Matheran : 1 नोव्हेंबरपासून माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेत
Matheran toy train: मुंबईपासून 100 किमी अंतरावर असलेल्या माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. येथे धावणारी टॉय ट्रेन सेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे. मुंबई आणि पुण्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी निसर्गांचं सौंदर्य अनुभवण्यासाठी येत असतात. यावेळी ही मिनी ट्रेन विशेष आकर्षण असतं.
-
-
माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेली माथेरानची राणी म्हणजेच मिनीट्रेन 1 नोव्हेंबरपासून पर्यटकांच्या सेवेत रुजू होत आहे.
-
-
माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची पायपिट वाचवून नेरळ ते माथेरान दरम्यान दऱ्या डोंगरातील विहंगम दृष्य या मिनीट्रेनमधून पाहता येते. यामुळे जितक आकर्षण माथेरान पाहण्यात असतं. त्यापेक्षा कितीतरी अधिक आकर्षण पर्यटकांना माथेरानच्या या राणीच्या प्रवासाचं असतं.
-
-
दरवर्षी पावसाळ्यात चार महिने अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची भीती असते. या कारणास्तव मिनीट्रेनची ही सेवा बंद करण्यात येते. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी ही मिनीट्रेनची सेवा सुरु होते.
-
-
काही तांत्रिक आडचणींमुळे या वर्षी 1 नोव्हेंबरपासून माथेरानची ही मिनी ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.