मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून जगासह देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचे संकट कमी होत आहे, असे वाटत असतानाच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने (Omicron) जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा चिंता करण्यासारखा विषाणू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे. दरम्यान या नव्या कोरोना व्हिरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात आले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अचानक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Mumbai Airport) भेट देत पहाणी केली
यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र आपण त्यावर मात केली. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले की, सध्या तरी राज्यात एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र मागचा अनुभव पाहाता आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवे नियम जारी केले आहेत. परदेशातून आलेला एकही प्रवाशी मुंबई विमानतळावरून आरटीपीसीआर झाल्याशिवाय बाहेर पडणार नाही. त्यासाठी 50 तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच ज्या देशात ओमिक्रॉनचा धोका सर्वाधिक आहे, अशा देशातून भारतामध्ये परतणाऱ्या नागरिकांना हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच मुंबईकरांनो घाबरू नका, फक्त काळजी घ्या असेही पेडणेकर म्हणाल्या आहेत.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देखील नवे नियम जारी करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार जर कोणी विनामास्क आढळल्यास त्याच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तर जर एखादा ग्राहक हा विनामास्क खरेदी करताना दिसल्यास संबंधित दुकानदाराकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. मॉलमध्ये विनामास्क व्यक्ती आढळून आल्यास मॉल मालकाला तब्बल पन्नास हजारांचा दंड करण्यात येणार आहे.
Mumbai Mayor Kishori Pednekar takes stock of measures being taken at Mumbai airport against #Omicron variant of coronavirus
“Authorities have told me that they test every passenger on arrival & send them to quarantine… So far, there’s no case of Omicron in Mumbai,” she says pic.twitter.com/b0x7o9EYiI
— ANI (@ANI) November 29, 2021
शात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही, लॉकडाऊनचे निर्बंध लादण्याचा कोणताही निर्णय नाही: राजेश टोपे