मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी 2020 परीक्षा येत्या 10 जून पासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यास परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परिक्षा घेण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्याबद्दल attempt मोजण्यात येऊ नयेत, अशी सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Consolation to medical students, opportunity to re-examine if absent due to corona)
कोविड-19 परिस्थितीच्या अनुषंगाने, विद्यार्थी 10 जून 2021 पासून सुरु होणाऱ्या विद्यापीठाच्या हिवाळी-2020 लेखी परीक्षेबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोविड-19 आजाराचा अहवाल सकारात्मक (Positive) आल्यामुळे अनुपस्थित राहतील, अशा विद्यार्थ्यांची सदर हिवाळी-2020 लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर, विशेष परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेसाठी अनुपस्थित असलेल्यांचा प्रयत्न (Attempt) ग्राहय धरला जाणार नाही. विशेष परीक्षेचा दिनांक काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा मार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी 2020 परीक्षा येत्या 10 जून पासूनच्या परिक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यामुळे परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परिक्षा घेण्यात येईल.#muhsexams pic.twitter.com/UgRdq7FCzD
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) June 8, 2021
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या विद्यापिठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या वैद्यकीय परीक्षेस बसणारे विद्यार्थी परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन कोणत्याही शासकीय रुग्णालय तसेच शासनमान्य कोविड रुग्णालयात स्वतःची आरटीपीसीआर चाचणी विनामूल्य करून घेऊ शकतात. तसंच जे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात राहण्यास इच्छुक आहेत, अशा विद्यार्थ्यांची वसतिगृहात वैयक्तिक अंतर राखून राहण्याची सोय करण्यात येणार आहे. वसतिगृहाच्या मेसमध्ये भोजनाची सोय करण्यात येणार आहे. वसतिगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण वेळोवेळी करण्यात यावे. त्याचबरोबर सर्व प्रकारची काळजी घेऊनच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात असंही वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना कळविण्यात आलं आहे.
खासदारकीला धोका नाही, जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतरही नवनीत राणांना विश्वास https://t.co/KAbCR2BSfh @raviranabjp @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSena #NavneetKaurRana #NavneetRana #CasteCertificate #SupremeCourtofIndia #amravati #AnandraoAdsul #RaviRana
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2021
संबंधित बातम्या :
जालना जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जाणार नाही याची काळजी घ्या; राजेश टोपे यांचं आवाहन
आशिष शेलार म्हणाले, गेला गाळ कुणीकडे?; पालिकेने केला ‘हा’ दावा, दिली आकडेवारी!
Consolation to medical students, opportunity to re-examine if absent due to corona