मे महिन्यात हिट अँड रन, केमिकल कंपनीत स्फोट आणि धरण आणि बॅट वॉटरमध्ये बुडून अनेक जीव गेले. मे हा किलर महिना ठरला. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, पोर्शे अपघात, डोंबिवली केमिकल कंपनीतील स्फोट तर इतर अनेक घटनांमध्ये गेल्या १७ दिवसांत ६२ जणांचा बळी गेला. पुण्यातील कल्याणीनगरातील कार अपघाताचे प्रकरण तर देशभरात गाजले. त्यात दोन अभियंत्यांचा जीव गेला होता. धरणात पोहण्यसाठी गेलेल्या काही जणांचा बुडून मृत्यू ओढावला.
ठाण्यात चार महिन्यांत हिट ॲण्ड रनचे ३६ बळी
मे ठरला किलर मंथ
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत दोन दिवस चौकशी
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात रेल्वेचे सहाय्यक पोलिस आयुक्त शहाजी निकम यांची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली. पहिल्या तीन होर्डिंगच्या तुलनेत चौथ्या (पडलेल्या) होर्डिंगमधून लोहमार्ग पोलिसांना सर्वाधिक रक्कम मिळाल्याचे समोर आले आहे. उर्वरित तीन होर्डिंगमधून १३ लाखांची रक्कम मिळत होती तर चौथ्या होर्डिंगमधून ११ लाखांहून अधिक रक्कम ही रेल्वे पोलिसांच्या खात्यात जमा होत असल्याच चौकशीतून समोर आले आहे.
चौथ्या होर्डिंगला परवानगी का?
पहिल्या तीन होर्डिंगच्या आधारेच भिडे याला चौथ्या होर्डिंगसाठी खालिद यांच्या सांगण्यावरून परवानगी दिल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत निकम यांनी माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. होर्डिंगचं १० वर्षाचं कंत्राटही तत्कालिन पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्या सांगण्यावरून ७ जुलै २०२२ रोजी वाढवल्याची माहिती निकम यांनी चौकशीत दिली. ७ डिसेंबर २०२१ पर्यंत पहिले तीन होर्डिंग ४०×४० होते. मात्र त्यानंतर त्याचा आकार ८०×८० करण्यात आला. १९ डिसेंबर २०२२ मध्ये चौथं होर्डिंग जे पडलं, त्याची साईज ही १४०×१२० करण्यात आल्याची माहिती निकम यांनी चौकशीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.