माथेरानः महाराष्ट्रातील राजकारणात बंडखोरीचे नाटक घडल्यानंतर राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला. सत्ता स्थापनेवर आपापल्या गटाचा दावा करण्यात आला आणि नंतर हे प्रकरण न्यायालयातही दाखल झाले. त्याआधी मोर्चे, आंदोलने आणि हल्ले हे प्रकार होत असतानाच समर्थक आणि बंडखोर आमदारांचे (Rebel MLA) कार्यकर्ते एकमेकांसमोर उभा राहिले. या अशा प्रकारातूनच रविवारी माथेरानमध्ये (Matheran) शिवसेनेचे नगरसेवक प्रसाद सावंत (Prasad Sawat) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्या कारचेही प्रचंड नुकसान झाले आहे. ही गोष्ट शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांना समजताच त्यांनी तात्काळ कार्यकर्ते प्रसाद सावंत यांची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यात आली.
यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसाद सावंत यांना “प्रसाद घाबरू नकोस” शिवसेना तूझ्या पाठीशी आहे” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांबरोबरही संवाद साधला.
प्रसाद सांवत यांच्या रविवारी अज्ञातांकडून जोरदार हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्या तब्बेतीची चौकशी आणि विचारपूस करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी कळंबोलीमधील एमजीएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
यावेळी प्रसाद घाबरू नकोस शिवसेना तूझ्या पाठीशी आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रसाद सावंत यांना धीर दिला. आदित्य ठाकरे यांनी प्रसाद सावंत यांच्याबरोबर त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेत, आपण नेहमी तुमच्यासोबत असल्याचा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.