मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी चुकीची कागदपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा दावा मलिकांनी केलाय. दरम्यान, समीर वानखेडे आणि शबाना यांचा निकाह लावणाऱ्या मौलानांनी खळबळजनक दावा केलाय. मुलगा आणि मुलगी दोघेही मुस्लिम असल्याचं सांगितल्यानेच आम्ही निकाह लावला, असं मौलाना मुजम्मिल अहमद यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. इतकंच नाही तर निकाहावेळी समीर वानखेडे यांनी आपलं नाव समीर दाऊद वानखेडे असंच सांगिंतलं होतं, असंही मौलाना म्हणाले. (Maulana Muzammil Ahmed claims that Sameer Wankhede mentioned his name Sameer Dawood Wankhede during the marriage)
निकाहावेळी समीर यांनी दाऊद असंच नाव घेतलं होतं. आम्ही मुलाला त्याचं पूर्ण नाव सांगायला सांगतो, तसंच तुमचा निकाह शबाना यांच्यासोबत एवढ्या महरवर करत आहोत, तुम्हाला हे मान्य आहे? तेव्हा मुलगा म्हणते मान्य आहे. त्यानंतर स्वाक्षरी केली जाते. महरच्या समोरही स्वाक्षरी केली जाते. निकाह लावणारा काझीही त्यावर स्वाक्षरी करतो. तिथे उपस्थित असलेले साक्षीदारही आपली स्वाक्षरी करतात, असं मौलाना म्हणाले. त्याचबरोबर टीव्ही 9 च्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचं नाव दाऊद असंच सांगितल्याचंही ते म्हणाले. निकाहवेळी समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचं नाव दाऊद असंच सांगितलं होतं. त्यावेळी ते दाऊदच बनले होते. त्यापूर्वी किंवा त्यानंतर त्यांचं नाव काय असेल ते आम्हाला काय माहिती, असंही मौलाना म्हणाले.
मुलगा-मुलगी ज्यावेळेस निकाहसाठी येतात. त्यावेळेस त्यांच्याकडून फॉर्म भरुन घेतला जातो. त्यात बघितलं जातं की मुलगा मुसलमान आहे की नाही, त्याचा बाप मुसलमान आहे की नाही, नंतरच निकाह केला जातो. आधीच माहिती घेतली जात नाही. माहिती तर त्यानं घ्यायची असते ज्याला आपल्या मुलीचा निकाह करायचा आहे. आम्ही एवढच बघतो की मुलगा-मुलगी मुसलमान आहेत की नाही, आणि ते असतील तर ते राजी असतील तर निकाह केला जातो, असे मुजम्मिल अहमद यांनी सांगितले.
समीर वानखेडे यांनी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी 2006 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 2016 मध्ये त्यांचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. 2017 मध्ये समीर वानखेडे यांनी क्रांती दीनानाथ रेडकर हिच्याशी लग्न केले होते.
“माझा लढा हा धर्माविरोधात नाही तर त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलीय, हे मला सगळ्यांसमोर आणायचंय. खोटा जातीचा दाखला देऊन त्यांनी नोकरी मिळवली, हा माझा स्पष्ट आरोप आहे. एका अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली. गरिब वंचित व्यक्ती झोपडीत राहून युपीएससीची तयारी करत होता. त्याची नोकरी समीर वानखेडेने हिसकावून घेतली आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. अशा बोगसगिरीविरोधात 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की त्यांची नोकरी नक्की जाईल.”
जर जात प्रमाणपत्रानुसार अल्पसंख्याक समीरला असा फर्जीवाडा करुन नोकरी मिळत असेल तर 15 कोटी मुस्लिमांना मागासवर्गीय म्हणून अशी नोकरी मिळेल का?, असा खडा सवाल विचारत मी दाखवलेला त्यांचा जात प्रमाणपत्राचा दाखला जर खोटा असेल तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन”, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
“कागदपत्राविरोधात छेडछाड करुन तथा बोगसगिरीविरोधात 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की वानखेडेची नोकरी नक्की जाईल. आता जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली.
इतर बातम्या :
‘मिस्टर फडणवीसांकडून खंडणीखोर सैतानाची तरफदारी’, दादरा नगर-हवेलीत संजय राऊतांचा पलटवार
Maulana Muzammil Ahmed claims that Sameer Wankhede mentioned his name Sameer Dawood Wankhede during the marriage