध्येच मृतदेह सापडला https://t.co/iv7Yj9MGJ1 #Crime #Police #Delhi
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2021
संबंधित बातम्या
अनिल देशमुखांची ईडी कोठडी संपणार, जामीन मिळणार का?
सेबीकडून सिल्व्हर ‘ईटीएफ’साठीच्या नियमात बदल, जाणून घ्या काय परिणाम होणार?
Zodiac Sign | भरपूर पैसा कमावतात या 4 राशींचे लोक, तुमची रास यामध्ये आहे का?